कुणाला माहितीय लुना?
पुणेकरांनी नाद केला. लुनाला थेट ‘डेक्कन क्वीन’ बरोबर रेससाठी उतरवलं!
दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन. ही फक्त मुंबई-पुणे-मुंबई धावणारी रेल्वे नाही तर गेली नव्वद वर्षे असंख्य पुणेकर चाकरमान्यांना वेळेत आपल्या नोकरीवर पोहचवणारा हा रथ आहे. वेग आणि वक्तशीरपणा
ही तिची ओळख आहे.
भारताची पहिली #सुपरफास्ट #ट्रेन.
ज्याकाळी पुणे ते मुंबई अंतर पार करायला बाकीच्या रेल्वे गाड्यांना ५ तास लागत हेच अंतर डेक्कन क्वीन पावणे तीन तासात पार करत असे.१ जून १९३० साली सुरु झालेल्या डेक्कनक्वीन कधीच वाफेच्या इंजिनवर चालली नाही. पहिल्या दिवसापासून
इलेक्ट्रिक इंजिनावर चालणारी पहिली प्रवासी गाडी, भारतातील पहिली डिलक्स गाडी, पहिली सुपरफास्ट गाडी, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी पहिली गाडी, महिलांचा व खानपान सेवेचा स्वतंत्र डबा असणारीही ही पहिलीच गाडी.
डेक्कन क्वीनच्या नावावर असे पहिले पणाचे अनेक विक्रम नोंद
आहेत. भारतातील मानाची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन क्वीनच्या नावे आणखी एक विचित्र विक्रम आहे.
“लुना कडून हरण्याचा विक्रम”
लुना कोणाला माहित नाही? पुणेकर फिरोदियांच्या #कायनेटिक #ग्रुप कंपनीने #जपानच्या #होंडाच्या सहकार्याने लुनाची निर्मिती केली होती. इटालीयन प्याजिओच्या
चिआओ नावाच्या गाडीची ही लायसन्स कॉपी होती.१९७२ साली ही गाडी लॉंच झाली आणि आल्या आल्या भारतभरात या गाडीची हवा सुरू झाली.वजनाला अगदी हलकी, छोटी सुटसुटीत बाईक सायकलला एक उत्तम पर्याय होती. पुण्यासारख्या सायकलींच्या शहरात तयार होणाऱ्या लुनाने झटक्यात मार्केट मारले. कित्येकांनी ही
गाडी बुक केली.
सुरवातीला अनेकांना शंका होती की,
भारतात अनेक ठिकाणी रस्ते कच्चे आहेत तर ही गाडी तिथे कशी टिकेल? लुनाला स्पीड असणार की नाही?
यासाठी फिरोदियानी लुनाची पब्लिसिटी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या.
टीव्ही वर्तमानपत्रात याच्या जाहिराती झळकू लागल्या. तरुणांना आकर्षित
करण्यासाठी क्रिकेट सामन्यावेळी
मॅन of the मॅच चे बक्षीस म्हणून लुना दिली जाऊ लागली.
प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील ,चंद्रशेखर ह्यांनीही लुना जिंकली होती.
10 वी 12 वी च्या बोर्डात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही लुना बक्षीस दिली जाऊ लागली.ह्यापेक्षा ही नवीन म्हणून लुना च्या वेगाची
माहिती सर्वाना मिळावी म्हणून डेक्कन क्वीन सोबत तिची शर्यत आयोजित करण्यात आली.
अनेकांना गंमत वाटली.50 CC ची ही मोपेड डेक्कन क्वीन शी स्पर्धा कशी काय करेल?
लोकांना हा 1 स्टंट वाटला पण फिरोदिया ठाम होते.
विधानपरिषद सभापती जयंतराव टिळक ह्यांचे हस्ते पुणे स्टेशनवरून शर्यतीच्या उद्घाटन
कार्यक्रम ठेवला आणि मुंबईत पोलिस आयुक्त ह्या शर्यतीचा शेवट पाहण्यास येणार होते
आणि हे जाहीर ही केले गेले.
सकाळी साडे 7 वाजता डेक्कन क्वीन सुटली.
त्याचवेळी टिळक ह्यांनी लुना ला हिरवा झेंडा दाखवला.
लुनास्वार ने जीव तोडून गाडी चालवली.
त्यावेळी आताचा क्सप्रेस वे नव्हता.
खंडाळा घाट
व इतर वळणावळणाचे रस्ते अशी कित्येक आव्हाने लुना समोर होती.
कित्येक पैजा लागल्या की लुना लोणावळा गाठू शकणार नाही.
सगळ्यांच्या अपेक्षाभंग करून लुना ने सर्व आव्हाने पार केली.
वाटेत मदत म्हणून 1 कार ही लुना बरोबर धावत होती पण त्या कारलाही काही वेळेस
लुना ला गाठणे कठीण होत होते.
लुना ने जेव्हा मुंबईत प्रवेश केला. तेव्हा सर्वाना आश्चर्य वाटले.
लुना तब्बल 15 मिनिटे डेक्कन क्वीन च्या अगोदर मुंबईत दाखल झाली होती.
50 CC च्या मोपेड ने डेक्कन क्वीन ला हरवले होते.
अशी ही
चल मेरी लुना
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
