भक्तांसाठी विष्णूचे अकरावे अवतार.. आज 70 वा वाढदिवस साजरा करतायत.. खरंतर या त्यांच्यासाठी आणि भक्तांसाठी असणाऱ्या शुभ दिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेंड का होतोय? याच आत्मपरीक्षण करायला हवं.. पण ते तसं करणार नाहीत.. कारण त्यांचा बौद्धिक परीघ. #म 👇
काय अवस्था आहे सध्या रोजगाराच्या बाबतीत?
गेल्या तिमाहीत आपली अर्थव्यवस्था -23.9 एवढी आकसली हे 40 वर्षात पहिल्यांदा घडलं. असं NSO म्हणतं. CMIE च्या अहवालानुसार बेरोजगारी दर हा सध्या 8.32 टक्क्यांवर आलाय.
पुढे लॉकडाऊनमध्ये 12 कोटी लोकांनी आपलं काम गमावलं.. त्यातील बऱ्यापैकी हे👇
असंघटित क्षेत्रातील होते.. संघटित क्षेत्रातील 1.2 कोटी लोकांनी आपल्या नोकरीवर पाणी सोडलं..
एका अभ्यासानुसार 30 वर्षाखालील 40 लाख लोकांनी आपलं उदरनिर्वाहासाठीचे साधन सोडलं.
एवढं सगळं होत असताना.. हा मानव कुठं मोर, बदक असले धंदे करत बसला.. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्यात 👇
धन्यता मानली गेली.. खरंतर विध्यार्थी आणि त्यांचे पाठीराखे यांचे परीक्षा नकोतच असा हेका न्हवता.. पण योग्य वेळी परीक्षा व्हाव्यात हे उचित होतं..प्रत्येक मुद्द्यांवर धार्मिक तेढ निर्माण करण्यात पटाईत असणाऱ्या या अट्टलांना SSR, रिया, कंगना ही प्रकरणे आयतीच मिळाली.. 👇
बेरोजगार असणाऱ्या प्रत्येकाचा खरा राग हा आहे.
वेळोवेळी नमूद करूनही सरकार दरबारी याची दखल घेतली जाणार नसेल तर येत्या काळात बेरोजगारी दिवस न साजरा करता.बेरोजगारी आठवडा...महिना...वर्ष.. साजरं करावे लागू शकत.. ही रास्त भीती आता जनतेत आहे.. 👇
आजचा #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हा ट्रेंड त्याच उदाहरण आहे.❤
संदर्भ -bbc, माहितीजाल.
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
