मी अत्यंत भाग्यशाली आहे की मला अश्या पुण्यभूमीत जन्म लाभला ज्या भूमीत बहिणींचे, स्त्रियांचे रक्षण करण्यास वचनबद्ध होण्यासाठी संपूर्ण एका दिवसाचा उत्सव साजरा केला जातो.. स्त्रियांना इतका मान-सन्मान देणारा संपूर्ण विश्वात भारत हाच एकमेव देश आणि हिंदू हाच एकमेव धर्म आहे.
#रक्षाबंधन
आज हा बहीण-भावाच्या कोमल आणि पवित्र नात्याचा पवित्र सण सबंध भारतात साजरा होतोय.. आजच्या या पवित्र दिनी आपण सारे भाऊ मिळून शपथ घेऊ या की या देशातील प्रत्येक स्त्रीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असेल.
लव्ह जिहाद, धर्मांतरण या सारख्या विळख्यात अडकणाऱ्या प्रत्येक मुलीला, स्त्रीला आपलीच बहीण समजून तिला या विळख्यातून बाहेर काढण्याची शपथ आज घेऊ या.. त्या साठी ती या विळख्यात कशी अडकणार नाही यासाठी तिचे प्रबोधन करू या. शाळा कॉलेज, शेजारी-पाजारी, स्त्रियांना या विषयी जागृत करू या..
या देशात स्त्री कधीच अबला नव्हती. या भूमीला सबळ स्त्रियांचा पराक्रमी इतिहास लाभलाय. आजचीही स्त्री खरे तर अबला नाहीच. ती खमकी आहे. शूर आहे. समजदार आहे. तडफदार आहे. कर्तबगार आहे. व्यवहारी आहे. अश्या भगिनींना सोबत घेऊन इतर सर्व भगिनींना जागृत करू या.
भाऊ बहिणीच्या या पवित्र सणाच्या आणि केवळ हिंदूंच्याच असणाऱ्या या पवित्र उत्सवाच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...
|| जय हिंदुराष्ट्र ||
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
