🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4W2lm

Sep 22, 2020, 16 tweets

मी स्वता मराठा आहे.मी '२०१८' मराठा आरक्षणाच्या 'मुक मोर्चा' मध्ये ही सहभागी झालो होतो आणि कालच्या पंढरपूर बंदमध्ये ही सहभागी झालो..'शिवाजी चौक' पंढरपूर येथे सकाळी १० वाजल्यापासून दुपारी जवळपास २ वाजेपर्यंत भर ऊन्हात थांबलो होतो कारण हे आरक्षण किती महत्त्वाचं आहे हे मला माहितीय #म

मला थोडे स्पष्ट बोलायचे आहे..माझा थ्रेड वाचनारे बर्यापैकी आहेत,त्यांची माझ्या मताशी सहमती नसेल तर ते बिनधास्त बोलु शकतात किंतु मला वैयक्तिक वाटतय की त्यांनी आज बोलावच!! पण आंदोलनात स्थानिक पातळीवर लोकांशी बोलताना मला जाणवले की ठराविक लोकांमध्ये किती गांभीर्य आहे..
'मुक मोर्चा' ची

दखल अख्ख्या देशाला नाही तर अख्ख्या जगाला घ्यावी लागली कारण एका विशिष्ट समाजाचे लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करत कोणताही कायदा हातात न घेता त्यांनी आपले म्हणणे मांडले.कालपण आंदोलन झाल त्यात पण अनेकांनी कोरोनाची भिती न बाळगता उत्साहाने सहभाग घेतला.

पण मला काय खटकलं की..
आपण आरक्षण मागतोय कारण आपल्या समाजातले अनेक जण सामाजीक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत म्हणुन..पण माझ्यासारखे कुणी निरिक्षण केले असेल तर पाहा आंदोलनात सहभागी होणारे माझे ठराविक बांधव आलिशान गाडीतुन उतरतात..ज्या गाडीला शक्यतो गोल्डन नंबर असतो..@MarathiDeadpool

दुसरी गोष्ट महिला व पुरुष दोघेपण,कार्यक्रमात घालायचे कपडे घालुन सहभागी होतात..एक बांधव काल माझ्या बाजूला थांबला होता तर त्याच्या गळ्यात जवळपास १० तोळ्याची सोनसाखळी असावी..काहींच्या अंगावर 'लिनन'चे कुर्ते पायजामे..अरे का? कशासाठी?
१० पैकी ८ मराठा गरिब आहे पण असल्या काही लोकांमुळे

त्या ८ जणांकडे पाहायचा दृष्टिकोन बदलुन जातो..आपल्याला आरक्षण मिळालच पाहिजे पण त्यासाठी आपण ते किती गांभीर्याने मागतोय हे आपल्या कृतीतून झळकलं पाहिजे..इंद्रदेवाला ही कर्णाकडे कवचकुंडले मागायला येताना साक्षात गरिब याचकाचे रूप धारण करावे लागले होते..तो तर इंद्र..देवांचा देव..तरीही..

काल मला समजले की महाराष्ट्र सरकारमधील २८८ आमदारांपैकी १८२ आमदार हे 'मराठा' समाजाचे आहेत..मग का हे मराठा आमदार एव्हढे उदासिन?? का तुम्ही तुमची मागणी एका दिशेने लावुन धरत नाही?
एक सरकार येत, आरक्षण देत..पुढच सरकार येत आरक्षण जात..त्याच्या पुढच सरकार येत परत तेच आरक्षण देत..परत

तेच तेच repeat repeat होत रहात..पण ह्या लोकांना एव्हढही समजत नाही कि कित्येक मुलांचे महिने तर काहिंचे अख्खे वर्ष वाया जातात..स्पर्धा परीक्षा देणारे बांधव तर खचुन गेले कारण माझ्या ऐकण्यात आलं की नोव्हेंबर मधील संयुक्त पुर्व परिक्षेमध्ये SEBC कोटामधुन मराठ्यांसाठी ज्या ८५ जागा

आरक्षित होत्या त्याबद्दल आयोगाची भुमिका आरक्षणावर आलेल्या स्तगितीमुळे सध्यातरी अस्पष्ट आहे(सरकार सांगेल तस आयोग हालचाल करत)(माझी माहिती चुकली असेल तर बिनधास्त सांगा)
***जे आरक्षण घेऊन officers झाले त्यांचे कुटुंबीय आजही आरक्षणाचा वापर करतात..आता खरच त्यांना गरज आहे का ओ? #आरक्षण

त्या बहुतांश समाजापर्यंत आरक्षण निट पोचलेलेच नाहीय.. किंबहुना आरक्षणाबद्दल त्यांचे पाहिजे त्या प्रमाणात प्रबोधन झालेले नाहीय..त्यात त्यांची काय चुक आहे हे पाहण्यापेक्षा त्या समाजाच्या लोकप्रतिनिधींनी किती तळमळीने समाज उद्धारण्याचे काम केले हे सर्वांना माहितीय..आज तुम्ही ज्या

समाजाच्या पाठिंब्यावर निवडुन येता त्याच समाजाच्या प्रगतीसाठी तुम्ही झटत नाही.. शोकांतिका..मी मांडलेले सर्व मुद्दे personally घेण्यापेक्षा generally घ्या म्हणजे तुमचे माझ्याबद्दलचे मत जन्मताना सुदृढ जन्मेल..ना की कोणत्याही गैरसमजाच्या विषाची कुपी घेऊन जन्मेल..

काल माझे काही मराठा बांधव इतक सुस्पष्ट आणि मुद्देसूद बोलले की त्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे!!🔥🔥♥️♥️
समाज जागृत होताना पाहुन मला खुप आनंद झाला आणि मी ही या चळवळीचा आणखी एकदा हिस्सा झालो याचा सार्थ अभिमान वाटला..काल RPI आणि वंचित आघाडीच्या बांधवांनी ही जाहीर पाठिंबा दिला..

मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत..त्यांचे कामच आहे जनतेची सेवा करणे..काही ठराविक प्रतिनिधी मतदारसंघातुन फिरताना त्यांच्या AC गाडीच्या काचा खाली करत नाहीत आणि लोक त्यांना जाब विचारायचा सोडुन त्यांचाच उदो उदो करतात...उठा जागे व्हा आणि

संविधानाने दिलेल्या हक्काचा वापर करा..सरकारला कोंडीत पकडा..मग ते केंद्र असो वा राज्य असो.. doesn't matter..ज्यांना तुम्ही खांद्यावर घेऊन नाचता ना वेळेप्रसंगी त्यांना खाली आपटायला ही शिकलं पाहिजे..तरच त्या झोपलेल्या कुंभकर्णांना जाग येईल..
#म #मराठाआरक्षण #मराठाआरक्षणस्थगिती

काल आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देणार्या सर्व जातीतल्या बांधवांचे,पत्रकारांचे,एव्हढ्या प्रखर ऊन्हात बसलेल्या सर्व महिलांचे व आबालवृद्धांचे खुप खुप आभार... आंदोलन शांततेत पार पाडण्यास मदत करणारे पोलिस व वैद्यकीय सेवा पुरवणारे सर्वजण यांच्याबद्दल कायम आदर राहिल no doubt..♥️♥️🙏🙏

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling