@Jollyboy Profile picture

Sep 20, 2020, 5 tweets

मित्रांनो,

गेल्या 10 वर्षांपासून आम्हीं भारताच्या सर्वात प्राचीन लिपिला "धम्मलिपि" म्हणत आलो आहे. आपण ही सर्वजण हेच म्हणत आहात. एवढे सगळे पुरावे असतांना आणि ब्राह्मी शब्दाला काहीही पुरावा नसताना देखील काही जणांची खोड काही मोडत नाही! येनकेन प्रमाणे ब्राह्मी शब्द लिपि साठी
1)

द्यायचाच अशा विचाराने पछाडलेल्यांनी त्यांच्या "कुपोषित मेंदू"ने आणखीन एक "जावईशोध" लावला आहे... आणि तो म्हणजे सम्राट अशोकांची लिपि ही धम्मलिपि आहे पण काही काळानंतर त्यातून ब्राह्मी लिपि उत्त्पन्न झाली!

यातील chronology लक्षात घ्या...म्हणजे तुम्हांला खूश करण्यासाठी सम्राट
2)

अशोकांच्या लेखातील लिपिला "धम्मलिपि" म्हणायांचे, पण त्यानंतरच्या सर्व शिलालेखांची लिपि ही ब्राह्मी आहे असे त्यांना म्हणायचे आहे! म्हणजे धम्मलिपि हा शब्द फक्त आणि फक्त अशोकांच्या लिपीला म्हणायचे!

आणि यालाच आमचा विरोध आहे! ब्राह्मी नावाचा शब्द लिपिला कधीच नव्हता आणि
3)

याला काहीच पुरावा नाही. भारतातील सर्वात प्राचीन लिपि ही "धम्मलिपि"च होय आणि याच धम्मलिपि मधून भारताच्या सर्वच लिपींची उत्पत्ती झाली आहे!

एक तर ब्राह्मी या शब्दाला काही पुरावा देणार नाही मात्र ब्राह्मी बोलणारच अशी अवैज्ञानिक भूमिका मांडण्यासाठी पुढाकार
4)

घेतायेत आमच्यातीलच वैज्ञानिक बौद्ध धम्म सांगणारे! आता तुम्हीच सांगा - हसावं की रडावं की यांच्या कुपोषित बुद्धीची कीव करावी ?
5).

#Atul_Bhosekar
9545277410

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling