@Jollyboy Profile picture

Aug 28, 2020, 6 tweets

"इंडिका"

जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर भारतात झालेल्या लढाईत शरीरावरच्या जखमा चिघळून मृत्यू पावला.
भारताचा जो भाग जिंकला होता त्यावर आपला सेनापती "निकेटर सेल्यूक्स" ह्यांची नेमणूक करून मायदेशी परतत असतांना रस्त्यात मृत्यू पावला होता.
1)

अलेक्झांडर ह्याची मृत्यू होताच सेल्युकस निकेटर ह्याने जिंकलेल्या भागाचा राजा म्हणून स्वतःला घोषित करून घेतले.
नंतरच्या काळात सेल्युकस निकेटर आणि चंद्रगुप्त मौर्य ह्यांच्यात लढाई झाली व या लढाईत सेल्युकसला पराभव स्वीकारावा लागला होता.
भारताचा जो भाग अलेक्झांडरने जिंकला
2)

तो परत चंद्रगुप्त मौर्य यांनी आपल्या राज्याशी जोडून घेताला होता.
पराभव पदरी पडल्याने सेल्युकसला चंद्रगुप्त मौर्य ह्यांच्याशी "तह" करावे लागेल होते, या तहात त्याला त्याच्या मुलीचे म्हणजे "हेलेनाचे" लग्न चंद्रगुप्तांशी करून द्यावे लागेल होते.
काही रक्कम खंडणी म्हणून पण द्यावी
3)

लागली होती व आपला राजदूत म्हणून "मेगस्थनीजला" मौर्यांच्या दरबारी अनेक वर्षे ठेवावे लागले होते.
या तहात चंद्रगुप्त मौर्य यांनी सेल्युकसला पाचशे हत्ती दिले होते.
मेगस्थनीज ( ३०४ ई पू ते २९९ ई स पू ) भारतात निकटर सेल्यूक्स चा राजदूत म्हणून चंद्रगुप्त मौर्य ह्यांच्या दरबारात
4)

अनेक वर्षे राहिला.
मेगस्थनीजची राजदूत म्हणून ज्या वेळेस नेमणूक करण्यात आली तेव्हा तो "अलेक्झेंडरीया" या भागात होता. म्हणजे पाकीस्तान आणि अफगाणिस्तान च्या सीमा भागात होता तिकडून त्याची बदली भारतात करण्यात आली होती.
मेगस्थनीज ह्याचे अनेक वर्षे भारतात वास्तव्य होते.
5)

अनेक वर्षांपासून भारतात राहत असल्याने मेगस्थनीज याने
"इंडिका" नावाचे ग्रंथ लिहिले.
या ग्रंथात भारता विषयी विस्तृत माहिती उपलब्ध होती.
6).

#सूरज_रतन_जगताप

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling