SWAPNIL K.K. Profile picture
Freedom, Equity, Integrity. स्वातंत्र्य, समता, बंधुता. फुले, शाहू, Ambedkar. संविधानवादी.

Aug 19, 2020, 5 tweets

दादर स्टेशन ला उतरून चालत सिद्धिविनायक मंदिराकडे जात असाल तर..फक्त डाव्या बाजूला जी दुकाने आहेत ती अशी 👇

कबुतरखान्या पासून बस स्टॉपच्या बाजूने डावी साईड

पाणीपुरीची गाडी

सँडविच गाडी

डोसा

घरगुती पोळीभाजी (काय तरी मराठी नाव आहे)

चप्पल दुकान

फोटो दुकान

परत वेगवेगळे फ्लेवरवाली पाणीपुरी

एक जुनं दुकान आहे (शेंगदाणे-नमकीन वैगरे)

मिठाई दुकान

मसाले दुकान

इडली (फुटपाथ वर गाडी आहे)

आणि हार फुलांची किती दुकाने आहेत विचार करू शकत नाही..

वरती मला आठवणारी दुकाने दिली आहेत अशी असंख्य दुकाने आहेत.

जेव्हा मंदिरे चालू होतील तेव्हा ह्या सगळ्या दुकानदार आणि त्यांच्याकडे काम करणारी कामगार लोकं आहेत त्यांच्या हाताला काम भेटेल, पगार भेटेल मग तर त्याचं घर चालेल.

ह्या सगळ्या चेन मधे सर्वसाधारण माणूस कामगार म्हणून आहे. ज्याचं हातावर पोट आहे गेली 4-5 महिने घरात बसून असलेला माणूस

अजून किती दिवस बिनपगारी बसेल ? पोट भरलेल्या, बँक बॅलन्स असणाऱ्या लोकांनी इतर लोकांच्या भाकरीचा विचार करावा मग आपलं पक्ष/सरकार प्रेम पाजळावे..नाय तर सरकारला सांगून कमीत कमी महिना 5000/- ₹ अश्या हातावर पोट असणाऱ्या लोकांना द्यावेत.. जमेल का ?

मंदिरं आणि त्यावर आधारित व्यावसाय/रोजगारासबंधी मोठी उलाढाल आपल्या राज्यात होते. आंदोलनाच्या मागचा हेतू लक्षात घ्यावा.

©️Sushant Kamble.
#ISupportPrakashAmbedkar

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling