आज १५ ऑगस्ट. भारताचा ७४ व्वा स्वातंत्र्य दिवस. पण आपण खर्या अर्थाने स्वतंत्र आहोत का? दुर्दैवाने भारताची फाळणी झाली आणि या फाळणीचे दुष्परिणाम आज आपण आजुन पण भोगत आहोत. काश्मीर आणि आकसाई चीन च्या संदर्भात.भारत भूमीची अखंडता जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत हे स्वातंत्र्य ..1/n
अपुर्ण मानले जाईल. योगी श्री अरविंद यांचे एक विधान यानिमित्ताने सांगावेसे वाटते ते अस म्हणतात की भारत हे एक अखंड राष्ट्र आहे आणि ते कधी खंडित करता येणार नाही. पण आपण खरच या मार्गाने मार्गक्रमण करून खंडित भारत अखंडित करू शकतो का? तर हो नक्कीच .
(2/n).
करण ज्या मार्गाने सध्याचा आधुनिक भारताची घौडदौड चालु आहे ते पाहता आपण लवकरच पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र भारताच्या अधिपत्याखाली आणु. आणि तसेच बलुचिस्तान आज फुटतो आहे का उद्या अस चित्रं सध्या पाकिस्तान मध्ये निर्माण झालय . ह्यामुळेच आपण योग्य मार्गावर आहोत हे यातून दिसते. (3/n)
त्याचप्रमाणे काही जणांना अस वाटल असेल की हे एवढा मोठ अखंड भारताचे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो का? तर आपण एक जवळ जवळ ४०० वर्षा पूर्वीचा इतिहास आठवावा. त्यावेळेस संपूर्ण हिंदुस्थान हा मुघल सल्तनते खाली भरडला गेला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची .. (4/n)
स्थापना करून अशक्य ते शक्य करून दाखवले. त्याचप्रमाणे इस्राएल सारख्या राष्ट्राने सततच्या होणार्या इस्लामिक आक्रमणामुळे आपले नष्ट झालेले ज्यू लोकांचे राष्ट्र पुनर्जीवित करून दाखवले. असे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत ज्या द्वारे आपण अखंड हिंदुस्तानचे महत्व समजू शकतो. (5/n)
सरतेशेवटी अटल बिहारी वाजपेयी यांची कविता आठवून मना मध्ये दृढनिश्चय करून आपण आपले अखंड भारताचे स्वप्न नक्की पूर्ण करू.
जय हिंद 🇮🇳 वंदे मातरम 🇮🇳
भारत माता की जय 🇮🇳🇮🇳
अखंड भारत श्रेष्ठ भारत || 🚩🚩
(6/n)
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
