Manas Shukla Profile picture
Finding bugs,for earning bucks. | Engineer | | हिंदू हित ~ राष्ट्र हित🚩| Tweets are personal.

Aug 5, 2020, 11 tweets

आज एक पोस्ट Viral झालेली वाचली. त्यात लिहिलं होतं की, आजच्या या भूमीपूजनाच्या प्रसंगी "बाळ" नावाच्या "बाप" माणसाचं नाव सुद्धा लक्षात असू द्या. जेव्हा बाबरी मशीद पाडल्यानंतर गुन्हे नोंदवत होते तेव्हा हेच "बाळासाहेब" स्वतः पुढे आले होते आणि तुमचे नेते मात्र तेव्हा "चहा विकत" होते.

मला मेसेज मध्ये कोणत्याच नावाची अडचण अशी वाटली नाही किंवा चुकीचं काही वाटलं नाही. जेवढं योगदान "बाळासाहेबांचं" होतं तेवढंच योगदान आमच्या "चहा विकणाऱ्या" नेत्याचं होतं, त्यात काही मतभेद नाही. पण राम मंदिरात कोणाचं किती योगदान आहे ? या विषयावर चर्चा होऊच शकत नाही. ज्या लोकांना शक्य

होतं त्या लोकांनी १९९२ मध्ये अयोध्येत जाऊन कारसेवा केलीच, आणि ज्यांना शक्य नव्हतं त्यांनी घर बसल्या आपल्या रामाला लवकरात लवकर घर मिळावं आणि आपल्या घरातला "कर्ता-धरता राम" सुखरूप घरी परतावा म्हणून करोडो लोकांनी प्रार्थना केली. या उदाहरणात दोघे समूहाचा उद्देश एकच, राम मंदिर.

राम मंदिर हा कधीच एका धर्माचा विषय नव्हता, नाहीये आणि नसेल. राम म्हणजे आस्था, भावना, श्रध्दा, प्रेम, भक्ती अशा मांगलिक नावांची भर पडतच राहावी असा खजिना. त्यामुळे धर्मात तेढ निर्माण व्हावी हा प्रयत्न कारसेवेच्या वेळी सुद्धा झाला नाही आणि आता सुद्धा नाही. फक्त मनातल्या रामाला घरात

ठेवणे हाच त्या मागचा एक उद्देश. ज्याच्यामुळे आपला परमार्थ सुरळीत सुरुय त्याला मात्र "अजूनही" वनवास का ? १४ वर्षे वनवास भोगल्या नंतरही इतके वर्ष "आपला राम" हा एका मंडपात ऊन, वारा, पाऊस झेलत उभा होता, त्याचं स्वतःच घर असताना सुद्धा. आपण एवढे मोठे नक्कीच नाही की देवाला न्याय देऊ

शकू, पण आपली श्रद्धा, आस्था आणि भक्ती मात्र खूपच मोठी आहे याचा प्रत्यय आज प्रत्येक भारतीयाला आला. १९९२ मध्ये जे कारसेवक होते त्यांच्या कडे बघून खरंच प्रेरणा येते मग ते शिवसैनिक असोत, संघ स्वयंसेवक असोत किंवा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असोत. अजूनही भरपूर संघटना यात होत्या

परंतु मुख्यत्वे या त्यातल्या काहीशा आहेत. त्या वेळेस मात्र संघटना हा एक "Platform" होता पण प्रत्येक जण मात्र "हिंदू" म्हणून यात सामील झाला होता. आता हिंदू म्हटलं की मग प्रश्न येतो की भारत धर्मनिरपेक्ष देश आहे त्यात हा धर्माचा अडसर कशाला ? ज्या पद्धतीत भारतात मुस्लिम बांधव ईद

साजरी करतात, ख्रिश्चन बांधव नाताळ साजरा करतात, शीख बांधव गुरू नानक जयंती साजरी करतात, बौद्ध बांधव बौद्ध पौर्णिमा साजरी करतात अगदी तशीच पण रामाच्या अस्तित्वाच्या लढाई साठी त्या वर्षी हिंदूंनी "दिवाळी" साजरी केली, यात काही गैर नाही. तो जो मार्ग त्यांनी निवडला तो चुकीचा होता,

अशी टीका या वेळेस झाली पण त्याची शिक्षा सुद्धा भरपूर लोकांनी भोगली आणि प्रायश्चिताला सामोरे गेले. प्रायश्चित झाले म्हटल्यावर त्या गोष्टीचा दोष कुठे उरत नाही आणि संविधानिक पद्धतीने जर तिला "Finishing Touch" दिला गेला तर खूप छान.

आज राम मंदिर भूमीपूजनाच्या वेळी भारतातील लाखो कारसेवक, त्यांचे परिवार, करोडो हिंदू परिवार, इतर धर्मीय सुद्धा आनंदाश्रू वाहून त्या भूमीपूजनाच्या शिलांवर त्याचा अभिषेक करत असतील, याची मला खात्री आहे. या परिस्थितीत सुद्धा अशा पद्धतीतले भूमिपूजन मात्र नक्कीच अनोखे असे आहे.

लवकरात लवकर मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन, कोरोना रुपी रावणाचा नाश होऊन, रामराया आपल्या घरात जेव्हा त्यांच्या भक्तांना भेटायला बोलवतील तेव्हा याची देही याची डोळा ते भव्य राम मंदिर बघताना डोळे पाणावले जातील आणि "जय श्रीराम" अशी आपसूक घोषणा दिली जाईल.

- मानस

#श्रीरामलला_विराजमान

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling