vikas waghamare Profile picture
जिल्हा सरचिटणीस, भाजपा सोलापूर ग्रामीण🌷 युवा ग्रामपंचायत सदस्य, वाघोली, ता.मोहोळ

Sep 15, 2020, 7 tweets

मराठा आरक्षण संदर्भात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीचे देवेंद्रजी फडणवीस यांना राज्य सरकारने आमंत्रण दिलेलं नाही.
एकीकडे परवाच आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले होते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यात आल्यानंतर सर्वपक्षीय बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार.
मुळात+

देवेंद्रजींना सोबत घेतल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही कारण अभ्यास करणं हे तुम्हाला झेपणारी गोष्ट नाही.
भाजपा बद्दल केवळ द्वेष पसरवण्याचे काम काही मीडिया आणि सरकारमधल्या व्यक्ती करत आहेत. आज काही बातम्या अशा होत्या की "देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याने मराठा आरक्षण+

विषयाची बैठक रद्द होणार आहे." मात्र देवेंद्रजींना मुळात राज्य सरकारने बैठकीचे निमंत्रणच दिलेले नाही, जर बैठकीचे निमंत्रण मिळाले तर आज देवेंद्रजी बिहार वरून परत येणार आहेत, त्याच क्षणी बैठकिला उपस्थित राहू शकतात. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजींना फोन+

करून मराठा आरक्षण विषयात मदत करण्याची विनंती केली आणि देवेंद्रजींनी तात्काळ उद्धवजींना शब्दही दिला की, "सरकार जी काही सकारात्मक भूमिका घेईल त्याला पूर्णतः सहकार्य करणार आहे."
मग इतके होऊनही, भाजपाने, देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त करूनही नेमकं काय अडलं आहे की भाजपला यातून दूर+

ठेवण्याचा प्रयत्न होतोय!
मग एकीकडे फोन करून मदत मागायची, दुसरीकडे बैठकीलाच बोलवायचे नाही, मग उलट मीडियात बातम्या द्यायच्या, अन संभ्रम निर्माण करायचा. याचं नेमकं कारण काय? का हे मुद्दामहुन केलं जातंय? भाजपला आरक्षणाचे श्रेय मिळावे हा भाजपाचा हेतू नाही, पण मराठा समाजाच्या पाठीत°+

महाविकास आघाडीने जो खंजीर खुपसला आहे ती चूक पुन्हा करू नका,ही विनंती आहे. मराठा बांधवांना न्याय देण्यासाठी आणि हक्काचे आरक्षण देण्यासाठी आतातरी महाविकास आघाडीने कपटी, वाईट राजकारण थांबवावं! मराठा आरक्षण देणारे हे देवेंद्र फडणवीसच आहेत, त्यामुळे ते कधीही चुकीची भूमिका घेणार नाहीत+

शेवटच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणार हे सांगणारे देवेंद्र फडणवीस आहेत,आरक्षण स्थगित झाल्यावर व्यथित होणारे सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत हे विसरू नका.विनाकारण तुमचं अपयश झाकण्यासाठी लोकांच्या मनात भाजपा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल द्वेष पसरवू नका!
- विकास

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling