Mustafa 🇮🇳♥️ Profile picture
INC | RAGA 💯🔥 |SARKIAN | KOLHAPURKAR | SUFISM ♥️

Jul 11, 2020, 5 tweets

देव माना किंवा मानू नका, त्याने फारसा फरक पडत नाही, पण...

१. आपल्यासारखाच इतरांनाही आपले स्वतंत्र मत असण्याचा हक्क आहे, हे ध्यानात ठेवा... याला समता (equality) म्हणतात.

२. आपल्या मताचा इतरांना उपद्रव होणार नाही याची काळजी घ्या... याला सभ्यता (civility) म्हणतात.@Rutuja0304

३. दुसर्‍याचा मताचा आदर करा आणि आपले मत दुसर्‍याला पटवून देताना ते त्याच्यावर जबरदस्तीने लादले जाणार नाही याची काळजी घ्या... याला सहिष्णुता (tolerance) म्हणतात.

४. अनेक मतमतांतरे असली तरीही किमान मानवी मुल्यांच्या पायावर समाज सामंजस्याने राहू शकतो व विकास साधू शकतो, यावर विश्वास ठेवा... याला बंधुभाव (brotherhood) म्हणतात.

वरचे सर्व मुद्दे समजून उमजून वर्तन केले तरच मानवी समाज स्वातंत्र्यात व सुखसमाधानात राहू शकेल.

मानवी हक्कांच्या सद्य कल्पना मानवी विचारातूनच निर्माण झालेल्या आहेत. काळाबरोबर परिस्थिती जसजशी बदलत जाईल तसतशा या कल्पनांत विकास/बदल होत राहील.

त्याकरिता देवाचे, धर्माचे किंवा एखाद्या विचारधारेचे अधिष्ठान असणे नसणे ही गोष्ट महत्वाची नाही, किंबहुना ते आवश्यकसुद्धा नाही. मानवी मनाचा प्रामाणिकपणा, समजूतदारपणा, चांगुलपणा व न्यायभावना पुरे होतील.
#वाचलेलं

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling