परमवैभवंनेतुमेतत्स्वराष्ट्रम्...!
(RT's aren't endorsements and likes aren't always likes)
May 8, 2024 • 9 tweets • 2 min read
#थोडी_लॉंग_थ्रेड
कालच्या निवडणुकीत एका वृद्ध व्यक्तीचा कमळ कुठाय, मला कमळालाच मतदान करायचं आहे चा विडिओ वायरल झाला होता. ह्यावर बर्याचजणांनी प्रदेश भाजपवर तोंडसुख घेतलं होतं, कि राजकीय तडजोडी तळागाळार्यंत न्यायला ते कमी पडले. त्यांचं चूक कि बरोबर ह्यात मी पडणार नाही. पण (१/९)
अंतिम मत बनवायच्या आधी हा लेख वाचा..
ह्या एका व्हिडिओवरून जर जनरलायजेशन करायचं ठरवलं तर (अर्थात ते चुकीचं आहेच) जे भाजपसमर्थक आहेत ते काहीही झालं तरी कमळाला मतदान करणार हे सिद्ध होतं. म्हणजे काही झालं तरी भाजपमागे उभा असणारा हा वर्ग सुटणार नाहीच. कितीही प्रचार आणि (२/९)
Mar 20, 2024 • 7 tweets • 1 min read
राज ठाकरे आणि भाजपमध्ये जे काही चाललं आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे.. (अर्थात मी कोण?)
येन केन प्रकारेण "तो" आकडा मिळवण्यासाठी जे काही केलं जाईल त्याला माझी कसलीच ना नाही.. (अर्थात पुन्हा मी कोण?)
मोदी शहा आणि फडणवीस ह्यांच्या दूरदृष्टीबद्दल मलाच काय (१/७)
कोणालाही शंका असल्याचे कारण नाही. विरोधाला विरोध करायला गुलाम्स येतीलच पण ज्यांना त्यांचे मालकच मानत नाहीत त्यांच्याबद्दल मी पामराने काय बोलावे?
फक्त २०१९ हे वर्ष, जाहीर सभांमधून पातळी सोडून केलेली वक्तव्ये, "त्या" नेत्याच्या वैयक्तिक जीवनात त्याचे पडलेले प्रतिबिंब (२/७)
Feb 13, 2024 • 6 tweets • 2 min read
गुजरातच्या मार्गाने प्रदेश भाजपचा प्रवास सुरु आहे..
बऱ्याच जणांना भाजपमध्ये जो काही विरोधी पक्षातील नेत्यांचा प्रवेश सुरु आहे त्यावरून वाईट वाटतंय. विरोधीपक्षातले कार्यकर्ते आता कसं वाटतंय? म्हणत खिल्ली उडवण्यात समाधान शोधत आहेत, आत खोलवर झालेली (१/६)
जखम विसरायचा केविलवाणा प्रयत्न करत...
हे जे काही प्रदेश भाजपात सूरु आहे ते अगदी गुजरातच्याच मार्गाने सुरु आहे. गुजरातेत गेल्या वीस वर्षात भाजपा प्रबळ झाली आणि काँग्रेस दुर्बळ झाली ह्यामागे काँग्रेसला त्यांचे नेते टिकवता आले नाहीत हे जेवढे मोठे कारण आहे (२/६)
Oct 4, 2023 • 10 tweets • 2 min read
#LongThread
पुण्यातली भाजप संपवायची सुपारी दिली गेली आहे काय?
अश्यात राजकारणावर काही व्यक्त व्हायचं नाही असं ठरवलं होतं. अश्यात बातम्यासुद्धा बघत नाहीये. बघायच्या म्हटलं तरी ते प्रकरण बघवत नाहीये. पण आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. (१/१०)
जेवढे लाड अजित पवारांचे काकांनी केले नसतील तेवढे लाड फडणवीसांनी चालवले आहेत कि काय? अशी शंका यावी असे तमाशे राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. मी भाजपसमर्थक आहे पण गुलाम नाही. जे पटत नाही ते बोलणारच. आता जे काही लिहितोय ते पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांशी बोलून (२/१०)
Jul 3, 2023 • 20 tweets • 4 min read
सुरुवातीलाच सांगतोय, लेख खूप मोठाय.. वेळ घेऊन वाचा..
१ डिसेंबर २०१९ रोजी एक लेख लिहिला होता. (लेखाची लिंक पहिल्या कमेंटमध्ये). देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या दगाबाजीनंतर विरोधी पक्षनेता म्हणून जे भाषण केले होते त्यातले काही मुद्दे इथं परत मांडतोय.. (1/20)
१. विरोधी पक्ष वार करत असतात. जवळचा मित्र वार करतो तेंव्हा झालेली जखम तेवढ्या उघडपणे जगाला दाखवता येत नाही.. १०५ जागा येऊनसुद्धा सत्ता स्थापन करता आली नाही. कारण कोणी बाहेरचं नव्हतं तर घरातलंच होतं, तेही प्रचंड अव्यवहार्य.. ही भावना जेंव्हा जेंव्हा ते 'हरकत नाही' (2/20)
Jun 3, 2023 • 6 tweets • 1 min read
बिग ब्रेकिंग..!!!
दादा भाजपात येणार... आता फक्त मुहूर्ताची वाट पाहणे शिल्लक..
दादा राष्ट्रवादीची संस्कृती धोक्यात आणत आहेत. दादा भाजपात येण्याच्या मार्गावर आहेत.. साधारणपणे भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या विरोधात कोणी काही बोललं तर भाजपवाले शांत बसून ऐकून (१/६)
घेतात नाहीतर दुर्लक्ष करण्याचा मास्टरस्ट्रोक मारतात. पण अजितदादांनीसुद्धा तेच करावं?
काल श्रीकांत शिंदेंवर प्रश्न विचारताच पत्रकाराच्या कॅमेरावर संजय राऊत थुंकले..
ह्यावर अजितदादा म्हणाले, "आपली काही संस्कृती आहे, परंपरा आहे, हैचं भान सर्वांनी ठेवावं.."
ह्यावर (२/६)
May 11, 2023 • 4 tweets • 1 min read
शासनाला काय मिळालं?
- अभय
१६ आमदारांचा निर्णय?
- विधानसभा अध्यक्ष घेणार.
कुठले?
- सध्याचे..
शिवसेना पक्षाचा निर्णय?
- निवडणूक आयोग घेणार.
राष्ट्रवादीचं काय गेलं?
- काहीच नाही.
काँग्रेसचं काय गेलं?
- काही नाही..
राज्यपालांचं काय?
- फक्त ताशेरे. (१/४)
पुढं?
- काहीच नाही..
भाजपचे?
- काहीच नाही. सत्ता सुरक्षित.
उद्धवसेनेला?
- ताटकळत ठेवलं गेलं. आमदार खासदार गेले. पक्षाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार. राहिलेले अजून जातील. थोडक्यात सेनेला मजबूत लागलेले तबेले पवार आणि पटोले मस्तपैकी मजा घेत बघत बसले आहेत. (२/४)
Mar 30, 2023 • 6 tweets • 2 min read
योगी प्रचंड आवडतात, कारण त्यांना एक माहीत आहे की जनता कायद्याला घाबरत नाही तर कायदा राबवणाऱ्याला घाबरवते..
कधीकाळचा उत्तरप्रदेशातील नामचीन गुंड अतिक अहमदला जेंव्हा एका खटल्यात जन्मठेप होते (अजून बरेच खटले पेंडिंग आहेत) तेंव्हा योगी जास्त कौतुकास पात्र असतात. (१/६)
जन्मठेप सुनावल्यावर हा अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ समोरासमोर आले तेंव्हा ढसाढसा रडले.. आणि अल्लाने चाहा तो फिर मुलाकात होगी, असं जेंव्हा म्हणाले त्याचे म्हणाल तेवढे अर्थ निघतील. ते किती काढायचे ते वाचकांनी ठरवायचं..
कायदा आणि सुव्यवस्था ज्या राज्यात पराकोटीची (२/६)
Mar 29, 2023 • 9 tweets • 2 min read
जितेंद्र आव्हाडाची खोलून चौकशी झाली पाहिजे..
जितेंद्र आव्हाडाचा माजी सुरक्षारक्षक वैभव कदमने केलेली आत्महत्या प्रशासनाने हलक्यात घेऊ नये. जितेंद्र आव्हाडांनी अनंत करमुसेंना केलेली मारहाण ही जगजाहीर आहे. सर्व पुरावे उपलब्ध आहेत. केवळ न्यायालयाची मोहोर उठणे (१/९)
बाकी आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने करमुसे प्रकरणात मविआ शासनकाळात झालेली कुचकी कारवाई आणि तपास ह्यावर ताशेरे ओढलेले असताना आणि पुन्हा तपासाचे दिलेले आदेश ह्या पार्श्वभूमीवरची ही आत्महत्या एका सामान्य माणसाच्या मनात काही स्वाभाविक प्रश्न निर्माण करतात..(२/९)
Mar 6, 2023 • 7 tweets • 2 min read
हा फोटो आहे अतिक अहमद नावाच्या उत्तरप्रदेशातल्या एका कुप्रसिद्ध गुंडाचा, ज्याची योगींनी मजबूत ठासून ठेवलीये.. हा चारदा आमदार नि एकदा खासदारसुद्धा झाला होता.. लोकशाहीच्या नावानं ### (बुरा ना मानो, होळी आहे..)
ह्या सांडाच्या नावावर चार दशकांची (१/७)
गुन्हेगारी आहे, १०० केसेस आहेत. हा सांड तोच आहे ज्याने मायावतीला कोंडून ठेवलं होतं, ज्यामुळे मायावतीने सपासोबतची युती मोडली होती..
हा सांड सध्या गुजरातच्या तुरुंगात खितपत आहे. ह्याचा एक पोरगा लखनौच्या तुरुंगात खितपत आहे. दुसरा पोरगा नैनीच्या तुरुंगात खितपत आहे. (२/७)
"न रें द्रा..." अस्पष्टसं.. अस्फुटसं.. ती वृद्ध माऊली पुटपुटली..
"आलास.. ना.. रे.. तू..? आलासच ना रे तू.. शेवटी.."
बोलताना त्रास होत होता पण ती बोलण्याचा कसोशीने प्रयत्न करत होती.. नरेंद्र तिच्या शेजारी बसला.. त्याचा हात तिने तिच्या सुरकुतलेल्या (१/१२)
हातात घेतला आणि थोडासा दाबला. भावनावेगाने कितीही स्वाभाविक दाब नरेन्द्राच्या हातावर पडला तरी त्याच्यासाठी तो कापसासारखाच हलका.. ह्याची जाणीव होऊन ती माऊली मनाशीच हसली..
राज्यसभा आणि विधानपरिषदेत मविआचं वस्त्रहरण झाल्यावर आता विषय आहे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा..
ही निवडणूक गुप्त असणारे.. गुप्त..
महाराष्ट्रातून द्रौपदी मूर्मुंना २०० मतं मिळवून देऊ असं शिंदे म्हणालेत.. (१/५)
त्यांच्यासोबत राज्यसभा-विधानपरिषद ऐतिहासिकरित्या गाजवणारे फडणवीस आहेत.
राज्यात भाजपकडे १६५ आकडा (आ. जगताप आणि आ. टिळक सोडून) ठाकरेगट मिळून १८० (त्यांनी नं मागता पाठिंबा दिलाय). उरली वीस, ती राष्ट्रवादी + काँग्रेसच्या गटातून फडणवीस खेचू शकतात. आता ती कितपत खेचू (२/५)
Jul 17, 2022 • 6 tweets • 1 min read
"उध्दवजींचं फसलेलं बंड.."
एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड सर्वांना माहीत आहे मग उद्धवठाकरेंचं फसलेलं बंड वाचून चक्रावला असाल..
मुंबई तकनं फोडलेली बातमीच तशी आहे..
जेंव्हा उध्दवजींच्या लक्षात आलं की एकनाथ शिंदेंचं बंड मोडणं अशक्य आहे तेंव्हा त्यांनी त्यांच्या खास माणसाकडून (१/६)
फडणवीसांना फोन केला आणि शिंदेंची बार्गेनिंग पॉवर का वाढवताय म्हणत पुन्हा एकत्र यायची साद घातली (इथे भीक मागितली असंही म्हणता येतं पण मी म्हणणार नाही) पण फडणवीस म्हणाले त्याला खूप उशीर झालाय. मग उध्दवजींनी दिल्लीलासुद्धा फोन केले पण काही फायदा होऊ शकला नाही.. (२/६)
ज्या उपसभापतींनी म्हणजे झिरवळांनी आमदारांवर अपात्रतेची नोटीस बजावलीये त्या झिरवळांच्याच खुर्चीचा वाद महत्वाचा आहे.
मुद्दा भारी रंजक आहे..
मुळात ह्या झिरवळांविरोधात अविश्वासाचा ठराव जो फडणवीसांनी मांडला होता तो प्रलंबित आहे. (१/११)
म्हणजे ह्या सायबाची खुर्ची अजून संभ्रमात आहे तर हे साहेब आमदारांना अपात्र ठरवू शकतात का?
अरुणाचल प्रदेशातपण असंच कांड झालं होतं.. त्या केसचा पण उल्लेख आजच्या सुनावणीत आलाय..
२०१६ मध्ये अरुणाचल प्रदेशातील २० काँग्रेस आमदारांनी बंड केलं होतं. मग ह्यांच्यासोबत (२/११)
May 13, 2022 • 6 tweets • 1 min read
१० पोलिसांचं केलं गेलेलं निलंबन कोणाला माहीत आहे का?
हे सगळं मुंब्र्यात घडलंय माहीत आहे का?
अनिल देशमुखांनी पोलीस खात्याला दुभती म्हैस समजून १०० कोटींचं टार्गेट दिल्याची गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहेच.
आता त्याच पोलीस खात्यातल्या १० जणांचं निलंबन केलं गेलंय. (१/६)
किती मराठी माध्यमांनी ह्याची बातमी दिलीय? किती अतिप्रसन्न लोकांचं इकडं लक्ष गेलंय? राजुला काजू खायचं सोडून काही दिसत नसेलच..
मुंब्र्यात खेळण्याचा व्यापारी फैजल मेमनच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. कधी? ११ एप्रिलच्या मध्यरात्री. तिथं त्यांना तीस खोक्यांमधून ३० कोटी रुपये (२/६)
Apr 20, 2022 • 7 tweets • 1 min read
अमोल मटणकरीला जाहीर आवाहन..
"मम भार्या समर्पयामी" असा कुठला मंत्र हिंदू धर्मात कुठं लिहिलाय हे जाहीर करावं..
ब्राह्मणांवर टीका केल्याशिवाय पवारांच्या गुडबुकात नाव जात नाही हे राज्यात सर्वांना माहीत आहे. भलेही ह्यांचे डावे उजवे सगळे ब्राह्मण असले तरी ह्यांना (१/६)
झोडपायला ब्राह्मणच हवे असतात. हा समाज रस्त्यावर येऊन फोडाफोडी करत नाही म्हणून राष्ट्रवादीचा माज चालतो. त्याला माझी हरकत नाही कारण दुबळ्याला तसाही काही हक्क नसतो..
मम भार्या समर्पयामी ह्या नसलेल्या मंत्रावर वर धनंजय मुंडेनी हसावं ह्याइतका "करुण" विनोद नाही. एक बायको (२/६)
Apr 18, 2022 • 4 tweets • 1 min read
आधी बाळ ठाकरेंमध्ये आणि आता राज ठाकरेंमध्ये हिंदुत्वाचा नवा आवाज बघणाऱ्यांसाठी एकच निरीक्षण सांगतो..
ह्या दोघांनी सुरू केलेल्या आंदोलनात ह्यांची पोरं कधी दिसली का? त्यांनी काठ्या कधी खाल्ल्या का? तहानभूक विसरून त्यांनी सर्वसामान्यांसोबत घोषणा कधी दिल्या का? डोकी भडकवणारी (१/४)
भाषणं करायला काहीही लागत नाही.. लागतो तो खर्जातला आवाज जो ह्या दोघांकडे भरभरून होता, आहे..
आता संघ-भाजप परिवाराच्या हिंदुत्वाबद्दल शंका घेणार्यांसाठी एक निरीक्षण मांडतो..
पंडित दीनदयाळ उपाध्यायपासून ते अगदी योगी आदित्यनाथ - फडणवीसांपर्यंत असंख्य उदाहरणे देऊ शकतो हे स्वतः (२/४)
सावजाला टप्प्यात आणून कार्यक्रम करणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस..
सगळे पत्ते दुसऱ्याला दाखवून डाव त्याच्यावरच कसा उलटवायचा हे देवेंद्रजींनी दाखवलं आणि समोरच्याचे सर्व पत्ते माहीत असूनसुद्धा काहीही नं करता आपली राजकीय असमंजस वृत्ती चार (१/५)
चौघात कशी वेशीवर टांगायची हे पवारांनी दाखवलं..
फडणवीसांनी सर्व कागदपत्रे ईडीला आणि पवारांना दिली होती. पाच दशकांपेक्षा जास्त काळ राजकारणात राहून पवारांना कागदपत्रे वाचता येत नसतील असे म्हणणे मुर्खपणाचे दिसेल.
ही कागदपत्रे पवारांनी गांभीर्याने घेतली नाहीत. (२/५)
Jan 17, 2022 • 5 tweets • 1 min read
सकाळी सकाळी एक तीव्र सणक डोक्यात जावी अशी बातमी आहे..
कोरोनाच्या काळात जे काही जनतेचे हाल ह्या शासनाने केले त्याचा दुसरा आणि तेवढाच निष्काळजीपणाचा दुसरा सीझन सुरू झालाय..
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक औषधांचा ७० टक्के तुटवडा भासत असून, थकीत (१/५)
देयकांअभावी औषधांचा पुरवठाही खंडित करण्यात आला आहे.
औषधे पुरवल्यानंतरही हाफकीन संस्थेकडे सुमारे ९० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे औषध पुरवठादारांनी हाफकीन संस्थेला पत्र लिहून थेट आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.
अडचणीत असलेले शेतकरी, राज्यपरिवहन कर्मचारी, विद्यार्थी आणि (२/५)
Jan 16, 2022 • 5 tweets • 1 min read
एका पाकिस्तानी दहशतवाद्याने टेक्सासमधील सिनेगॉगमध्ये काही ज्यूंना मारण्याची धमकी देत ओलीस ठेवलं होतं. त्याची बहीण अमेरिकेत ८६ वर्षांची शिक्षा भोगत आहे, जिला अमेरिकन लोकांची हत्या करण्याच्या कटात सहभागी असल्याने ही शिक्षा सुनावली गेली आहे. तिला सोडवण्यासाठी हा (१/५)
प्रकार हा पाकिस्तानी दहशतवादी करत होता..
इस्रायलचे अध्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून होतेच..
सर्व ओलिसांना पद्धतशीर सोडवण्यात आले..
दहशतवाद्याला पकडले गेले.. सगळं कसं शिस्तीत.. जास्त खळबळ नं करता.. कसलीही हानी नं होता..
आपल्या देशात मुफ्ती मोहम्मद (२/५)
Dec 9, 2021 • 5 tweets • 1 min read
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारताच्या दौऱ्यावर आले होते तेंव्हा भारत-रशियामध्ये एके-२०३ह्या रायफलसंदर्भात तब्बल ५१०० कोटींचा करार करण्यात आलाय.
एके-४७ चा बाप म्हणजे एके-२०३. एका मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची क्षमता आहे ह्या रायफलमध्ये. (१/५)
भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांसाठी सहा लाख रायफल्स अमेठीच्या कारखान्यात बनवल्या जाणार आहेत.
ही रायफल आधीच्या "इंसास" ह्या रायफलची जागा घेणार आहे, ज्या १९९० साली लष्करात सामील केल्या गेल्या होत्या.
ह्या रायफल्स म्हणजे लष्करासाठी विकत घेतलेली समस्याच होती. (२/५)