एकदा वाचुन तर बघा डोळ्यात पाणी येईल...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक काय करायचे त्याचे ज्वलंत उदाहरण-
१८ जूलैला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर
येथे एका परिषदेसाठी गेले 'डिप्रेस्ड क्लास
ऑफ इंडिया ' ह्या आपल्या पक्षाचे नाव
1)
बदलून 'शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ऑफ इंडिया '
असे नामकरण त्यांनी केले .
त्यावेळी त्यांनी तिथे भाषण केले .
भाषण झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब
संध्याकाळी काही कार्यकर्त्यांसोबत
आयोजित केलेल्या स्वागत
पार्टीसाठी जात असताना अचानक
रस्त्यावर त्यांच्या समोर फाटलेल्या -
विटलेल्या
2)
जुनेऱ्यातील कापडी अंगावर
असलेल्या चार-पाच वृद्ध
स्त्रिया त्यांना आडव्या आल्या .
" आमचे आंबेडकरबाबा कुठं हायती जी ? "
एकीने किलकिल्या डोळ्यांनी पाहत
बाबासाहेबांनाच विचारले .
त्या स्त्रियांची अवस्था पाहून
बाबासाहेब क्षणभर स्तब्ध उभे राहिले .
" मीच आहे आंबेडकर " बाबासाहेब
3)
धीरगंभीर आवाजात म्हणाले .
त्या स्त्रिया बाबासाहेबांच्या एकदम
पुढे आल्या . अंगावरील
फाटक्या जुनेऱ्याच्या ओटीतून
झेंडूच्या फुलांचे हार
काढले .आणि मोठ्या प्रेमाने
आणि आदराने ते हार बाबासाहेबांच्या
गळ्यात घालू लागल्या. बाबासाहेब
त्यांच्यापेक्षा उंच असल्यामुळे,
त्या माऊलींच्या
4)
हातातले हार गळ्यात
घालून घेण्यासाठी खाली वाकले .
" आमी गरीब हावोत , बाबा .
तुमच्या सभाचं तिकीट घेण्यासाठी पैसे
नोयते . म्हणून तुमची वाट पाहत येथीच
कवाच्या उभ्या हावोत बगा .
तुमी बाहेर याल तवास तुमचं दर्शन घेऊ म्हणत
व्हतो.
पह्यल कंधी तुमाले पाह्यल नोयतं , म्हणून
ओळखलो
5)
नाई बापा ,म्हणून तुमालेस पुसले
का आमचे बाबा कोन्ते हायत म्हणून . "
बाबासाहेबांनी त्यांना विचारले , " मग
पैसे नसतांना तुम्ही हे हार कसे काय
आणलेत ?"
त्या म्हणाल्या "
सकाळी सकाळी रानात जाऊन
गवताचा भारा आणलो . तो गावात
इकला बापा. त्याच्या पैशाचाच हा हार
घेतला जी.
6)
" सगळ्यात वृद्ध
स्त्री ,म्हणाली "
पहाटेच्या पारी जंगलातून
लाकडाची मोळी आणलो अन
ती गावातल्या वाण्याला इकून
त्याच्या दामाची फुलं हायत बापा ही.
"
घराची रया अंगण सांगते म्हणतात ,
त्याप्रमाणे त्या स्त्रियांचे दारिद्र्य
त्यांच्या कपड्यांवरून दिसत होते. पण
त्यांच्या पुढ्यात
7)
साक्षात
बाबासाहेबांना पाहून त्यांचे मन हरखून गेले
होते. जणू त्यांची अनेक
वर्षांची तपश्चर्या फळाला आली होती.
त्यांच्या त्या नितळ निर्वाज्य
वात्सल्याच्या अनुभूतीमुळे
बाबासाहेबांना गलबलून आले.
त्यांच्या डोळ्यात
आसवांनी गर्दी केली .
बाबासाहेबांना दिवसभरात
हजारो लोकांनी
8)
त्यांच्या गळ्यात
टाकलेल्या वेगवेगळ्या सुवासिक
फुलांच्या मोठमोठ्या हारांपेक्षा त्या माऊल्यांनी त्यांच्या गळ्यात
घातलेल्या झेंडूच्या फुलांचे हार मौल्यवान
वाटले . त्यांच्या भावना दाटून
आल्या गहिवरल्या जड आवाजात
बाबासाहेब त्या स्त्रियांना म्हणाले , "
माझी आई मी लहान असतानांच
9)
मरण
पावली .तिचा मायाळू हात
माझ्या पाठीवरून फिरला नाही .
ती कशी होती तेही मला आठवत
नाही .पण माऊलींनो , तुम्हांला ,
तुमच्या ममतेला पाहून मला वाटते ,
ती निश्चितच तुमच्यासारखी प्रेमळ
आणि मायाळू असली पाहिजे .
मी तुम्हांला निश्चयपूर्वक सांगतो ,
मी जसा शिकून मोठा झालो तशीच
10)
तुमच्या मुलांनाही शिकण्याची संधी उपलब्ध
करून देईन .
माझ्या समाजाला या नरकयातनांतून
बाहेर काढेन . माझ्या या ध्येयात जर
मी अयशस्वी झालो तर
स्वतःच्या डोक्यात
बंदुकीची गोळी घालीन . "
ह्या जातीयवादी व्यवस्थेबद्दलची' चीड
' बाबसाहेबांच्या शब्दा - शब्दांतून जाणवत
होती.
11)
माझ्या बाबासाहेबांनी सर्व बहुजन समाजाला दोन्ही हातांनी भरभरुन दिले. ज्या काळात अस्पृश्य दलितांना शिक्षण मिळत नव्हते त्या काळी तुम्हा आम्हा लोकांना शिक्षणाचा हक्क मिळून देण्यासाठी
12)
जीवाचं रान केलं त्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मात्र आज शिकलेला बहुजन समाज व इतर कृतघ्न ST,NT,OBC समाज पूर्णतः विसरलेला आहे!!!
!जयभीम ! !! जयभारत !! !!! नमो बुद्धाय !!!
#Aditya_wele
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
