vikas waghamare Profile picture
जिल्हा सरचिटणीस, भाजपा सोलापूर ग्रामीण🌷 युवा ग्रामपंचायत सदस्य, वाघोली, ता.मोहोळ

Sep 20, 2020, 27 tweets

आज राज्यसभेत 'कृषी सुधारणा विधेयके' मंजूर झाली आणि खऱ्या अर्थाने देशातल्या अवघ्या शेतकऱ्यांना आनंद झाला. खरंतर हा क्षण यायला 70 वर्षे उलटून गेली मात्र कोई माय का लाल हे करू शकला नाही पण "नरेंद्र दामोदरदास मोदी" या युगपुरुषाने हे करून दाखवलं. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तळहातावर+

फोड घेऊन, कधी अनवाणी पायाने, अंगावर चिंध्या पांघरून, मिरची भाकरी खाऊन अवघ्या जगाला पोसण्याचं काम हा शेतकरी मायबाप करतो. सगळं जग थांबलेलं होतं तेव्हाही माझा बाप शेतात राबत होता कारण तो शेतकरी आहे. पण त्याच शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी, त्याच्या पायातल्या बेड्या सोडवण्यासाठी आजचा+

दिवस यावा लागला. हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंद होणारा दिवस आहे, आणि हे भारतीय जनता पार्टीने करून दाखवले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो आहे.

या नवीन विधेयकांमुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे आणि ‘एक देश एक बाजार’ या संकल्पनेला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकऱ्यांना बाजार+

समितीच्या बाहेरही संधी उपलब्ध करुण देणं, शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर करणं हा या विधेयकांचा मूळ उद्देश आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कुठेही करता येईल व या विधेयकामुळे शेतकरी बंधनमुक्त होईल,खऱ्या अर्थाने स्वातंत्र होईल. शेतकऱ्यांना देशात कुठंही शेतमाल विक्री+

करण्याची परवानगी मिळेल. शेतमालाला अधिक आणि पाहिजे तसा दर मिळेल. कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढेल. आणि त्या माध्यमातून रोजगाराच्या संधी वाढतील, विविध प्रगतशील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करता येईल, पारंपारिकतेसह नाविण्यपूर्णता आणि अटकेपार झेप शेतकऱ्यांना घेता येईल. अशी ही+

आज मंजूर झालेली विधेयके आहेत.

एवढंच नाही तर शेतकऱ्यांची आडत्यांच्या व दलालांच्या जाचातून मुक्तता होईल, शेतकऱ्यांसोबत ग्राहकांना व अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल आणि बाजार या संकल्पनेचा विस्तार होऊन शेतमालाला योग्य भाव मिळणार आहे.

खरंतर+

सातत्याने हेच म्हणतो की, राज्यातल्या बाजार समित्या या शेतकरी शोषणाच्या मुख्य घटक आहेत, आता त्या बाजार समितीपासुन मुक्तता मिळणार आहे,त्या ठिकाणी असणारे आडत, दलाल यांच्यापासून शेतकऱ्यांना मुक्तता मिळणार आहे, एवढंच नाही तर त्या ठिकाणी माल विकल्यानंतर द्यावा लागणारा करही शेतकऱ्यांना+

आता द्यावा लागणार नाही, उलट देशातल्या कोणत्याही बाजारपेठेत विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. यासोबतच बाजार समित्या बरखास्त केलेल्या नाहीत मात्र देशात कुठेही माल विक्रीची परवानगी हा ठोस पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या पिळवणूकीतून सोडवणूक केली आहे. ज्यांना बाजार+

समितीत माल विकायचा आहे त्यांना तो मार्गही उपलब्ध असणारच आहे. त्याशिवाय आधारभूत किंमतही मिळणारच आहे.
दुसरे विधेयक जीवनावश्यक वस्तू कायदा यामध्ये केंद्र सरकारने तृणधान्य, कडधान्य, डाळ, कांदे, बटाटे, तेल आदी खाद्यांने जीवनावश्यक वस्तूंमधून वगळले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला+

भाव मिळणार आहे. कृत्रिम टंचाई करणाऱ्यांची सद्दी संपणार आहे.
शेतकऱ्यांना शेतीविषयक करार करण्याचीही संधी निर्माण झाली आहे, त्यामुळे नाविन्यपूर्ण शेती करता येईल, शेती करत असताना ग्रुप शेती, प्रक्रिया उद्योग यासोबतच शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात करार पद्धती करून पाहिजे ते उत्पादन+

शेतकरी घेऊ शकतो. करार करत असतानाच उत्पादनाची किंमत ठरवण्याचा पर्याय आहे, शेतकरी करार करत असल्याने संघांच्या किंमतीवर अवलंबून राहावे लागणार नाही, अन आर्थिक पिळवणूकीतून निश्चितच सुटका होईल. आपल्याकडे मुख्यतः शेतकरी हा शेती पिकते मात्र भाव मिळत नसल्याने आत्महत्या करतो, आता शेतकरी+

देशातच नाही तर परदेशी कंपन्यांसोबतही करार करू शकत असल्याने शेतीतून नफा मिळवण्यासाठी समर्थ ठरणार आहे, आणि आत्महत्येसाठी उत्पन्नाला भाव नाही हे कारण नष्ट होईल. पर्यायाने आत्महत्या होणार नाहीत. त्याशिवाय करारानुसार शेती पिकली नाही, किंवा काही तोटा झाला अन थकबाकी राहिली तर सदर+

खरेदीदार कंपनीला शेतकऱ्यांच्या जमिनीविरुद्ध कोणतीच कारवाई करता येणार नाही. या विधेयकामुळे मध्यस्थांची गोची होणार आहे, दलाल आणि मोठे व्यापारी यांना ओलांडून थेट शेतकरी आणि खरेदीदार यांचा व्यवहार होणार आहे, मध्यस्थांना जाणारा शेतकऱ्यांचा पैसा वाचणार आहे. पिळवणूक होणार नाही.

इतके +

सगळे फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आज केंद्र सरकारने हे विधेयक आणून देशातल्या शेतकऱ्यांना उंचीवर नेण्याचे काम केले आहे, त्यांना सन्मान देण्याचे काम केले आहे. शेतात राबणारा कष्टकरी शेतकरी हा गेली 70 वर्षे विकासाच्या कोसोदूर का राहिला हा खरा सवाल होता, तर आता शेतकऱ्यांना चंदेरी+

स्वप्न दाखवले आहे, केवळ हे स्वप्नच नाही तर शेतकऱ्यांना पंख दिले आहेत, जितक्या उंच झेप घेता येईल तेवढी शेतकऱ्यांना स्वतःला घेता घेणार आहे. प्रत्येकाला खिडकीतून आभाळ दाखवण्यापेक्षा खिडकी उघडून स्वैर भरारी घेण्याचं स्वप्न मोदीजींनी आज खऱ्या अर्थानं दिलंय. शेतकरी हा राजा आहे हे फक्त+

आत्तापर्यंत बोलण्यात येत होतं आता खऱ्या अर्थाने शेतकरी हा राजा होणार आहे. मोदीजी, आज देशातला अवघा शेतकरी आपले मनोमन आभार मानत आहे. "छपन्न उंच का सिना" काय आहे हे आज पुन्हा एकदा अवघ्या जगाने पाहिलं आहे.

राजकीय विरोधक काहीही बोंबलू द्या, लक्ष देऊ नका. आज राज्यसभेत ज्यावेळी हे+

विधेयक मंजूर होत होते तेव्हा काँग्रेस विरोध करत होती, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या खासदारांनी तर सभागृहातला माईक तोडला, पुस्तक फाडले, काहींनी तर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, सोशल डिस्टन्सचे नियम मोडत आक्रस्ताळेपणाही केला. पण तो सगळा प्रकार थेट फाट्यावर मारत ही+

विधेयके पारित झाली आहेत. काँग्रेस यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्या काँग्रेसने 70 वर्षे शेतकरी आणि इतर घटकांचं शोषण केलं त्यांनी आता राजकारण करू नये,काँग्रेसची दुकानदारी संपली आहे, शेतकरी तुमच्या राजकारणाला बळी पडणार नाही,तर शेतकरी आता डोळसपणे मोदीजींच्या पाठीशी आहे.+

कारण जी काँग्रेस 70 वर्षे शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण सोडून काही करू शकली नाही, ते मोदीजींनी करून दाखवले आहे. आता यांचा थयथयाट हा शेतकऱ्यासाठी नाही तर दलाल, आडत आणि शेतकऱ्यांना लुटणाऱ्या काही व्यापाऱ्यांसाठी चालला आहे, पण हे न समजण्याएवढा शेतकरी खुळा नाहीच.

मला हे सगळं घडत+

असताना मात्र दुःख या गोष्टीचं झालं की, ज्या शरद पवार यांना शेतकरी नेता म्हणतात, शेतकऱ्यांचा तारणहार म्हणतात ते खासदार शरद पवार आज राज्यसभेत या सर्व शेतकऱ्यांच्या हिताच्या विधेयकावर चर्चा होत असताना तिथे सभागृहात हजर नव्हते. त्याचं कारण काय? जर तुम्ही सभागृहात शेतकरी हिताच्या+

गोष्टीवर चर्चा करण्यासाठी नाही, पाठिंबा देण्यासाठी नाही तर दर महिन्याला मोदीजींना हातभर मोठी पत्रे लिहिता कशासाठी? पत्र तर काय लिहायची की, "मोदीजी, शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे, त्यांना आधार द्या, चांगले निर्णय घ्या." आणि ज्यावेळी निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा गैरहजर राहायचं,+

यावरून एक स्पष्ट होते की शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत, ते तर दलालांचे नेते आहेत. जर ते शेतकऱ्यांचे नेते असते तर आज राज्यसभेत उपस्थित राहून शेतकऱ्यांना दलालांपासून मुक्त करणाऱ्या विधेयकाला समर्थन दिले असते. शेतकऱ्यांची बाजू घेतली असती, मात्र तसे झाले नाही आणि आज उघडे पडले+

आहेत.
उर्वरित राष्ट्रवादीच्या खासदारांनीही सभागृह त्याग केला.

याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही की, जे उद्धव ठाकरे राज्यात "मला शेतकरी कर्जमुक्त नाही तर चिंतामुक्त करायचा आहे" अशा कोरड्या वलग्ना करतात, त्यांच्या शिवसेनेची भूमिका मात्र अत्यंत हास्यास्पद होती. लोकसभेत काल या+

विधेयकांना समर्थन दिले, त्यानंतर आज सकाळी शरद पवार, सोनिया गांधी रागावल्या की काय! लगेच राज्यसभेतून पलायन केलं, सभात्याग केला. यांना जर शेतकऱ्यांना न्यायच द्यायचा होता, शेतकरी हित जोपासायचे होते तर सभागृहात समर्थन का दिले नाही? सत्तेसाठी लाचार झालेले शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे+

नाहीत, त्यांना ना दिशा आहे ना मार्ग, केवळ सत्तेसाठी भ्रमित झालेली शिवसेना आजही दिल्लीमध्ये भ्रमितच दिसली. राज्यातला शेतकरी हेही विसरणार नाही की, "जेव्हा आमच्या आयुष्यात सोनेरी पहाट आणण्यासाठी नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी काम करत होती तेव्हा त्यांना समर्थन न घेता पलायन+

करणारी ही शिवसेनाच आहे."

कोणी, कशी भूमिका घ्यावी ज्यांनी त्यांनी ठरवावं पण आज शेतकरी स्वातंत्र होत होता तेव्हा गद्दारी करणारे कोण आहेत हे इतिहासात कायम अधोरेखित असेल. असो!

नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी आज देशातल्या करोडो शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूर्य पेरला आणि उत्कर्षाची सकाळ+

होते आहे ही नक्कीच अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. जय हिंद! जय किसान!

- विकास विठोबा वाघमारे
vwaghamare0@gmail.com

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling