Chetan Dixit (Modi Ka Parivar) 🚩 Profile picture
परमवैभवंनेतुमेतत्स्वराष्ट्रम्...! (RT's aren't endorsements and likes aren't always likes)

Sep 17, 2020, 5 tweets

@narendramodi जी,

नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या वृत्तीचं नाव आहे जी अनपेक्षितपणे उसळी मारते आणि भल्याभल्यांना नामोहरम करते, नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या पराकोटीच्या सहनशीलतेचे नाव आहे जी दशकाच्या सतत छळानंतरसुद्धा कधीही त्रागा करत नाही तर दुसऱ्याला त्रागा करायला भाग पाडते,+

नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या स्वयंसेवकाचं नाव आहे ज्याला एकनाथजी रानड्यांसारख्या संघातील विभूतींच्या सहवासात पैलू पडले गेले, नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या परिमाणाचं नाव आहे जे तुम्हाला प्रस्थापितांच्या माजासमोर खंबीर उभे टाकण्याचे सामर्थ्य देते, +

नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या परिणामाचे नाव आहे जो तुम्हाला सततच्या ध्यासामुळे मिळतो, नरेंद्र दामोदरदास मोदी हे अश्या व्यक्तीचे नाव आहे त्याच्यामागे जनता बहुमताने आणि एकदिलाने उभी राहते..

पक्षाच्या जाहिरनाम्यातली आश्वासने पूर्ण करायची असतात, योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर +

प्रसिद्धी देता येऊ शकते, राम मंदिर होऊ शकते, शहा-बानोला खराखुरा न्याय देता येऊ शकतो, विश्वातल्या हिंदूंसमोर भारत देश हा आश्रयस्थान बनू शकतो - ही अशी कधीकाळची स्वप्ने आज आमच्या पिढीला "याची देही याची डोळा" पूर्ण होताना पाहण्याचे भाग्य ज्यांच्या काळात आणि ज्यांच्या कारणाने +

लाभले ते राष्ट्ररक्षक, राष्ट्रभक्त, हिंदुहृदयसम्राट नरेंद्र दामोदरदास मोदी ह्यांचा आज वाढदिवस...

आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य आणि पूर्ण आरोग्य देईलच..

"शुभेच्छा मोदीजी, बहुत लांबी पारी आपका इंतजार कर रही है.."

- मोदीभक्त, चेतन दीक्षित

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling