Manas Shukla Profile picture
Finding bugs,for earning bucks. | Engineer | | हिंदू हित ~ राष्ट्र हित🚩| Tweets are personal.

Aug 10, 2020, 13 tweets

#Tweet4Bharat

विषय- राष्ट्रीय एकात्मता

राम मंदिरावर सुरू असलेला विश्लेषणाचा आखाडा चांगलाच गाजला. वर्षानुवर्षे रखडलेला विषय आज पूर्णत्वास जातोय हे पाहून जनमानसात आनंदी आणि विशेषतः भावनिक लाट उसळी मारतेय. या निमित्ताने भारतातील एकात्मतेचा एक आलेख वर्धिष्णू होताना आपण बघत आहोत.

न्यायालयीन लढाईत बाबरी मशिदीचे मुस्लिम पक्षकार हे भूमीपूजनास निमंत्रित होते. राम मंदिर एका धर्माचा विषय नसून तो आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे याचे उदाहरण धर्मनिरपेक्ष भारताच्या वहीत लिहिले गेले. हिंदू,मुस्लिम,शीख,जैन,बौद्ध अशा विविध धर्मियांनी भूमिपूजनास साश्रुनयनांनी दाद दिली.

धार्मिक एकात्मता हाच एक मुद्दा नसून आज भारत प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय एकात्मतेच्या नेतृत्वाचा महामेरू होतोय. कोरोना महामारीच्या संकटात सर्व भारतीय एक होऊन प्राण पणास लावून या संकटाचा सामना करताय आणि झुंज देताय, हेच याचे उत्तम उदाहरण आणि भारत यशस्वी होण्याचे कारण आहे.

१९६५च्या इंडो-पाकिस्तानी युद्धात भारताची आर्थिक स्थिती ढासळली होती आणि तेव्हाचे पंतप्रधान स्व.लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीयांना उपवास करण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून धान्याचा पुरेसा साठा भारताकडे उपब्ध असेल, या भावनिक आवाहनाला भारतीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

लाल बहादूर शास्त्रींचा तो वसा आज नरेंद्र मोदी सुद्धा व्यवस्थित रित्या हाताळताय. सरदार पटेल यांच्या भव्य पुतळ्याच्या निर्माण कार्या विषयी मोदींनी केलेले आवाहन आणि लोकांनी दिलेला प्रतिसाद आज सुद्धा पुतळ्याच्या भव्यते सारखा आसमंतात घुमतोय.

भारत-चीन सीमावादा प्रसंगी भारत आणि भारतीय जनता ही खंबीरपणे पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहून सैनिकांचे मनोबल वाढवत होती. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या "आत्मनिर्भर भारत" या अभियानात भारतीय एकजूट होऊन भारतातील वस्तू आणि बाजारपेठ यांची उपलब्धता भव्य अशी करू पाहत आहेत.

अर्थशास्त्राची एकात्मता ही १जुलै २०१७ रोजी जेव्हा वस्तू व सेवा कराच्या रुपात उपलब्ध झाली तेव्हा अर्थशास्त्र आणि महसुलाचा पाया अधिकच भक्कम होण्यास मदत झाली. भारताने अर्थक्रांती करत जगाला दिलेला हा "GST"चा संदेश बोधात्मक अशा पद्धतीचा होता.

भारताची यशस्वी वाटचाल ही एकात्मता हा उद्देश घेऊनच झाली आहे, होत आहे आणि होत राहील यात शंका नाही. सैनिकांसाठी "वन रँक, वन पेन्शन" ही योजना अंमलात आणल्याने सैनिकांना सुद्धा याचा लाभ घेत आपले निवृत्ती नंतरचे आयुष्य अगदी सुखात व समाधानात जगता येणार आहे.

अन्नधान्याच्या पुरवठ्याबाबत भारत नेहमीच आपल्या गरीब व मोलमजुरी करणाऱ्या बांधवांचा काळजीवाहू पालक म्हणून भूमिका घेतो, आणि ते देशाचं कर्तव्य आहे. या बाबत एकात्मतेचा संदेश देणारे अभियान म्हणजे "One Nation One RationCard". भारताच्या कुठल्याही भागात रेशनकार्ड द्वारे पुरवठा शक्य झाला.

आरोग्य क्षेत्राला "डिजिटल" एकात्मता प्रदान करण्याकडे भारताचा कल दिसून येतो. या अनुषंगाने "One Nation One HealthCard" योजनेची घोषणा सुद्धा लवकरच होण्याचे संकेत दिसत आहेत. नागरिकांचे आरोग्य सरकारच्या प्राथमिक कर्तव्या इतकेच महत्त्वाचे असल्याने यामुळेसोयी सुविधा सुलभ उपलब्ध होतील.

आज राष्ट्रीय एकात्मता या विषयावर लिहण्याचा उद्देश एवढा की ही फक्त संज्ञा नाही, फक्त विषय नाही तर भारताने यशस्वीरीत्या सांभाळलेले शिवधनुष्य आहे. भारतात १६५२ पेक्षा जास्त प्रादेशिक भाषा व बोलीभाषा आहेत. वेगवेगळे धर्म त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळी संस्कृती आणि हे असून पण
+

आज सुद्धा "वसुधैव कुटुंबकम" या एका वाक्याखाली संपूर्ण भारत जोडला जातो हेच मोठे वैशिष्ट्य आतापर्यंत भारताने टिकवून ठेवले आहे. या वेळेस धर्म,जात,पंथ बाजूला ठेवून "भारतीय नागरिक" म्हणून इथले सर्व लोक एकत्र येतात आणि अभूतपूर्व शक्तीचा संगम दर्शवितात.

राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य अंगिकारून केलेली वाटचाल ही नेहमीच यशस्वी असते याचं एक ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझा भारत देश.

@iidlpgp

#Tweet4Bharat

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling