@Jollyboy Profile picture

Aug 18, 2020, 6 tweets

"बेलापूर किल्ला"

बेलापूर च्या किल्लयाच्या संदर्भात आपल्याकडे खूप त्रोटक माहिती उपलब्ध आहे, उपलब्ध माहिती अनुसार जंजीर्याचे सिद्दी यांनी हा किल्ल्याचे बांधकाम केले, सिद्दी जे हबशी होते त्यांच्या पैकी "सहजादा वल बहादूर शहा जफर" यांचे या बांधकामाच्या संदर्भात नाव पुढे
1)

येते यांनी हा किल्ला दहा वर्षात पुर्ण करून घेतला म्हणजे १५६० ते १५७० पर्यंत याचे बांधकाम चालले सागरी सत्तेच्या दृष्टिकोनातून हा किल्ला महत्त्वाचा आहे.
सिद्दी च्या नंतर हा किल्ला पोर्तुगीज च्या ताब्यात गेला व त्यांच्या कडून चिमाजी आप्पा यांनी १७३३ मध्ये हा किल्ला मराठा
2)

साम्राज्यात पुन्हा समाविष्ट करून घेतला, चिमाजी आप्पा यांची शपथ होती की जर किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला तर ते बेल पानाची माळ अमृतेश्वर मंदिरात अर्पण करतील या शपथेची आठवण करून देत अमृतेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळते, पोर्तूगाली चर्च मधील एक घंटा इथल्या "गोवर्धीनी"
3)

मंदिरात पोर्तूगाली इतिहासाची साक्ष देत इथे आहे, २३ जून १८१७ पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांची सत्ता होती व त्या नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला , इंग्रजांच्या काळात हा किल्ला Bombay Presedinsy अंतर्गत येत होता १८१७ नंतर या किल्ल्याला उतरती कळा लागली आणि
4)

आज तो कसा बसा काही बांधकामाच्या अवशेषांच्या स्वरूपात मोडकळीस आलेल्या बुरुजाच्या स्वरूपात सिमेंटच्या जंगलात कसा शेवटच्या स्वरूपात आपल्याला पहायला मिळतो आज त्याची मालकी सिडकोकडे आहे .
5)

नवी मुंबईतील नव्या पिढीला या ऐतिहासिक ठेवी बद्दल माहिती व्हावी म्हणून हा प्रपंच.....!
6)

#सूरज_रतन_जगताप

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling