iPragati Profile picture
Dancelover•Fun•Family•Live•Love•Laugh• Media.Proud Indian(Me Marathi)-PNQ-LHR
Feb 21, 2022 8 tweets 3 min read
Nice and positive thought I came across:

एक छान अनुभव जो मी स्वत: आजही घेत आहे, तुमच्यासाठी पाठवत आहे. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. नुकसान अजिबात नाही. 😊

रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत.... याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?'
Jan 24, 2022 11 tweets 2 min read
आप्पा बळवंतांच आडनाव?
आप्पा बळवंत चौक सर्वज्ञात ठिकाण. या अप्पा बळवंतांचं आडनाव काय?
कोणतंही पुस्तक पाहिजे असेल तर ते हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे *अप्पा बळवंत चौक* गणपतीची आरती असो, देवीची आराधना करणारं श्रीसूक्त. शाळा, कॉलेज, अभियांत्रिकी विद्यालय, वैद्यकीय विद्यालय, या सर्वांची पुस्तकं असो, ती मिळणारच या चौकातल्या ओळीने बसलेल्या दुकानातूनच. जुन्या पुस्तकांची खरेदी-विक्रीही इथेच चालते. मोठाल्या पिशव्यातून पुस्तकं भरून ठेवून विक्रेते ग्राहक पटवतात. रस्ता अडवला म्हणून तक्रार करणारे अधिकारी
Jan 23, 2022 23 tweets 4 min read
A beautiful message I received on WA
पहाटेची अमर्याद ताकद*...
*तुम्ही सकाळी किती वाजता उठता?*
*हेल एरॉल्ड* नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती. झाला, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.पण तो हार मानणारा नव्हता, यातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं?

*“हेल, तु सकाळी लवकर उठ!”* “बाकी सगळं आपोआप होईल”या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला,
Sep 10, 2021 21 tweets 3 min read
शेवटची गणेश मुर्ती'

त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे 'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता. दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा.
'कितना को दिया.गणेशजी?'

दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा
Aug 30, 2021 8 tweets 2 min read
जन्माष्टमीच्या निमित्ताने वाचलेली, कै. दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही सर्वोत्तम पोस्ट:
🌿
कृष्णा,
तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत… खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस .तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास!
Apr 12, 2021 15 tweets 3 min read
Contact आणि Connection
मध्ये नेमका काय फरक ?
घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले.
त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले.

त्यातील एकाने साधूला विचारलं,
"साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला. पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?"
साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला विचारणे सुरु केले.
साधू : "तुम्ही न्यूयार्कचे रहिवासी का ?"
पत्रकार : "येस !! का हो ?"
साधू : "घरी कोण कोण असत?"
Mar 18, 2021 24 tweets 4 min read
#Long_Thread
धुळे येथील भारताचे एडिसन
डॉ. शंकर आबाजी भिसे
( २९ एप्रिल १८६७ ते ७ एप्रिल १९३५ )

दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे एकस्व संपादन करणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या अमेरिकेन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणाऱ्या डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा २९ एप्रिल १८६७ हा जन्मदिन.
भारताचे एडिसन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महान शास्त्रज्ञाचा जन्म मुंबईमध्ये एका मॅजिस्ट्रेटच्या घरात झाला. 'आयुष्यात भाकरीची भ्रांत सुटायची असेल तर त्यासाठी सरकारी नोकरी हा एक चांगला पर्याय आहे.
Feb 8, 2021 41 tweets 6 min read
#आजचा थ्रेड 08-02-21

कर्णपर्व!

कर्णानं अलगद मान वळवण्याचा प्रतत्न केला, पण वेदनेची एक असह्य कळ शरीरात उठली. अर्जुनानं सोडलेल्या बाणनं आपलं काम चोख बजावलं होतं. रथाच रुतलेलं चाक वर काढण्यात गुंतलेल्या कर्णाच्या डाव्या खांद्यातुन घुसुन तो बाण मानेतुन बाहेर आला होता. अर्जुनाला थांबायला सांगितल्या नंतर सुध्दा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन त्याने बाण मारला होता. "तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" हा एकच प्रश्न कर्णाला त्याही अवस्थेत सतावत होता. "धर्म?मी खरच चुकलो धर्म?"
Dec 27, 2020 8 tweets 2 min read
पुणे विद्यापीठातील हे वैदिक घड्याळ

पहा, जाणून घ्या आणि समजून घ्या की सगळ्या भारतीय वस्तुंना कसे-कसे नष्ट केल्या गेले, पूर्णपणे अवश्य वाचावे. ◆ 1:00 वाजण्याच्या स्थानावर ब्रह्म लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की ब्रह्म एकच आहे.

एको ब्रह्म द्वितीयो नास्ति

◆ 2:00 वाजण्याच्या स्थानावर अश्विनौ लिहिलेले आहे ज्याचे तात्पर्य हे आहे की अश्विनी कुमार दोन आहेत.
Dec 25, 2020 10 tweets 2 min read
#Gratitude

Gratitude is a way for people to appreciate what they have instead of always reaching for something new in the hopes it will make them happier, or thinking they can't feel satisfied until every physical and material need is met. Gratitude helps people refocus on what they have instead of what they lack. And, although it may feel contrived at first, this mental state grows stronger with use and practice.
Dec 11, 2020 10 tweets 2 min read
☘️ निवडक व.पु. काळे ☘️
एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. ह्या अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो, म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला.. कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी "आपल्याला दुखावलं" म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना
वजा केलं होतं ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच !
Dec 2, 2020 14 tweets 2 min read
पंचगंगा मंदिर...........
महाबळेश्वर
महाबळेश्वरमधील पवित्र स्थानांपैकी एक पंचगंगा मंदिर आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच वेगवेगळ्या नद्यांमधून पाणी या ठिकाणी सामील होते. पाच नद्यांच्या संगमाने पंचगंगा नाव दिले आहे जेथे पंच म्हणजे पाच आणि गंगा म्हणजे नदी. सर्व नद्या दगडांच्या बाहेर कोरलेल्या गायीच्या तोंडातून बाहेर येतात. अशाच जागेला पंचगंगा मंदिर असे म्हणतात.
Oct 28, 2020 35 tweets 6 min read
#आजचा थ्रेड 28-10-20

मोठ्या मनाचा छोटा सेल्समन

भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता........

‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला. मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला.
Oct 14, 2020 13 tweets 2 min read
#आजचा थ्रेड #Thread 14-10-20

नवरात्र

थोड्याच दिवसांनी नवरात्र सुरू होतील
देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते.
पण आपण जर आजूबाजूला शोधले तर ही देवीची नऊ रूपे आपल्या घरातच सापडतील ते असे

‘रूप पाहता लोचनी' आपण बालपणापासून देवीची विविध रूपे पदोपदी पाहत आलोय.

पहिली माळ - ‘मातृदेवतेची'.
जी आपल्यासाठी कष्ट उपसताना दिवस-रात्र, आजारपण, थकवा, तहान-भूक कशाचीही पर्वा करत नाही.
आपल्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करणे सोडत नाही.
मातृदेवते, तुला शतशः प्रणाम !
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Oct 12, 2020 13 tweets 3 min read
#आजचा थ्रेड #Thread 12-10-20

विनम्रता

एकदा एक राजा त्याच्या प्रधान, सेनापती आणि सैनिकांसह शिकारीला निघाला वाटेत अरण्यात पुढे त्यांची ताटातूट झाली. मग प्रधानाने राजाच्या शोधार्थ सैनिकाला पाठवले अरण्याच्या मध्यभागी एका साधूची झोपडी होती. साधू झोपडीच्या बाहेर झाडाखाली बसलेला असतो. पण तो साधू आंधळा असतो. सैनिक साधूच्या जवळ येतो आणि घोड्यावरूनच विचारतो,
काय रे गोसावड्या आमच्या महाराजांना हिथून जाताना पाहिलेस काय?
Oct 10, 2020 10 tweets 2 min read
#आजचा थ्रेड #Thread 10-10-20
नैवेद्यासाठी पुरणच का?

अत्री ऋषी आणि अनुसूया एकदा महादेव आणि पार्वती कडे जेवणाचं आमंत्रणं घेऊन जातात. सर्वांना जेवायला बोलावतात. कार्तिक घरी नसतो पण गणपती असतो. छोट्या गणपती ला घेऊन यायचा ते आग्रह करतात. पण पार्वती ला गणेशाची क्षुधा माहीत असते म्हणून ती त्यांना सांगते की ती व महादेव येतील आणि कार्तिक परत आला की पुन्हा एकदा सगळे येतील. पण अत्री पुन्हा त्यांना गणपतीला घेऊन यायचा आग्रह करतात आणि पार्वतीचा नाईलाज होतो.
Oct 1, 2020 10 tweets 2 min read
आई तुळजाभवानी...

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून २१ दिवस निद्रा घेते. उरलेले ३४४ दिवस देवी अष्टौप्रहर जाग्रृत असते. निद्रा समयी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन (दंड नेसवने)केले जाते व विधिवत् पलंगावर निद्रेसाठी ठेवले जाते. असे असणारे तुळजाभवानी शक्तीपिठ एकमावाद्वितीय आहे

मंचकी निद्रा:-

देवीची मंचकी निद्रा २१ दिवसात विभागलेली आहे

सर्व प्रथम मंचक म्हणजे काय ?

मंचक याचा अर्थ पलंग असा आहे.

देवी भवानीची निद्रा तीन प्रकारात विभागली आहे ती अशी👇🏼
Oct 1, 2020 8 tweets 2 min read
ग. दि. मा.
1 ऑक्टोबर,आजचाच दिवस, साल 1919. माणदेशातील एक दुर्गम, दुष्काळी व दारिद्र्याने पिचलेले एक खेडेगाव शेटफळ.
गावच्या कुलकर्ण्यांची सून घरीबाळंतपणासाठी आलेली.गावात कुठलीच वैद्यकीय सुविधा असण्याचा प्रश्नच नव्हता.संध्याकाळी गावच्या सुईणीने मोठ्या मुश्किलीने सुनेची सुटका केली. मुलगा झाला म्हणून सर्वांना आनंदही झाला. पण बाळ काही रडेना. सर्वांच्याच चेहऱ्यावर काळजी. कितीतरी वेळ ते बाळ निपचित पडून होते. अनुभवी बायका अनेक प्रकार करून त्या बाळाला जागे करण्याचा प्रयत्न करीत होत्या पण ते बाळ कोणताच प्रतिसाद देत नव्हते. अशा स्थितीतच काही तास गेले.
Sep 28, 2020 9 tweets 2 min read
#आजचा थ्रेड 28-09-20
आपले किती Account Closed झाले

कसे आहात..??"
एवढा एकच प्रश्न तिने विचारला..
आणि रोज दिसणाऱ्या पण परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो..
ती म्हणाली.."भरपूर रडून घ्या..मला वेळ आहे.आजच रडायचं आणि नंतर डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.." त्या नंतर तिने जे काही सांगितलं..त्यानंतर कायापालट.
"तिनं काय सांगितलं..??" म्हणाली.."की आपण हा जो जन्म घेतलाय तो अपेक्षापूर्तींकरिता नाही.आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही तर आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात.त्या पूर्ण होत नाहीत.उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"
Sep 26, 2020 7 tweets 2 min read
#आजचा थ्रेड 26-09-20
सुख म्हणजे नक्की काय असत ?
एखादी लहानशी घटना आठवून चेहऱ्यावर एका क्षणात हसू येते त्यालाच सुख म्हणतात . “आमटी छान झाली आहे ग ” असे आपल्या ह्यांनी म्हणणे, “आमच्या सुनेची भाजणी छानच होते”, हे सासुबाईंचे वाक्य कानी पडते ,तेव्हा मनास जो आनंद होतो ते सुख असते.1/1 आपल्याला अगदी हवी तशीच साडी खरेदी होते ते सुख असते .
घराच्या भिंतीना साजेसे पडदे मिळणे हेही सुखच असते. मनासारखा स्वयंपाक होणे, आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींमध्ये मनसोक्त रमणे, गप्पा मारणे हेहि आनंदच देवून जाते. मुलांना भरभरून मार्क्स मिळालेले प्रगतीपुस्तक 1/2
Sep 23, 2020 8 tweets 2 min read
#आजचा थ्रेड 23-09-20
प्रिय देवघरास
प्रथम तुला विनम्रपुर्वक नमस्कार. तुझं स्थान हृदयात आहे. अगदी लहानपणापासुन आपलं नातं आहे अगदी आजन्म . सगळ्या भल्याबुऱ्या प्रसंगांचा तू एकमेव साक्षीदार. तुझ्यापासून काहीच लपत नाही. चुकलं तर कानउघडणी तुच केली आहेस 1/1 आणि चांगल्या गोष्टींसाठी पाठीवर शाबासकीची थापसुद्धा तूच दिली आहेस.
तू घराचं आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनाचं मांगल्य पावित्र्य जपतोस. तुझी सुसंगत असेल तर पावलं कधी वाईट मार्गाने वळणार नाही.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू अगदी मायेने खंबीरपणे पाठीशी उभा आहेस निरंतर.1/2