#पितांगल्य.....!
महामयुरी ग्रंथात या लेणीचा उल्लेख "पितांगल्य" असा मिळतो तर टॉलेमी यांच्या ग्रंथात "पेट्रिगला" असा मिळतो सातवाहन यांच्या काळातील खोदलेल्या इ स पुर्व दुसऱ्या शतकातील पितळखोरा लेणी मराठवाड्यातील प्राचीन
लेणी समूह औरंगाबाद शहरापासून ७८
1)
कन्नड पासून १७ अजिंठा पासुन ८० वेरूळ पासून ३७ तर चाळीसगाव पासून ३२ कि मी वर आहेत.
लेणीचे दोन गट करता येतात उजवीकडचा पहिला गट १ते ९ दुसरा डावीकडचा १० ते १३ , ११ नंबर हा स्तूप गॅलरी आहे जसे आपण भाजे लेणीत पाहतो तसा.
पितळखोरा लेणीचा शोध पहिल्यांदा १८५३ मध्ये जेम्स विल्सन यांनी
2)
तर पुढे जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी या लेणीला भेट देऊन आपल्या The Cave Temple of India १८८० च्या ग्रंथात उल्लेख करतात, जेम्स फर्ग्युसन आणि बर्जेस यांनी काही ठराविक लेण्याचाच उल्लेख करू शकलेत कारण त्या नंतरच्या उत्खननातून नव्याने लेणी समूह उजेडात
3)
आल्या १९४१ मध्ये म गो दिक्षित यांनी, १९५८ साली तीन नंबरच्या लेणीतून चार नंबरच्या लेणीकडे जाणारा पायर्यांचा रस्ता व "संकरीन" हा यक्ष समोर आला.
महामयुरी या ग्रंथात "संकरीन" यक्षाचा उल्लेख मिळतो "संकरीन" यक्षाचा इथे वावर आहे व तो या लेणीत राहतो" असा तत्कालीन समज होता हा
4)
यक्ष आता दिल्लीच्या वस्तू संग्रहालयात आहे संकरीन यक्षाच्या हातावर दान लेख आहे
"कण्हदासेन हिरंणकारेन कता" म्हणजे कण्हदास नावाच्या सोनाराचे हे दान या यक्षा प्रमाणेच तीन नंबरच्या म्हणजे चैत्यगृहाच्या डाव्या बाजूला द्वारपालाचे शिल्प देखील सापडले आहे जे आज मुंबईच्या छत्रपती
5)
शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवले आहे मौर्य व शुंग काळातील डोक्यावर बांधणीचे असलेले विशिष्ट प्रकारचे पागोटे किंवा मुंडासे तसेच पेहेराव्यातील हसतमुख चेहर्याचा द्वारपाल आपले स्वागत करताना दिसतो विषेश म्हणजे या लेणीवर असेरीयन शिल्पकलेचा प्रभाव आपण स्पष्टपणे पाहू
6)
शकतो अजिंठा लेणी मधील काही लेण्या या लेणीच्या बरोबरीने खोदलेल्या आहेत.
इथे लक्ष वेधून घेते ती रांगेत उभे असलेल्या हत्तींची रांग तसेच हत्तींच्या आधी आपल्या मागच्या दोन पायांवर खिदळणार्या घोड्याचे शिल्प खूप कमी जणांनी पाहिले असणार तसेच हत्तीला धरून उभे असलेल्या
7)
माहुताचे भग्न अवशेष समोरील डेबरीज मध्ये असल्याने कोणाचाही दृष्टीपथास पडत नाही फक्त जिथे पूर्वी हा माहूत हत्तीला धरून उभा होता तिथे त्याच्या पायांचे अवशेष आढळून येतात ही लेणी आज जी आहे त्या पेक्षा चार पट वरून खाली खोदत आणली होती तिच्या समोरील फसाड आज जरी
8)
नामशेष झालेले असले तरी त्याचे अस्तित्वाच्या खुणा लेणीच्या वरच्या भागात आपण स्पष्टपणे पाहू शकतो.
१९५३ साली या लेणी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.
9)
#सूरज_रतन_जगताप
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली ,नवी मुंबई
९३२०२१३४१४
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
