Dr. Nishigandha Profile picture
निशिगंधा Dentist मनातलं वादळ शब्दांतून मांडायचा प्रयत्न views are personal #व्यथांच्याकथा
Apr 29, 2021 5 tweets 2 min read
@LetsReadIndia
#महाराष्ट्रदिन
#खाद्यसंस्कृती
विषय जिव्हाळ्याचा आहे म्हणल्यावर व्यक्त व्हायला हवं. महाराष्ट्रात परिपूर्ण आहार जितका समृद्ध आहे तितकेच महत्त्वाचे इतर पदार्थ सुद्धा आहेत. चटण्या लोणची या जेवणाची अधिक लज्जत वाढवतात.१/५ लाल तिखटाची शेंगदाणा चटणी, काराळ्याची चटणी, जवसाची चटणी, तिळाची चटणी अत्यंत आवडीची. काही ठिकाणी कवठाची, चिंचेची गोड चटणी करतात. ओला नारळ किसून केलेली चटणी तर अप्रतिम. पेरू चिरून त्याला फोडणी देऊन केलेली चटणी तोंडाला पाणी आणते.२/५
Apr 29, 2021 7 tweets 2 min read
पणजी, आजी आणि आई तिघींकडून जुन्या उत्तमोत्तम पाककला शिकायला मिळाल्या. साध्या जिन्नसांपासून तयार केलेले महाराष्ट्रीयन पदार्थ आजही तेवढेच प्रिय. हिवाळ्यात हुलग्यांपासून बनवलेलं तिखट माडगं, शिंगोळे तर पणजीची खासीयत. १/n
#महाराष्ट्रदिन
@LetsReadIndia आजी लाल जोंधळ्यांची जाड भाकरी करायची त्यावर पाट्यावर वाटून केलेला हिरव्या मिरची लसणाचा झणझणीत खर्डा, तेल मिरची कच्चा कांदा टाकून केलेले तोंडलावणी म्हणजे केवळ अमृतचं. दोडका वाटून त्यात हिरवी मिरची ,लसूण टाकून दोडक्याचा ठेचा व्हायचा बाजरीच्या भाकरीसोबत खायला मजा यायची.२/n
Sep 23, 2020 15 tweets 3 min read
Covid-19 या आजाराने सध्या थैमान घातलं आहे. याच आजारातून बरे झालेल्यांना अजूनही बरीचशी लक्षण दिसत आहेत. आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात हाती आलेले‌ काही निकष या थ्रेडमध्ये मांडत आहे. कोविड होऊ न देणं आणि मास्क सॅनिटायझर चा वापर करणं हाच सध्या रामबाण उपाय आहे.१/n
खालील लक्षणे:- लक्षणे सौम्य ते तीव्र आढळून येतात
१.मेंदूशी संबंधित लक्षणे- चक्कर येणे, विसराळूपणा, दुःखी वाटणे ,गोंधळ होणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी, निद्रानाश, चव आणि वासाची संवेदना बदलणे, अनामिक भीती वाटते, चिडचिडेपणा.
२.केस गळणे.
३.अंगदुखी, थंडी वाजून ताप येणे,अंग थरथरणे, वजन कमी होणे.२/n
Sep 22, 2020 5 tweets 1 min read
आपण: आपले ताणतणाव- एक चिंतन - अंजली नरवणे
मनावर विजय- एकनाथ ईश्वरन ( वैशाली जोशी)
चार शब्द द्यावे घ्यावे- संजीव परळीकर
मुलांवरचे संस्कार- शं.व्यं.काश्यपे
द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग- डेव्हिड श्वार्त्झ ( प्रशांत तळणीकर)
शांततेने काम करा- पॉल विल्सन (सुनंदा अमरापूरकर)
१/४ धीरुभाईझम- ए.जी.कृष्णमूर्ती (सुप्रिया वकील
प्रतिकूलतेवर मात- ए.जी.कृष्णमूर्ती(सुप्रिया वकील)
डबेवाला- श्रीनिवास पंडीत (सुप्रिया वकील)
संतकवी तुकाराम: एक चिंतन- डॉ.निर्मलकुमार फडकुले.
थेंबातल आभाळ- प्रवीण दवणे
वय वादळविजांचं -प्रवीण दवणे
चैतन्याचे चांदणे- डॉ.यशवंत पाटणे
२/४
Aug 25, 2020 5 tweets 1 min read
मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,राजमाता जिजाऊ यांच्यावरील सर्व पुस्तके वाचनीय.
मी मलाला- मलाला युसुफजाई
मैत्रेयी - अरूणा ढेरे
नवी स्त्री- वि.स खांडेकर
आई समजून घेताना- उत्तम कांबळे
बियॉन्ड अग्ली- कॉन्स्टन्स ब्रिस्को
१/५ होय मी स्त्री आहे- मनोबी बंदोपाध्याय झिमली मुखर्जी पांडे
कटिंग फ्री- सुप्रिया वकील
डॉक्टर म्हणून जगताना- डॉ सुलभा ब्रम्हनाळकर
इंद्रा नूयी जीवन चरित्र- अन्नपूर्णा/ प्रसाद ढापरे
Becoming- Michelle Obama
हा यें मुमकीन हैं- डॉ तरू जिंदाल.
गार्गी अजून जिवंत आहे- मंगला आठलेकर
२/५
Aug 23, 2020 6 tweets 2 min read
संस्कृत भाषा अत्यंत मधुर , प्राचीन ज्ञानामृत असणारी आहे‌. बऱ्याच भाषांचा उगम संस्कृतमध्ये सापडतो. आयुर्वेद, पशुपक्षी, आहारविहार, नीतीमुल्ये यांचं चपखल वर्णन सुभाषितांमध्ये आढळतं. चरक, सुश्रुत,वाग्भटांच्या आरोग्यचिकित्सा आयुर्वेद आजही उपयुक्त आहेत. १२वी नंतर
हा अभ्यास थांबला १/n ImageImage या थ्रेडमध्ये काही दुर्मिळ आणि आवर्जून वाचावे अशा महत्त्वपूर्ण ग्रंथाची माहिती देतेय.
कालिदासाचे मेघदूत हे महाकाव्य आजही सर्वोच्च रचना मानली जाते.
बाण- हर्षचरित
गुढाण- बृहतकथा
सोमदेव- कथासरितसागर
जयदेव-गीतागोविंद
दंडी- दशकुमारचरित्र
२/n Image
Aug 12, 2020 7 tweets 4 min read
बदामी लेण्यांतून दिसणारा सुंदर नजारा..
समोर बदामी किल्ला
अप्पर आणि लोअर शिवालय, तटबंदी बांधलेला तलाव 😊😊❤
#भटकंती Image बदामी लेणी - ५ ते ७ शतक..
एकूण चार लेणी आहेत. Image
Aug 9, 2020 4 tweets 2 min read
निलगिरी पर्वतरांग परिसरात उंच शिखर दोडाबट्टा इथं राहणारी आदिवासी जमात 'तोडा'. हिमालय पर्वत आणि निलगिरी पर्वत यांच्यात साम्य असण्याच आणि इथल्या उत्क्रांतीचं गूढ फक्त याच आदिवासी लोकांना ज्ञात आहे. म्हशींचे कळप हे यांचं दैवत आणि सर्वस्व. १/४
#मराठी
#जागतिक_आदिवासी_दिन वेताची छडी वगळता इतर कोणतेही हत्यार ते वापरत नाही. खोटं न बोलणारी, चोरी न करणारी, बहुपत्नीत्व असणारी जमात.लोकसंख्या नियंत्रण आश्र्चर्यचकित करणारं ‌.पिरॅमिड रूपी घर, मधल्या जागेत तिरिरी हा गोठा असतो.अंधाऱ्या खोलीत देवघर असावे, तेही अद्याप गूढ.तिथे स्त्री विवाहीत पुरूष यांना बंदी.
Aug 9, 2020 7 tweets 1 min read
वाचन का आवडत?
मला नेहमीच नव्या गोष्टींच कुतूहल वाटत आलंय.खाण्याचही प्रचंड वेड. वाचताना वेगवेगळ्या प्रातांशी ओळख व्हायची. तिथल्या पदार्थांचं एखादं नाव किंवा वर्णन लेखकानं केलेलं असतं. त्या पदार्थाची शोध घेण्याची सवय लागली.१/n Image दुधाच्या दशम्या, पाट्यावर वाटलेल्या मिर्च्यांच्या खर्डा, नाचणीची भाकरी,शेवग्याच्या पाल्यांची भाजी, कांद्याची पातळ भाजी असे नानाविध प्रकार समजले.त्यातले काही पदार्थ तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विविध रानमेवा उंबर,रानकामुण्या, लाल पिंपर, भोकरं अशी रानफळांची ओळख झाली.२/n
Aug 5, 2020 13 tweets 5 min read
आत्मचरित्र हा आवडता लेखनप्रकार.प्रत्येक माणूस नेहमी शिकवून जातो. लहानपणी 'श्यामची आई' या साने गुरुजी लिखीत पुस्तकातून संस्काराचं बाळकडू मिळालं. वीणा गवाणकर यांच्या' एक होता कार्व्हर' या पुस्तकातून व्यगंत्वावर मात करत संशोधनाची पताका फडकवणाऱ्या कार्व्हर यांच्या जिद्दीची कथा समजली. ImageImage वीणा गवाणकरांच्या 'गोल्डा' पुस्तकातून इस्राएलच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांच्या अलौकिक यशाची आणि समाजसुधारणेच्या कामाची माहिती मिळते.अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला नमविणाऱ्या ' फिडेल कॅस्ट्रो' यांच्या नेतृत्वगुणांची आणि बेधडक वृत्तीची ओळख अतुल कहाते यांच्या पुस्तकातून होते. ImageImage
Jul 15, 2020 5 tweets 3 min read
काश्मिरी चहाची पाने, साखर, गुलाबपाकळ्या,बदाम, दालचिनी, वेलदोडे यांचा काश्मिरी काहवा चहा, पाणी, पिस्ता, बदाम, गुलाबपाकळ्या,सोडा,मीठ, चहाची पाने,दूध घालून केलेला काश्मिरी नन/ पिंक चहा साच्यात बसवलेल्या चहाला वेगळा अर्थ देतात.
तुम्हाला असे भन्नाट चहा माहित आहे?
#चहाप्रेमी
#मराठी इराणी चहा/ हैदराबादी दम चहा -
हंडीमध्ये पाणी चहा पावडर साखर टाकून त्याला कणीक लावून बंद करतात. ४५ मिनीटे तो उकळतात. दुसऱ्या भांड्यात दूध,मावा आणि विलायची घालून दूध आटवतात.४५ मिनीटांनी कपात कोरा चहा आटवलेलं दूध यांचे थर दिले जातात. दम बिर्याणी प्रमाणेच दमदार चहा.
#चहाप्रेमी
#मराठी