Chandrashekhar Jagadale Profile picture
Feb 12, 2022 24 tweets 4 min read
हरवलेला भारत..

या देशात किंवा जगातच उघडपणे भांडवलदारांची तळी उचलता येत नाही. तसे झाल्यास समाजाच्या सर्वच थरातून त्याला विरोध होतो. याचे कारण काय तर - बव्हंशी भांडवलशाही ही शोषणावर आधारित व्यवस्था आहे. अशा उद्योगधंद्यांना मानवी आयुष्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आणि (१) भौगोलिक साधनसंपत्तीवर एकहाती वर्चस्व गाजवायचे असते. या भावनेतूनच Monopoly-मोनोपॉली ह्या संकल्पनेचा उदय झाला असावा. मोनोपॉली आली म्हटलं की कामगार, नोकरदार आणि ग्राहकांचे शोषण आलेच. सामान्य जनतेला ह्या व्याख्या माहिती नसल्या तरी अशा संकल्पना त्यांच्या मनात कुठेतरी खोलवर (२)
Jan 30, 2022 21 tweets 4 min read
आजचा योगायोग बघा ना.. देशातल्या सर्वच विरोधी पक्षांनी पेगॅससवरुन टीकेची झोड उठवली आहे आणि गांधींची पुण्यतिथीपण आजच.... आजघडीला कोणत्याही शहाण्या राजकारण्याला हे माहितीच असेल की पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांची mother organization यांच्याकडे अमर्याद सत्ता आहे.
त्या सत्तेचा (१ ) दुरुपयोग करून ते प्रत्येक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींवर आज ना उद्या पाळत ठेवतीलच, हेसुद्धा त्यांनी आधीच गृहीत धरले असणार.पेगॅससच्या निमित्ताने ते प्रकरण वर आले एवढेच. सत्ताधारी पक्षाच्या way of working ला ते साजेसेच आहे.
(२)
Jan 29, 2022 14 tweets 3 min read
साखरेचा इतिहास फार जुना आहे. अथर्व वेदातही तिचा उल्लेख आहे असं वाचलेलं एका पुस्तकात. ऊस आणि साखरेचा जन्म भारतातलाच असे मानले जाते. संस्कृत मध्ये साखरेच्या एका भागाला "खंड" असे संबोधण्यात आले होते. मुस्लिम राज्यकर्ते ते ख्रिश्चन राज्यकर्ते असा प्रवास करत अमेरिकेत त्या शब्दाचा (१) इंग्रजी शब्द "Candy" असा झाला.
साखरेच्या नादात मानवी इतिहासाला आणखी एक दुर्दैवी वळण लागले. साखरेच्या अतिशय फायदेशीर व्यापारात लागवडीसाठी नवे नवे भाग शोधत पोर्तुगीज खलाशी - Henry the Navigator हा आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन धडकला. याचे कारण अरबस्तान सोडून (२)
May 24, 2021 15 tweets 3 min read
एरव्ही छत्रपतींच्या नावाने मतं मागणारे बहुजनांचे नेते हे गिरीश कुबेरांनी शिवशाहीच्या इतिहासाचा विपर्यास करूनही आणि राज्यात सत्तेत असूनही शांत आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपचे स्थानिक व राष्ट्रीय नेते राजरोसपणे खोट्या बातम्या समाजमाध्यमांमध्ये (१) पेरत आहेत. छ. शिवाजी, छ. संभाजी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर इ. अशी लोकं की ज्यांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा लोकांची बदनामी जातीय समाजशक्तींकडून आज उघडपणे सुरू आहे. आता एक नवीन ट्रेंड आलाय तो असा की (२)
May 13, 2021 12 tweets 2 min read
आज रमजान ईद..! प्रत्येक सणाशी संबंधित अशी एक आख्यायिका किंवा घटना असतेच.
इस्लामी कालगणनेनुसार रमजान हा नववा महिना. या महिन्याच्या सत्ताविसाव्या रात्री मक्केजवळच्या हिरानामक गुहेत इस्लामचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांना पहिला साक्षात्कार झाला आणि (१) त्यांच्या मुखातून कुराणाचा पहिला संदेश प्रकटला. हा संदेश ज्ञानसाधनेचा व त्याच्या प्रसाराचा होता. आज किंवा शतकानुशतके मुख्य प्रवाहात मध्ययुगीन इतिहास सांगताना Islamophobia कसा पेरता येईल याची काळजी घेतली जात आहे. मध्ययुगातल्या सरंजामशाहीच्या काळात आक्रमक राज्यसंघर्षाकडे आणि (२)
Apr 30, 2021 22 tweets 4 min read
'आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत दाभोळकरांचे नकोत' अशा आशयाचे ट्विट भाजपाचे अधिकृत पदाधिकारी अवधूत वाघ यांनी केले आहे. आता ह्या पक्षाचा पॅटर्न सांगतो तुम्हाला. समाज जेवढा जाती धर्मात दुभंगलेला असेल तेवढा भाजपला राजकीय फायदा जास्त होतो. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि बहुजनांच्या (१) सुदैवाने गांधी, आंबेडकर, नेहरू अशा असंख्य विचारी नेत्यांमुळे भारताचे संविधान अजूनतरी ह्यांच्या डोक्यावर आहे. संविधानाची चौकट उघडपणे मोडणे अजूनतरी संघ किंवा भाजपला शक्य नाही. मग असे आश्रित आणि उपकृत लोक शोधायचे की ज्यांना फुटकळ पदं दिल्यावर ते समाजात त्यांच्या पक्षाचे धार्मिक,(२)
Apr 24, 2021 16 tweets 3 min read
मी IT मधे ज्या क्लायंटसाठी काम करतो ती आस्थापना नेदरलँडसची आहे आणि माझ्या टीममधले क्लायंट साईडचे सहकारी अमस्टरडॅम ह्या शहरात राहतात. कामासोबत इतरही गप्पा होतात नेहमी. Covid मधे लोकं कशी नियम पाळत नाहीत ह्यावर बोलणं सुरू होतं. बोलता बोलता एक सहकारी म्हणाला की (१) इकडे अमस्टरडॅममधेही जमावबंदी आहे मात्र तरीही गर्दी आहेच. तिथल्या एका चर्चमधे नियम मोडून प्रार्थनेसाठी तब्बल ३०० लोकं जमली होती आणि ही गोष्ट लक्षात येताच पत्रकार तिथे गेल्यावर लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. साधारणपणे त्याच आठवड्यात आपल्याकडे कुंभमेळा पार पडला, (२)
Mar 10, 2021 12 tweets 2 min read
माझी साऊ :-

माझ्या आजीचं नाव सुभद्रा. सांगलीतील तुरची ह्या गावी १९४४ साली शेतकरी कुटुंबात जन्म, ७ अपत्यातील सगळ्यात मोठी त्यासोबत भावंडं सांभाळायची जबाबदारी आलीच. शिकण्याची अचाट इच्छा होती तिला. माझे पणजोबा जास्त शिकले नसले तरी शिक्षणाचं महत्त्व जाणून होते. (1/n) डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या founding members पैकी एक. त्यामुळे आजी खूप शिकत गेली. हिंदी राष्ट्रभाषा पंडीत पदवी मिळाली सोबत सुवर्णपदक तेपण ६० च्या दशकात. कबीराचे दोहे म्हणजे तिचा आवडता विषय; मी आजोळी गेल्यावर अंगणात गाडीतून उतरलो रे उतरलो (2/n)
Dec 19, 2020 4 tweets 2 min read
माझं मूळ गाव सांगलीतलं आहे. तू कुठला आहेस माहिती नाही. मी तिथं लहानपणापासून राहिलोय आणि तू खूप चुकीची माहिती पसरवतोयस. आमच्याकडे रामनवमीचं भजन म्हणायला शिरगावचे शाहणूर नदाफ(पिंजारी) उर्फ शान्नूर भई यायचे आणि त्यांचे सहकारीही मुस्लिम होते. त्याच गावात पीर बाबाचा उरुस होतो (१) की जेव्हा सगळं गाव जत्रा करतं. रेवणसिद्धला जाऊन ये एकदा, तिथं मंदिराचा रंग परंपरेनुसार मशिदीसारखा हिरवा असतो.
कडेगावचा मोहरम व ताबूत विसर्जनाला राज्यातून लोकं येतात. इस्लामपूरच्या संभू आप्पाची यात्रा, माझ्या आजोळचा उरुस अशी शंभरएक उदाहरणं असतील सांगली जिल्ह्यात (२)
Nov 16, 2020 10 tweets 4 min read
आज डॉ. श्रीराम लागूंची जयंती आहे. ते नेहमी त्यांच्या मित्राने (शंभू मित्रा) सांगितलेला मंत्र सांगायचे, "Actor should be an Athlete Philosopher" आणि खूप तर्कनिष्ठपणे त्याचा अर्थही समजवायचे. डॉक्टरकी सोडून अभिनयाचे अनभिषक्त सम्राट झाले मात्र
(१) चित्रपटसृष्टीच्या so called glamour च्या कोणत्याही व्याख्येत त्यांची राहणी बसत नव्हती. जब्बार पटेल, नसिरुद्दीन शहा, शंभू मित्रा, विजय तेंडुलकर असो वा निळू फुले किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील कुणीही असो; अभिनयाचा मापदंड म्हटलं की एकच नाव डॉक्टर लागू..! (२)
Sep 13, 2020 7 tweets 3 min read
इसरुन येदना म्हन्नारांच्या पानी पानी
सावकार खातूय माज्या मढ्यावरच लोणी
रावाचा रंक जाहला दुष्काळाच्या भडीमारानं
जीव झालाय कवडीमोल लटकायच्या पर्यायानं

(१) म्हातारीगत भाव पिकांचा आकसून गेला
खताबियांनी खिसा माजा फाटून गेला
हमीभावाची गाडी कधी घावलीच न्हाई
कोरडी पाईपलाईन आन काळी भेगाळल्याली आई
गावातल्या लोडशेडिंगला खरच तोड न्हाई
कुनालाच पुढा-यागत वाईट खोड न्हाई

(२)
Aug 31, 2020 4 tweets 1 min read
सत्ता टिकवायची असेल तर अर्थव्यवस्थेचं अपयश लपवायला धार्मिक तेढ वाढवणं हा एकच पर्याय राहीलाय आता त्यांना. लक्ष ठेवा, लोकांना जागृत करा. GDP Rate हा वाढीचा दर असतो उदा. ४%,५% म्हणजे जरी तो धिम्या गतीनं वाढला तरी धोकादायक स्थिती मानली जाते, इथं तर २२% नी घटलाय GDP आपल्या देशाचा. (१) १९२९ च्या जागतिक महामंदीत जे लोक तरुण होते त्यांची अख्खी पिढीच बरबाद झाली होती. अर्थशास्त्रात त्यांना Lost Generation म्हणतात. आपण तरुण ह्या शतकातली Lost Generation आहोत. आपली जबाबदारी हजार पटींनी वाढली आज. शिक्षण, मतदान, शिस्त अशा आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला बदलून (२)
Jun 24, 2020 13 tweets 2 min read
नोकरीत मन का लागत नाही ?
Job Satisfaction नाही, कामामधे रस नाही, नोकरी करायची म्हणून करतो, जॉब करतो रे पण मन लागत नाही, का जन्माला आलोय असं वाटत ऑफिसमधे ? असे खूप सारे प्रश्न माझ्यासारख्या ९० च्या दशकात किंवा त्यादरम्यान जन्मलेल्या ब-याच तरुण मुलांना मुलींना पडतात. (1) त्यामागचं सर्वात जास्त जाणवलेल कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय. मी IT मधे गेली 5 वर्षे काम करतोय त्या अनुषंगाने हे मुद्दे मांडलेत.
१. Henry Ford आणि Frenderick Taylor ह्या दोघांनी जेव्हा Assembly Line चा शोध लावला त्यामागची त्यांची धारणा अशी होती की जास्तीत जास्त Surplus-वाढावा (2)