Ramesh Raktade Profile picture
प्रथम मी हिंदू आहे. मला 'हिंदू' असल्याचा गर्व आणि 'मराठा' असल्याचा अभिमान आहे. 'देव, देश आणि धर्म' कार्य हा एकच उद्देश... ।। जय हिंदुराष्ट्र ।।🚩🙏

Sep 14, 2020, 9 tweets

जर कंगनाची बाजू घेणारे भाजपाई ठरत असतील तर कंगनाच्या विरोधात बोलणारे 'दाउदा'ई का ठरू नयेत? फुकाच्या मराठी अस्मितेच्या नावाखाली 'दाउदा'ई होऊ नका..

#KanganaRanaut

जर भाजप कंगनाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अंशतः मदत करत असेल तर आपण असे समजायला पाहिजे की भाजप बॉलिवूड मधील ड्रग माफियांच्या विरोधात उभी राहण्याचा प्रयत्न करतेय. तरीही नका करू भाजपचे समर्थन. घाला भाजपला शिव्या. पण कंगनाला तर साथ द्या..

ती अशी होती. ती तशी होती. तिचे "असे-तसे" फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तुम्ही तुमची लायकीच दाखवून देत आहात. किती नीच मानसिकतेचे आहात तुम्ही? तिचे तसले फोटो म्हणजे काय तिच्या जीवनाचा अविभाज्य अंग नाहीये रे मूर्खांनो. ते तिच्या व्यावसायिक अभिनयाचा भाग आहेत. होते...

महेश भट्ट सोबतचा तिचा एक फोटो पाहिला. त्यात तिला का कोसताय? हल्ली बॉलिवूड मध्ये असले प्रकार केल्याशिवाय कोणाला स्थिर होताच येत नाही हा विचार का नाही मनात येत? कोसायचं असेल तर महेश भट्ट आणि बॉलीवूडला कोसा ना. "कास्टिंग काऊच"वर बोलताच ना तुम्ही? की माहीत नाहीये हा प्रकार?

कंगनाला बोलण्यापेक्षा "कास्टिंग काऊच"साठी महेश भट्टच्या अटकेची मागणी करा ना. फक्त कंगना सोबत त्याने असे केले असेल का? अजून किती मुलींना त्याने असे स्वतःच्या वासनेत अडकवले असेल? स्वतःच्या मुलीला किस करणारा हा नराधम त्याच्या विरोधात बोला ना..!

चला, तरीही ती वाईटच होती असे दोन मिनिटे समजूया. पण आपल्या भूमीत वाल्याचा वाल्मिकी झालाय. ती सुधारली असेल तर? सुधारायचा प्रयत्न करत असेल तर? तुम्हाला दाऊदशी संबंध असलेला सत्तार चालतो. त्याला निमूटपणे स्वीकारता. पण कंगनाची इस्लामिक बॉलीवूड विरोधातील लढाई नकोय? वाह रे पक्षीय हिंदू.!

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी CBI चौकशी राज्य सरकारला का नकोय? काय कारण? याचा विचार करा. कर नाही तर डर कशाला? उलट मी तर म्हणतो एक मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरेंनी सुशांत सिंह प्रकरणी स्वतः CBI चौकशीची मागणी करून दूध का दूध आणि पानी का पानी केले पाहिजे..

करा आत्मपरिक्षण..! पक्षीय भक्तीत इतके वाहून जाऊ नका. पक्ष नाही, राष्ट्र सर्वप्रथम. पक्षाचा नाही, राष्ट्राचा ध्वज मिरवा. धर्माचा ध्वज मिरवा..

आणि हो, आत्मपरीक्षण करूनही कंगनाला समर्थन म्हणजे भाजपला समर्थन आणि शिवसेनेला विरोध असे जर तुम्ही निष्कर्ष काढत असाल तर एक दिवस तुम्ही तुमच्या हाताने पक्ष डुबवणार आहात हे मात्र नक्की...

।। जय हिंदुराष्ट्र ।।

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling