मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्रामच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:
आजच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने झेंडावंदन करताना, मानवंदना देताना हा मराठवाडा मुक्त झाल्यानंतर पहिला तिरंगा इथे फडकला असेल तो रोमांचकारी क्षण, त्या भावना आजदेखील ताज्या आहेत. या दिनाच्या शुभेच्छा देताना मी भावनेने, मनाने आणि हृदयाने आपल्यासोबत तिथे उपस्थितच आहे.
मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संतांची शिकवण आहेच, पण त्याच बरोबरीने अन्यायाविरुद्ध लढून अन्याय मोडून, तोडून टाकणे आणि स्वातंत्र्य मिळवणे ही आपल्या भूमीची आणि मातीची खासियत आहे.
लहान कोवळ्या बालकांपासून ज्येष्ठ, महिला, काही दाम्पत्य लढ्यामध्ये सहभागी झाले होते. मी काय करू शकतो? मला काय करता येईल? या एका उद्देशाने आणि माझ्या मराठवाड्यातील रझाकारांचे जुलूम, अत्याचार मोडून टाकण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने जीवाची पर्वा न करता सहभागी झाला होता.
या सगळ्या ज्ञात, अज्ञात वीरांना, शुरांना मी मनापासून अभिवादन करत आहे, मानवंदना देत आहे. केवळ आपण होतात, म्हणून आजचा दिवस आम्ही पाळू शकत आहे.
मला खात्री आहे, ज्याप्रमाणे त्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेला मराठवाड्यातील अबालवृद्ध एकवटून त्यांनी तो रझाकारी अत्याचार मोडून टाकला, तसच आपलं विषाणू बरोबरच दुसरं युद्ध आहे, त्याच्याबरोबर आपल्याला लढायचं आहे.
या सगळ्या ज्ञात, अज्ञात वीरांना, शुरांना मी मनापासून अभिवादन करत आहे, मानवंदना देत आहे. केवळ आपण होतात, म्हणून आजचा दिवस आम्ही पाळू शकत आहे.
कोरोनाशी लढताना मी संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोहीम दिली आहे, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी"! ज्याप्रमाणे त्यावेळेला ध्येयाने, उद्देशाने प्रेरित होऊन सगळे अबालवृद्ध मराठवाडा मुक्त करण्यासाठी युद्धात उतरले होते, तसेच मला मराठवाड्याचे नागरिक कोरोनापासून मुक्त होण्याचा लढाईमध्ये पाहिजेत.
आपण सगळ्यांनी जर ही जबाबदारी उचलली, हा मराठवाडा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र माझे कुटुंब आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. मी सुरक्षित तर माझे कुटुंब सुरक्षित!
या मुक्तिदिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घ्यायला पाहिजे की मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन आणि तुमच्यासोबत आम्ही सुद्धा शपथ घेतो आहे की जी ताकद, अधिकार तुम्ही आम्हाला दिला आहे, त्याचा वापर आम्ही मराठवाड्याची सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वापरेन.
या शुभेच्छा देत असताना मी तमाम मराठवाडाकरांचे आशीर्वाद मागत आहे की हे मुक्त शिवधनुष्य आहे, ते पेलण्याची ताकद आणि हिंमत आम्हाला द्यावी.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
