संस्कृत भाषा अत्यंत मधुर , प्राचीन ज्ञानामृत असणारी आहे. बऱ्याच भाषांचा उगम संस्कृतमध्ये सापडतो. आयुर्वेद, पशुपक्षी, आहारविहार, नीतीमुल्ये यांचं चपखल वर्णन सुभाषितांमध्ये आढळतं. चरक, सुश्रुत,वाग्भटांच्या आरोग्यचिकित्सा आयुर्वेद आजही उपयुक्त आहेत. १२वी नंतर
हा अभ्यास थांबला १/n
या थ्रेडमध्ये काही दुर्मिळ आणि आवर्जून वाचावे अशा महत्त्वपूर्ण ग्रंथाची माहिती देतेय.
कालिदासाचे मेघदूत हे महाकाव्य आजही सर्वोच्च रचना मानली जाते.
बाण- हर्षचरित
गुढाण- बृहतकथा
सोमदेव- कथासरितसागर
जयदेव-गीतागोविंद
दंडी- दशकुमारचरित्र
२/n
शुद्रक- मृच्छकटिक
भट्टनारायण- वेणीसंहार
नागानंद- रत्नावली
विशाखादत्त- मुद्राराक्षस, भट्टीकाव्य, माघकाव्य, किरातार्जुनीय, नैषधचरित
सुबंधू- वासवदत्ता
भर्तृहरि- शृंगारशतक, नीतीशतक, वैराग्यशतक.
३/n
कौटिल्य यांचा 'अर्थशास्त्र'हा ग्रंथ आजही वित्त संस्थांसाठी मार्गदर्शक ठरतो.
आर्यभट्ट कृत आर्यसिद्धांत
वराहमिहीर- बृहत्संहिता
भास्कराचार्य- सिद्धांत शिरोमणी
सर्पशास्त्र आणि कीटकशास्त्र यांचा उल्लेखनीय संदर्भ पतंजली महाभारत, सुश्रुत संहिता आणि शतपथब्राम्हण या ग्रंथात आढळतो.४/n
संस्कृत भाषाकोशासाठी अमरसिंहाचा अमरकोश हा आजही अद्वितीय आहे.
हेमचंद्र- अभिधानचिंतामणी
हलायुध- अभिधानरत्नमाला
श्रीयादवप्रकाशाचार्य- वैजयंती कोश
मेदिनाकार- मेदिनी कोश
५/n
वरील ग्रथंसूचि मारुती चितमपल्ली यांची पुस्तके, सुभाषितमाला, संस्कृत पाठ्यपुस्तके (८-१२) यांतून साभार.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
