विमुक्त Profile picture
योजना पूर्णत्वाच्या व्यग्रतेतच नवनिर्माणाचे बीज असते ! - शब्दज

Aug 14, 2020, 12 tweets

सत्य घटना
शनिवार पेठ
अप्पा बळवंत चौकाच्या अगदी जवळचा पडका वाडा,
किमान 200 ते 250 वर्षे जुना
पण अजूनही मालक,भाडेकरू राहतात
चिवटपणे

@patil_speaks23 @meerawords @MugdhaDate @TheDarkLorrd @ChinmayVijayVa1 @KaduAmol @PadmakarTillu
...तर वाडा माझ्या सख्ख्या काकाचा,माझ्या...

चांगला परिचयाचा!
वाड्याचा लालभडक लाकडी दरवाजातून आत शिरले की सहा फूट रुंद 25 मीटर लांब दगडी वाटेने सरळ चालत गेले की उजव्या हाताला पहिल्या मजल्यावर काकाचे राहते घर.ही वाट दिवसाही थोडी कमी प्रकाशाचीच असते

दारातून आत शिरल्यावर उजव्या हाताला लग्न कार्यालय आणि डाव्या हाताला

मीटर रूम आणि पहिल्या मजल्यावरील गाजमहालात म्हणजे एका सभागृहात पोचण्यासाठी अगदी अरुंद आणि उंच पायऱ्यांचा अंधारा जिना.त्या जिन्याच्या सुरुवातीलाच मीटर रूमला लागून दोघा तिघांना बसायला छोटासा कट्टा होता.

मिरा आत्या नाशिकची, ती सर्वच भावा-बहिणींना हौसेने भेटायला जायची

हा वाडा...

खरंतर त्याच्या भुताखेतांच्या खऱ्याखोट्या सगळ्याच कथांमुळे बदनाम,तरी आम्हाला कोणाला कधी काही न जाणवल्याने भीती वाटायची नाही,
आजही उजेड असताना वाटत नाहीच...
तर
अशीच एकदा कामे संपवून उशीर झाला तरी आत्या,काका-काकू ला भेटायला नाशिकहून पुण्याला आली होती...
@RakyaDadoos_
@Ok_Bharatiya

यावेळी विशेषतः काकूची(आमच्यात काकी नाही काकू म्हणतात)भेट घेण्यासाठी म्हणून आत्या आली होती.कारण तिचा याच वाड्यात अनेक वर्षे राहणारा भाऊ काही असाध्य व्याधीमुळे नुकताच मरण पावला होता तो एका पायाने अधू होता त्यामुळे काठीच्या आधाराने चालायचा,चालताना काठी त्याला दोन्ही हातांनी धरावी...

लागायची त्यामुळे चालताना काठीचा आवाज व्हायचाच.तो नेहमी त्या वाटेवर असलेल्या कट्ट्यावर बसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांशी आपुलकीने बोलायचा.वाड्यावर त्याचा मालकीहक्कासाठी शेवटपर्यंत दावाही होता.

रात्री अकराच्या सुमारास त्या लाल दरवाजापाशी आत्या पोचली.वाड्याचे दार क्वचितच बंद असायचे

कारण आत राहणाऱ्या बिऱ्हाडांना ज्या खोल्या दिल्या होत्या त्यांना दरवाजे होतेच

आत्या नेहमीप्रमाणे दरवाज्यातून आत शिरली, तिने मागे वळून दरवाजा लावायचा क्षणभर विचार केला पण कोणाला यायचे असेल तर राहूदे असे मनात ठरवून ती परत त्या दगडी वाटेवरून चालायला लागली,ही वाट रात्री पूर्ण

काळोखी असते,पौर्णिमेला चंद्र डोक्यावर असेल तरच चांदण्याचा प्रकाश पडून वाटेवरचे भक्कम पण चालून गुळगुळीत झालेले दगड चमकतात.
आत्या दोन पावले पुढे गेली तेवढ्यात तिला मागून हाक ऐकू आली,"वैनी!"
आत्याने चमकून मागे पाहिलं,तिला अंधारात अंधुक काहीतरी दिसलं,तिने विश्वासानेच,"हं?" म्हंटलं

तर ती व्यक्ती म्हणाली,"लावा साखळी,लावा... आणि मी येतो तुम्हाला पायऱ्यांपर्यंत सोडायला"
आत्याने आवाजातील मार्दव समजून निर्धोक होऊन दरवाजाकडे जाऊन साखळी लावली.वळून परत काकाकडे निघाली,तिला मागून 'त्याचा' परत आश्वासक आवाज आला,"हं चला चला" आणि 'तो' तिच्यामागून चालू लागला... काठीच्या

आधाराने चालल्याचा आत्याला आवाज येत होता पण वाड्यात इतर अनेकजण राहत असल्याने तिला काही संशय नाही आला. पायऱ्यांच्या बल्बचा प्रकाश सुरू होण्याआधीच परत आवाज आला,"मी जातो आता" आत्या,"अच्छा" म्हणाली आणि पायऱ्या चढून वर आली

काका-काकू TV पाहत होते,इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर झोपताना

दोघांना आत्याने विचारले"खाली दाराजवळच्या कट्ट्यावर कोण असतं रात्री?अंधारात पायऱ्यांपर्यंत सोबत केली आणि दाराची साखळीपण लावायला सांगितली मला"
काकूने विचारले,"तू पाहिलंस का त्याला?"
आत्या,"नाही पण लंगडा होता वाटतं...काठीचा चालताना आवाज येत होता"

काका आणि काकू ने

एकमेकांकडे क्षणभर पाहिलं,त्यांना काय ते समजलं,"जाऊदे,झोप तू आता दमली आहेस आणि उशीरही झाला आहे"

आत्यापण कमी पावसाळे पाहिलेली नव्हती.तिला कळून चुकले की तो 'तो'च होता.

त्या रात्री आत्या काकूसोबतच होती,झोपच नाही आली.उजाडल्यावर तिने चहासुद्धा न घेता वाड्यातून काढता पाय घेतला

समाप्त

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling