*🇳🇪🛑गौरव गाथा🛑🇳🇪*
भारत माता की जय वंदेमातरम आळते गावातील हुतात्मा गुंडु धुळा सुतार क्रांतिकारक अंतु गिड्ड,गैबी सुलतान नदाफ,कुशाभाऊ कुंभार,बाळु इब्राहिम पिंजारी हे देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत होते.आण्णांचा आदेश होता की,
इंग्रजांची सरकारी यंत्रणा,टपाल,तार, रेल्वे यंत्रणा तोडा मोडा नामशेष करा
त्यांच्या आदेशानुसार रुकडी रेल्वे स्टेशन जाळण्याचा बेत होता आमच्या मिटींगा आल्यात होत होत्या त्या नुसार 2ते 3दिवस अगोदर रोकेल चालु डबा आलमात आणून ठेवला होता त्या रात्री आलमप्रभु येथे जेवन करून नियोजन झाले
सर्वांनी ताकदीने प्रमाणे काम करायचे तारतंत्र तोडण्या साठी घन(मोठा हातोडा)नव्हता म्हणुन देवळात ला मोठा दगड डोक्यावर घेऊन सगळेजन पलीकडच्या बाजूने डोंगर उतरला रेल्वे स्टेशन गाठले तेथे 40लोक हजर होते
आपटबार आपटल्याने मोठा आवाज झाला.त्या सरशी भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देत,
त्या लोकांना बाहेर काढले तारतंत्र बाहेर काढूनफोडण्यात आला स्टेशनमास्तरचे कपडे काढून झाडाला बांधण्यात आले टपाल जाळण्यात आले येथुन पसार झाल्यावर तपासयंत्रणा राबविण्यात आली गोरसाहेब गावोगावी तपास करत होता हे कोणी केलं हे आळतेगावात सुध्दा कोणाला माहित नव्हत तरीही यांची कुणकुण लागली,
आणि घरादाराची झडती घेत त्रास देण्यात आला जेल झाली जेलमध्ये मारहाण ,पोटाचे हाल झाले त्यामूळे हुतात्मा गुंडु धुळा सुतार यांचे निधन झाले ते अविवाहित होते अशा वीर स्वातंत्र सैनिकांना कोटी कोटी प्रणाम आळते येथील महेश कोरे यांच्या मुळे हुपरी येथील हुतात्मा स्मारकावर,
सुतार यांचे नाव व गौरव गाथा या उप्लब्ध पुस्तकामुळे हा इतिहास कळला...
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
