#आजचा थ्रेड 23-09-20
प्रिय देवघरास
प्रथम तुला विनम्रपुर्वक नमस्कार. तुझं स्थान हृदयात आहे. अगदी लहानपणापासुन आपलं नातं आहे अगदी आजन्म . सगळ्या भल्याबुऱ्या प्रसंगांचा तू एकमेव साक्षीदार. तुझ्यापासून काहीच लपत नाही. चुकलं तर कानउघडणी तुच केली आहेस 1/1
आणि चांगल्या गोष्टींसाठी पाठीवर शाबासकीची थापसुद्धा तूच दिली आहेस.
तू घराचं आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनाचं मांगल्य पावित्र्य जपतोस. तुझी सुसंगत असेल तर पावलं कधी वाईट मार्गाने वळणार नाही.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू अगदी मायेने खंबीरपणे पाठीशी उभा आहेस निरंतर.1/2
तुझ्यासमोर बसून शुभंकरोती शिकलो . नंतर रामरक्षा ...आणि बरेच काही.तेव्हापासून तू खुप जवळचा आहेस रे .तुझ्याशी सगळी गुपितं मनमोकळेपणाने सांगू शकलेय ...तू मला तेवढ्याच विश्वासाने धीर दिलास .. आभार नाही मानणार पण अशीच कायम तुझी साथ हवी ... तू मला कधीच एकटं पडू दिलं नाहीस ..1/3
तुझ्यामुळे खडतर प्रसंगही अलगद झेलले गेले..असंच तुझ्या ऋणामध्ये कायम असू देत
आणखी एक गोष्ट.... तू सर्व देवदेवाधिकांना तुझ्या उदरामध्ये किती मोठे स्थान दिलेस..किती छान आणि तुझेही भाग्य थोर हो..सर्व देवदेवता तुझ्या अंतरात किती मायेने रहातात .त्यांना तर सगळेच जण नमतात भजतात 1/4
माझ्याही अंतरी मनोमन देवाबद्दल श्रद्धा आहे.
देवांचं घर देवघर देव देवतांच्या सात्विक लहरींनी तू तेजाळतोस..देवांच्या मांगल्याच्या ओजाने तू लखलखतोस तुझ्यामध्ये देवाचा विसावा असतो,त्यामुळे आमचं घरही आमचं नसतंच मुळी , तेही तुझ्यासारखं देवाशी एकरूप होवून जातं 1/5
ते सुद्धा देवाचं घर होवून जातं .
देवघरा तुझं रुपडं किती छान दिसतं रे ...सर्व देव देवी भल्या पहाटे स्नान करून.भरजरी वस्त्रालंकार लेवून.सुंगधी अत्तर आणि फुलांचा शृंगार करून स्थानापन्न होतात अत्तर आणि धुपदिपाचा सुगंध घरभर दरवळतो..तुझ्यासमोर सुंदर देखणी अशी रांगोळी रेखाटली जाते.1/6
आणि नैवेद्य दाखवून देवाच्या आरतीने घर उजळून निघते ....... बस्स! आणखी दुसरे सुख ते कोणते? अशी प्रसन्न सकाळ देवघरा तुझ्यामुळे आम्ही पहातो.अगदी रोज.ही शाही मेजवानीच तर असते रे अशीच प्रसन्न सकाळ रोज आम्हा सर्वांच्या आयुष्यात असावी आणिक काय हवं ☺ ....तुझीच दिपश्री
या पत्राचे उत्तर जे देवघराने दिले आहे ते मी उद्या tweet करेन..
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
