Chandrashekhar Jagadale Profile picture
Raconteur

Sep 13, 2020, 7 tweets

इसरुन येदना म्हन्नारांच्या पानी पानी
सावकार खातूय माज्या मढ्यावरच लोणी
रावाचा रंक जाहला दुष्काळाच्या भडीमारानं
जीव झालाय कवडीमोल लटकायच्या पर्यायानं

(१)

म्हातारीगत भाव पिकांचा आकसून गेला
खताबियांनी खिसा माजा फाटून गेला
हमीभावाची गाडी कधी घावलीच न्हाई
कोरडी पाईपलाईन आन काळी भेगाळल्याली आई
गावातल्या लोडशेडिंगला खरच तोड न्हाई
कुनालाच पुढा-यागत वाईट खोड न्हाई

(२)

आगीतन फुफुट्यात तसं पोरीच लगीन
समदच गहान सावकारीत रानं माळं दागीनं
ऐरावत रत्न थोर तसं पोरीच सासर
हुंड्यापाई इकलं लाखमोलाच शिवार

(३)

शाळा कालेजाची फी जणू चाललो बाजारा
कर्जबाजारी बापाचा पोर अडानी -हायाला
ईक घेतल्याबिगर मला वाटच दिसना
रेनव्याच्या वज्यान लाडू गोडच लागना

(४)

कर्जमाफीच धोरन न्हाई डोस्क्यात शिरलं
निस्त टीवीवर पॅकेज काई म्हाईत कूट झिरपलं
हुंबरा वाड्याचा जप्तीची खेटरं
आता कुटं जायाचं म्या
वसुलीच्या भेनभेन वश बुडला
आता कसलं आलय भ्या

(५)

कापडं फाटकी कंठ दाटूनिया आला
नशिबाचा डावसुदिक निसटून गेला
रडायला पन न्हाई आधाराची कूस मला
भाऊ शहरातला ईसरला कसा आपुल्या भावाला
(६)

आज माज्यासाठी दावा थोडी तुम्ही बांधिलकी
माज्या गाण्याकडं जरा समद्यांनी ध्यान द्या
सानभूतीपरिस मला आधारच द्या....

(अंत)

- चंद्रशेखर जगदाळे

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling