Ramesh Raktade Profile picture
प्रथम मी हिंदू आहे. मला 'हिंदू' असल्याचा गर्व आणि 'मराठा' असल्याचा अभिमान आहे. 'देव, देश आणि धर्म' कार्य हा एकच उद्देश... ।। जय हिंदुराष्ट्र ।।🚩🙏

Aug 1, 2020, 9 tweets

सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय...? आज असे विचारणाऱ्याला खानग्रेसी, आपिया, महाराष्ट्र द्रोही, देशद्रोही इ. ठरवले जाते. आमच्या मतांच्या जीवावर निवडून आलेले जर देव, देश धर्माचे कार्य अपेक्षेप्रमाणे करत नसतील व आम्ही त्यावर काही बोललो, लिहिले, -

#लोकमान्यटिळक

प्रतिक्रिया म्हणून व्यक्त झालो तर त्यांचे कार्यकर्ते जाब विचारणाऱ्यालाच पोलिसात देतात, मारहाण करतात.. इतकंच नव्हे तर सरकार विरोधात कोणी बोलू नये अन्यथा कारवाई होईल असे कायदे करतात.. सांगा ना कुठेय तुम्ही ज्या हक्काचे स्वातंत्र्य मिळवण्याची जी सिंहगर्जना केली होती ते स्वातंत्र्य??

तुमच्यानंतर बऱ्याच गोष्टी होत्याच्या नव्हत्या झाल्या हो. आम्हाला क्षमा करा. राष्ट्रहितासाठी, संघटनेसाठी तुम्ही सार्वजनिक केलेला गणेशोत्सव मतांच्या हुजरेगिरी करता मुद्दाम सरकारी नियमांच्या कात्रीत अडकवून ठेवलाय. गणेश मंडळे स्वतःच्या नावासाठी गणेशोत्सव प्रतिष्ठेचा करू लागलीयेत.

नेत्यांनी तर तुमचा गणेशोत्सव अक्षरशः व्यावसायिक करून टाकलाय. गणेशोत्सवाच्या तुमच्या मूळ हेतुलाच लोकांनी सुरुंग लावलाय. यंदा तर काय कोरोनाच्या साथीमुळे अनेक मंडळ गणपती बाप्पाच्या मूर्तीचीही स्थापन करणार नाहीयेत. हे यांचे गणेशोत्सव प्रेम.

शिवजयंती उत्सव तर तारीख आणि तिथीचा वादात अडकवून ठेवलाय. शिवरायांच्या इस्लामीकरणाचा डाव साधला जातोय. तुमच्याच सार्वजनिक गणेशोत्सवातुन प्रेरणा घेत बंगालात सुरू झालेला दुर्गापूजा उत्सवावर परकीय बांग्लादेशीयांची दगडफेक केली जाते.

तुमच्या डोळ्यादेखत शिवकर बापू तळपदे यांनी सर्वात प्रथम उडवलेले विमान आमच्या पाठ्यपुस्तकात राईट बंधूनी हायजॅक केलेय. तुमच्या सारखी निर्भीड पत्रकारिता करणारा कोणीही माईचा लाल या देशात नाही. शाळेत तर तुमचे चरित्र शेंगांच्या टरफलांच्या गोष्टी पलीकडे शिकवलेच जात नाही.

तुम्हाला लोकमान्य म्हणून का संबोधतात हेच आजच्या पिढीला ठाऊक नाही.

टिळक महाराज क्षमा करा. तुमच्या स्वर्गवासानंतर या देशाला राष्ट्राच्या, धर्माच्या नव्हे तर पक्षाच्या फायद्यासाठी कार्य करणारे अंधभक्त आणि चमचे मिळालेयत. तुम्ही स्वराज्य 'मिळवण्याची' सिंहगर्जना केली होती.

तुमच्या निधनानंतर आम्हाला स्वराज्य मिळालंय, आम्ही ते मिळवलेलं नाही आणि म्हणूनच आमच्या पिढीला तुमच्या त्यागाची जराही जाणीव नाही. क्षमा करा.. क्षमा करा....

आजच्या दिवशी तुमच्या चरणी वंदन करण्यापलीकडे आणखी काय करू शकतो? निदान तेवढे तरी तुम्ही केलेल्या उपकारांचे उतराई होण्याचे कर्तव्य निभावण्याचे भाग्य लाभेल. त्रिवार वंदन...!!!

|| जय हिंदुराष्ट्र ||

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling