भाजपाची सद्गुणविकृती भाजपाच्याच अंगलट..
'२०१४ च्या विधानसभेच्यावेळी शिवसेनेची भाषा आणि त्याचा रागरंग, अपरिहार्यतेतून झालेली/केलेली युती' ह्या सर्व गोष्टी विसरून २०१७ च्या मुंबई मनपाच्या निवडणूकीत निसटत्या बहुमताने का होईना पण सेनेनं महापौरपद राखलं, तेंव्हा विरोधी पक्षनेतेपद +
भाजपाने नाकारलं होतं. का? तर राज्यात युती असताना मनपात कसं विरोधात कसं बसायचं? विरोधी पक्षनेतेपद कसं स्विकारायचं? मग ते विरोधी पक्षनेतेपद गेलं काँग्रेसकडं. हा असला विचार ही बाबरसेना युतीत असताना कधीच करत नव्हती. सतत खिशातल्या राजीनाम्याचे कवित्व रोज नवा आकार घेत होतं. +
किंबहुना सत्तेत असताना विरोधाचं शेण कसं खायचं ह्याचा अध्याय महाराष्ट्र रोज अनुभवत होता, ह्याच सेनेकडून.
हे सारं असताना सुद्धा केवळ सद्गुणविकृतीपायी हातचं विरोधीपक्षनेतेपद भाजपनं घालवलं..
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे डोळे उघडले आणि झालेल्या दगाबाजीचा बदला घेण्यासाठी +
(उशिरा आलेली अक्कल) भाजपनं दोन वर्षानंतर विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला आणि तशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.
जी याचिका मुंबई हायकोर्टाने शिस्तीत फेटाळून लावली आहे.
कशी फेटाळून लावलीये? अगदी शिस्तीत..
कोर्टाने अगदी योग्य कारण दिलंय.. कोर्ट म्हणालं, +
"विरोधी पक्षनेत्यासारखं महत्त्वाचं पद एखाद्या व्यक्ती किंवा पक्षाच्या लहरीप्रमाणे बदलणं कायद्यात बसत नाही.."
"काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद सर्व नियम पाळून आणि कायद्याने मिळालं असल्यानं तेच विरोधी पक्षनेतेपदी राहतील.."
एवढा गोंधळ झाला असूनसुद्धा भाजपा प्रदेशाध्यक्षांना अजूनही +
सेनेसोबत जायचे संकेत (त्यांनी नंतर घूमजाव केलं) द्यावेसे वाटतात.. ही हाईट्टे.. हाईट्ट..
ही एवढी सद्गुणविकृती अनंत करमुसेंना मारहाण झाली तेंव्हा कुठे गेली होती देव जाणे.. तिथेसुद्धा आव्हाढांना लगेच नंतर जेंव्हा कोरोना झाला तेंव्हा फडणवीसांनी त्यांची चौकशी करायला फोन केला तेंव्हा+
ही विकृती दिसलीच.. कट्टर भाजपाविरोधक ताटीयाची नेमणूक कायदेशीर सल्लागारसह प्रमुख म्हणून करणं, हे कशात मोडतं? अर्थात ह्याच परत काय झालं हे विचारण्याचा मला अधिकार नाहीच..
कदाचित दिलदार समर्थकांपेक्षा दगाबाज विरोधक प्रदेश भाजपाला जवळचे वाटत असावेत..
लाथा मारणाऱ्यांना प्रदेश भाजपा
जवळ का करते?
ह्या अश्या बाबतीतला 'मोदी-शहा'इझम ह्यांना कधी कळणारे?
विरोधकांना 'व्यवस्थित ओळखून' बांबू लावायचा असतो, त्यांना बांबूचे घर बनवायला मदत करायची नसते. हे प्रदेश भाजपाला आतातरी कळणारे? का परत "येरे माझ्या मागल्या?"
उद्धव नाही तर मग राजला घेणारच का? +
लाथ एका नवीन पॅकिंगमधून?
हे पोहोचणारे का वरपर्यंत? कि एक फुटकळ पोस्ट म्हणून नेहमीप्रमाणे दुर्लक्षिली जाणारे? देव जाणे.
#देवच_जाणे
@Dev_Fadnavis
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
