@Jollyboy Profile picture

Aug 14, 2020, 7 tweets

बोध्दिसत्व.......!

इ स च्या पहिल्या शतकापासून मानवीय स्वरूपातील बुध्द मूर्ती तयार करण्याचे श्रेय गांधार नरेश बौध्द सम्राट कनिष्क यांना जाते त्या आधी तथागतांना प्रतिकांच्या माध्यमातून पुजण्याची थेरवादी परंपरा होती धम्म चक्र, स्तूप, खाली आसन, पद्म बौध्दी
1)

वृक्ष अशी ती प्रतीके होती.
इ स च्या पहिल्या शतकापासून गांधार शैलीतील बुध्द मूर्त्या मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागल्याने जनमानसात मूर्ती पुजणे हे रूढ झाले व प्रतीक पुजणे मागे पडू लागले हे संपूर्णपणे महायानी परंपरागत होते, महायानी पंथाने जशी बुध्दांची मूर्ती आणली तशीच
2)

त्यांनी "बोध्दिसत्वांची" मूर्ती देखील तयार करून घेतली.
"बोध्दिसत्व" ही पुर्णपणे महायानी संकल्पना ही संकल्पना बुद्धांच्या पाचशे वर्षानंतर जनमानसात रूजली त्याचे सारे श्रेय महायानी पंथाला जाते, बुध्द मूर्तीच्या बाजूला दोन बोध्दीसत्व असतात तत्कालीन जनमानसाचे आवडते
3)

देठा सकट कमळ हाती धरलेले सात्विक भाव चेहेऱ्यावर असलेले "बोध्दिसत्व पद्मपाणी" आणि दुसऱ्या बाजूला हातात वज्र धरलेले "बोध्दिसत्व वज्रपाणी" तसेच अन्य ठिकाणी अनेक चेहर्‍यांचे "बोध्दिसत्व अवलौकितेश्वर" आजही आशियाई देशांमध्ये यांना मोठ्या प्रमाणावर पुजले जाते, त्याच
4)

बरोबर खूप मोठ्या संख्येने गांधार शैलीतील "मैत्रेय बोध्दिसत्वांच्या" मूर्त्या उत्खननातून मिळालेल्या आहेत.

"बोधी" प्राप्त करणाऱ्या "मैत्रेय बोध्दिसत्वांची" ही संकल्पना गांधार शिल्पकलेमध्येच सर्व प्रथम साकार झाली राजपुरूषाच्या स्वरूपात बोध्दिसत्व दाखवले जातात,
5)

बोध्दिसत्वांच्या गळ्यात कंठहार अंगावर दागिने बाहुभूषणे कर्णभूषणे व केस संभारावरील अनेक अलंकार आहेत तर चेहेऱ्याभवती प्रभावलय दाखवण्यात येते , अनेक शिल्पांमध्ये बोध्दिसत्वांना भरदार मिशा दाखवण्यात आलेल्या आहेत त्यांच्या अंगावर उत्तरीय वस्त्र व धोतर असते
6)

मूर्तीची जडणघडण वास्तववादी आणि प्रमाणबद्ध असते आणि चेहेरा प्रौढ व्यक्तीचा असतो तर चेहेऱ्यावर गंभीर भाव दाखवले असतात......!
6).

#सूरज_रतन_जगताप

मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली , नवी मुंबई
९३२०२१३४१४

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling