उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अन अवघ्या शिवसैनिकांना आभाळ ठेंगणे झाले, कशी जिरवली या अविर्भावात वावरत होते. पण एकामागून एक अशी काही वादळं आली की नेमकी जिरवली की जिरली अजूनही महाराष्ट्राला कळेना!
शिवसेना कशी चालत होती याच्या खूप खोलात जायला नको, पण मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य अशी +
काहीतरी चालत होती असं माझ्या माहितीत आहे. उद्धव ठाकरेही तसे आदेशच देत होते, कारण ती त्यांची परंपरा आहे, होती.पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी बदलायला हवं होतं, कारण इथे केवळ आदेश चालत नाहीत, तर ज्यांना आदेश द्यायचे असतात त्यांच्या सोबत कींबहुना त्यांच्या पुढे तरी चालावं लागतं+
त्याला "नेतृत्व" म्हणतात. घरात बसून कोणीही नेतृत्व करू शकत नाही. राज्याची धुरा खांद्यावर आल्यावर ते नेतृत्व चांगले करू शकले असते पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांना अजूनही आपण कोण कोण आहोत आणि कोणता जिरेटोप आपल्या डोक्यावर आहे हे कळतच नाही. ज्यांनी बसवलं ते शरद पवार आणि सोनिया गांधी+
हेसुद्धा हतबल असावेत!(अजून दोन महिन्यासाठी😅) कारण एखाद्या माणसाला सत्ता देऊ शकतो, पण कशी चालवायची हे त्यांना कळायला तर हवं.
आजोबा लहानपणी आळशी माणसाची एक गोष्ट सांगायचे, म्हणजे इतका आळशी होता की स्वतः काढून तर जांभूळ खातच नव्हता,पण वाऱ्याने मिशीत पडलेलं जांभूळ सुद्धा खायला+
त्याला जिवावर यायचं" अशी सगळी ती तथाकथित गोष्ट होती. ती आठवली अचानक...असो.
आता उद्धवजींनी सत्ता तर मिळवली. जो काही दगाफटका केला, संस्कृती, विचार आणि मर्यादा सोडली, तिलांजली दिली ती सत्ता त्यांना लखलाभ होवो. पण सत्ता नेमकी कशासोबत खायची आणि कशी वापरायची हे मात्र विसरले आहेत.+
गैरवापर होतोय.
एकेकाळी सामान्य माणसाला शिवसेना आधार वाटायची, आज शिवसेना जुलूम का वाटते? कुठेही काहीही घडलं तर पहिल्यांदा शिवसेनेच्या शाखेत माहिती व्हायचं अन मदतही तिथून व्हायची अशा आख्यायिका आम्ही ऐकल्या, त्या लहानपणी! आता ती शिवसेना, शिवसैनिक अन तो विचार का दिसत नाही?तेही सोडून+
द्या, कदाचित कामाची पद्धत बदलली असेल म्हणूया पण "शिव"नावाची सेना अचानक "बाबर" नावाला साजेसं वागताना राज्यातल्या मराठी अस्मितेचा, मराठी माणसांचा मराठी संस्कृतीचा प्राण तळमळतोय त्याचं काय? सत्ता यासाठी असते का?
लोकं म्हणतात, सत्ता मिळाल्यावर समाजाच्या भल्यासाठी राबवता येईल, चार+
चांगली कामे करता येतील, अडलेली लोकांची कामे करू अशी मानसिकता साधारणपणे व्यक्तीची असते. पण इथे तर एकप्रकारे राज्यातल्या सामान्य माणसांवर अन्याय, जुलूम, जबरदस्ती करण्याची चेकलिस्ट आहे की काय असं सगळं जंगलराज सुरुय! अन त्याला सरकारचे अभय आहे, खुद्द सरकार तसं जंगलराज राबवत आहे.+
यामध्ये ना राष्ट्रवादी मागे आहे ना काँग्रेस. पण त्याचं नेतृत्व मात्र शिवसेना करतेय कारण नाड्या शिवसेनेच्या हातात आहेत. (नेमक्या नाड्या काकांकडे आहेत हेही मी विसरलेलो नाही 😉)
उद्या जर कोणी शिवसैनिकांनाच विचारलं की, तुमची सत्ता होती राज्यात, महाराष्ट्रासाठी काय केलं? तर काय आहे+
उत्तर? काय केलं नेमकं? दूरदृष्टी, निर्णयक्षमता, विकासकामे याचा तर पत्ताच नाही तुमच्याकडे, अभ्यासूपणा ही बस्स की बात नाही. पण सामान्य माणसांच्या मनात तरी कुठे ममत्वाची भावना तुम्ही निर्माण केलीय? उलट होती ती घालवली हे नाकारता न येणारं सत्य आहे.
सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचं+
(महाविकास आघाडीचं) काम काय तर बघा 👇
जो माणूस सरकार विरोधात, उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलतो त्यांच्याकडे जाऊन त्याचं टक्कल करणे!
जो माणूस उद्धव ठाकरेंच्या कामावर टीका करतो त्याला धमक्या देणे! शिव्या देणे.
जो माणूस शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंनी मिळवलेल्या सत्तेच्या लाचारीवर+
बोलतो, भावना व्यक्त करतो त्याला बेदम मारहाण करणे!
जो माणूस अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार काही विचार व्यक्त करतो, विरोध करतो त्याला बंगल्यावर नेऊन मारणे, मारणाऱ्या मंत्र्याला वाचवणे.
साधूंना पोलिसांच्या डोळ्यादेखत जमावाने ठेचून मारणे, आणि ठाकरे सरकार त्यावर कोर्टात आरोपपत्रच दाखल+
करत नाही.
एका महिलेला थोबाड फोडण्याची धमकी देणे, अन तिचे ऑफिस पाडणे.
जे न्यूज चॅनल निर्भीडपणे मत मांडतात त्यावर सभागृहात हक्कभंग आणणे, त्यांच्या 2 पत्रकारांना 4 दिवस झाले अटक करणे.
आपले अपयश झापण्यासाठी पत्रकारावर थेट गुन्हे दाखल करणे.
गुन्ह्याचा तपास करायला आलेल्या उच्च +
अधिकाऱ्याला सहकार्य न करणे.उलट त्याला कॉरंटाईन करून त्रास देणे.
याला सरकार चालवणे म्हणतात का?अहो ही तर मोगलाई झाली, गुंडाराज झालं हे. शिवसेना नेमक्या कोणत्या तालात आहे, कोणत्या विचारात आहे कळतच नाही!
एक निकालासह उदाहरणही तुमच्या समोरच आहे की. कदाचित आक्रस्ताळेपणा करणारे शिवसैनिक+
हे विसरले असावेत म्हणून फक्त आठवण करून देतो, मनसेच्या राज ठाकरेंचे मनसैनिक मागच्या एक वर्षांपूर्वी काय करायचे आठवा? सामान्य माणसांनी मनसे किंवा राज ठाकरेंच्या विरोधात काही केलं, बोललं, लिहिलं की जाऊन मारायचे. माफी मागायला लावायची, दबाव टाकायला. आणि दहशत निर्माण करायची! त्यानंतर+
ज्या काही निवडणुका झाल्या तर तेव्हा काय मिळालं मनसेला? राजकीय त्यांची कुवत नव्हती वगैरे ते तर सोडूनच द्या, पण सामान्य माणसांच्या मनात कोरडा आपलेपणा तरी कुठे उरलाय? रसातळाला जाणं काय असतं ते मनसेकडे बघा!तसं काँग्रेसकडेही पण बघू शकता तुम्ही... सेनेचं असंच सुरू राहिलं तर हीच अवस्था+
सेनेची होणार नाही कशावरून?
जेवढं दाबाल तेवढं उसळणार हा तर निसर्गाचा नियम आहे. कालचीच घटना घ्या, जे व्यंगचित्र एका व्हाट्सएप ग्रुपला फॉरवर्ड केलं म्हणून एका देशासाठी सेवा केलेल्या जेष्ठ निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी बेदम मारलं, मुळात देशासाठी आयुष्यभर काम +
करणाऱ्यालाही शिवसेनेने सोडले नाही हे गंभीर आहे. आणि त्यानंतर काय झालं तर जी पोस्ट फॉरवर्ड केली म्हणून मारले तीच पोस्ट राष्ट्रीय न्यूज चॅनेल जाहीरपणे दाखवू लागले आणि सर्व मीडियात ते व्यंगचित्र व्हायरल झालं की बघा बघा, यासाठी मारलं आहे. मग सेनेने मिळवलं काय यातून? उलट ट्विटरवर+
ट्रेंड चालला, "#उद्धव_इस्तिफा_दो" हा ट्रेंड भारतामध्ये आज टॉपला होता.
मला जेव्हा ही मारहाण घटना कळली तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आठवले, ज्यांनी आयुष्यभर आपल्या कुंचल्याच्या आधारे अनेकांना फटकारे दिले, त्या माणसामध्ये एक व्यंगचित्रकार म्हणून प्रचंड ताकद होती. पण आज त्यांनी+
स्थापन केलेल्या पक्षालाच एका व्यंगचित्राची भीती वाटते हे अपयश आहे की एका कर्माचे वर्तुळ?
कंगना राणावत चे ऑफिस पाडले, केवळ द्वेषातून ती कारवाई केली, खरंतर कंगना चे ऑफिस पाडकाम असेल किंवा कालचे मारहाण प्रकरण असो. यातून शिवसेनेने मिळवलं तर काही नाहीच पण उद्धव ठाकरे आणि सेनेचा+
लोकांच्या मनात असलेला आदर स्वतः संपवला, जो जेसीबी सूड भावनेने तिथे ऑफिसवर चालली तो जेसीबी निवडणुकीत लोकं नाही चालवणार का? कोणत्या विषयात किती इरेला पेटायचं हे राजकीय पक्षाने तरी ठरवायला हवं असतं. किमान ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी तरी मर्यादा बाळगाव्यात अशी अपेक्षा असते.+
अजून एक विषय सातत्याने येतो, तुम्ही मुख्यमंत्र्यांना सन्मान द्या, आदर द्या, पदाची गरिमा बाळगा. या गोष्टी सगळ्या ठीक आहेत, ते जपलं पाहिजेच. पण पंतप्रधान पदालाही काही मान, सन्मान, आदर, गरिमा असते की नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची तिरडी उचलो आंदोलन याच शिवसेनेने केलं होतं. इतकी+
माणसं कशाला - मोदींच्या मयताला" या घोषणा शिवसैनिकांनीच दिल्या होत्या. अमितजी शहांना अफजल खानाची उपमा याच शिवसेनेने दिली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि आजही अत्यंत हीन दर्जाची टिपण्णी याच शिवसेनेचे कार्यकर्ते करत असतात. त्यांचे नेतेही करतातच. उलट ज्या मुखपत्रातून+
शिवसेना पदाच्या गरिमा आणि सभ्यतेच्या गोष्टी करते त्याच वृत्तपत्रात संपादकीय सुद्धा काही अश्लील भाषेत आणि हीन दर्जात लिहिलेलं आहेत. हे कसं विसरायचं? निदान शिवसेना हे टाळू तरी शकली असती. सन्मान मागून मिळत नसतो, पण घ्यायचा असेल तर द्यायलाही शिकलं पाहिजे!
असो, सत्ता ही जनसेवेसाठी+
असते, सत्तेत आज आहोत, उद्या नसणार, सत्तेचा मज यायला लागला, अति व्हायला लागलं की माती होत असते, कारण हे निसर्गाची प्रमाणं आहेत. शिवसेनेने "शिव"सेने प्रमाणे रहावं, जनसेवेला समर्पित आणि जनतेला उत्तरदायी असाल तर आणि तरच भविष्य असतं, बिहारात लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांनी+
सत्तेत असताना जे केलं ते आज शिवसेना महाराष्ट्रात करतेय, आणि बंगालमध्ये तर ममता बॅनर्जीनी यापेक्षा वेगळं काय केलं? करताहेत? खरंतर, सत्ता कायमस्वरूपी नसते, राजकीय पक्ष हा समाजाला बांधील असतो एवढं जरी सद्सदविवेक जागृत ठेऊन कार्यरत राहिलं तरी पुरेसं आहे.
बाकी, राज्यात उद्धवजींनी+
नवीन रेकॉर्ड केलं आहेच, आता आपल्या राज्याच्या नावावर एक मिलियन कोरोना रुग्णांचा आकडा आहे, रुग्णांना जागाच नाही, बेड शिल्लक नाहीत, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाहीत, उलट केंद्राने दिलेले 60 व्हेंटिलेटर गायब झाले आहेत, अम्ब्युलन्स मिळतच नाही, डॉक्टर काळ्या फिती लावून काम करताहेत,+
मराठा आरक्षण राज्य सरकारने हाताने घालवून लाखो मराठा युवकांचे भविष्य उध्वस्त केले, भ्रष्टाचार, जोमात सुरू आहे, मारामारी, दरोडे जोरदारपणे सुरूयत,शेतकरी शेवटच्या घटका मोजतोय, दुधाला भाव नाही म्हणून दूधउत्पादकांनी ठोकलेली बोंब उद्धवजींना ऐकूच येत नाही, सुशांत सिंग मृत्यू प्रकरणातील+
आरोपींना वाचवणे सुरू आहे, पुराने उध्वस्त झालेला विदर्भ धाय मोकलून रडतोय....आणि काही शिवसैनिकांनी सत्ता यांच्यासाठी वापरायची सोडुन, यांच्या मदतीला धावून जायचे सोडून कंगना राणावत चे फोटो बाथरूमच्या भिंतीवर लावले आहेत. बस्स, बाकी सगळं आलबेल आहे!🙏🙏
- विकास विठोबा वाघमारे
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
