vikas waghamare Profile picture
जिल्हा सरचिटणीस, भाजपा सोलापूर ग्रामीण🌷 युवा ग्रामपंचायत सदस्य, वाघोली, ता.मोहोळ

Sep 18, 2020, 5 tweets

👇हा व्हिडीओ(48 सेकंदानंतर बघा) पाहिल्यापासून भयंकर अस्वस्थ आहे,निशब्द, हतबल आहे. डोळ्यात पाणी कधी आलं कळलं नाही. राज्य अक्षरशः मरतय..😢
कोरोनाच्या भयंकर परिस्थितीवर बोलताना हुंदका देऊन रडणारा नितळ मनाचा माणूस कोण हे माहितीय का! हे आहेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजी+

प्रमुख ओमप्रकाशजी शेटे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात 21 लाख रुग्णांना 1500 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देत उपचार करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी.
राज्यातली कोरोनाची परिस्थिती भयंकर वाईट आहे, भयंकर वाईट!😢 लाखों लोकं उपचारासाठी+

धडपड करताहेत...घरदार विकताहेत..ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना कोणीच उभा करत नाही. सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही. सत्ताधारी घराच्या बाहेरही पडत नाहीत, लोकांना वाली कोणीच नाही... भावांनो, आत्तापर्यंत राज्यात कोरोनामूळे तब्बल 31 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झालाय.😢+

शेटे सर राज्य सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत,आता सामान्य माणसाला न्याय फक्त न्यायदेवताच देऊ शकते. आपण सगळे हतबल आहोत. अधिकारी म्हणून झोकून देऊन काम करणारे शेटे सर लोकांचे हाल बघून भावनाविवश झालेत...
खरंतर अधिकारी माणसं निगरगट्ट असतात, काही तर नियमाच्या चाकोरीत राहून+

सामान्यांच्या मरणाचा सोहळा करणारी..पण जनतेचं दुखः, भावना, यातना बघून डोळ्यात पाणी आणणारा, हळवा होणारा, ढसाढसा रडणारा असा संवेदनशील मनाचा अधिकारी विरळ असतो... व्हिडीओ पाहून कामाची तळमळ, कालवाकालव स्पष्ट दिसतेय. पण हतबल आहेत😑
जास्त काय लिहू.... सर्वांनी काळजी घ्या..बस्स!🙏
- विकास

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling