Dr. Nishigandha Profile picture
निशिगंधा Dentist मनातलं वादळ शब्दांतून मांडायचा प्रयत्न views are personal #व्यथांच्याकथा (संचित माझ्या मनातलं सारं व्यथांच्या कथेतून सांगायचं)

Sep 23, 2020, 15 tweets

Covid-19 या आजाराने सध्या थैमान घातलं आहे. याच आजारातून बरे झालेल्यांना अजूनही बरीचशी लक्षण दिसत आहेत. आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात हाती आलेले‌ काही निकष या थ्रेडमध्ये मांडत आहे. कोविड होऊ न देणं आणि मास्क सॅनिटायझर चा वापर करणं हाच सध्या रामबाण उपाय आहे.१/n
खालील लक्षणे:-

लक्षणे सौम्य ते तीव्र आढळून येतात
१.मेंदूशी संबंधित लक्षणे- चक्कर येणे, विसराळूपणा, दुःखी वाटणे ,गोंधळ होणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी, निद्रानाश, चव आणि वासाची संवेदना बदलणे, अनामिक भीती वाटते, चिडचिडेपणा.
२.केस गळणे.
३.अंगदुखी, थंडी वाजून ताप येणे,अंग थरथरणे, वजन कमी होणे.२/n

४.Herpes शी निगडीत आजार, EB व्हायरस शी संबंधित आजार, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, हार्मोन( संप्रेरक)मधील चढ-उतार, उष्णता सहन न होणे.
५.सांधेदुखी
६.लघवीतून प्रथिने उत्सर्जित होणे.
७.फुफ्फुसावरील परिणाम-
दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे,श्वास पुरेसा घेता न येणे. धापा टाकणे.
३/n

८.स्नायूंवरील परिणाम- वाताचा झटका येणे, स्नायूदुखी‌
९.पचनसंस्थेवरील परिणाम- GERD , जुलाब लागणे, छातीत जळजळ होणे, अपचन, उल्ट्या होणे.
१०.घसा- घसा खवखवणे, कफ, घसा कोरडा पडणे, घसा दुखणे, गिळताना त्रास होणे,घसा लाल होणे.
११. अनेमिया
१२.छातीत कळ येणे, अचानक जोरात दुखणे, दाब जाणवणे४/n

१३.प्रचंड डोकेदुखी
१४. डोळे- अंधुक दिसणे, नजर कमजोर होणे, डोळे कोरडे पडणे,
१५. नाक चोंदणे, एकसारखा स्त्राव होते.
१६.कान- कानदुखणे, कानातून एकसलग आवाज येणे, कानावर दाब जाणवणे.
१७.पाठदुखी
५/n

१८.पायाच्या तळव्यांना सूज येणे, पाय दुखणे
१९.त्वचेवरील परिणाम- कोरडी त्वचा, कोंडा, गांधी येणे, त्वचेची आग होणे, काही ठिकाणी त्वचेचे वरील आवरण निघून जाणे.
२०.अचानक चक्कर येऊन पडते
२१.अधिक किंवा कमी रक्तदाब
२२.रक्तातील साखर आर्श्चयरित्या वाढणे.
२३.ह्रदय- अनियमित ह्रदयाचे ठोके, ६/n

ह्रदयाची ठोक्यांची गती वाढणे, (tachycardia, palpitations, arrhythmia)
याचबरोबर काही पेशंटमध्ये अतितीव्र लक्षण आढळून आली आहे.
ह्रदयाला आणि यकृताला सूज येणे, रक्ताच्या गाठी तयार होणे, फुफ्फुसात स्नायूंभध्ये फायब्रॉसिस होणे, स्कारिंग होते, मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि मृत्यू.
७/n

Cardiomyopathy, hepatomegaly, multiple organ failure,lung fibrosis,lung failure,lung scarring, brain fog are also noticed on CT and MRI.
KEM HOSPITALमध्ये सध्या कोरोनातून बरे झालेल्या पण तरीही इतर लक्षण दाखवणाऱ्या २२ पेशंटवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये श्र्वास घेण्यास त्रास
८/n

होणे ते lung fibrosis and lung scarring अशा लक्षणांचे पेशंट आहेत‌. जगभरात केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणातून या अनेक गोष्टी समोर येत आहे.
सध्यातरी यावर कोणतेही लस तयार झाली नाही. ९/n

मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, हात धुतल्याशिवाय नाक व तोंडाला लावून नये अशा साध्या उपायांना आपण प्रतिबंध करू शकतो. अजूनही या आजाराची तीव्रता कमी झाली नसून ऑक्टोबर नंतर येणारी लाट ही अधिक गंभीर आणि तीव्र स्वरूपाची असण्याची शक्यता आहे.१०/n

आपण आपली काळजी आणि कुटुंबाची काळजी घेणे हेच सध्या महत्त्वाचं आहे.कोरोना इतका सहज आणि सोपा धरू नका.होणारे परिणाम गंभीर आहेत. काळजी घ्या.
माहितीसाठी इतर लिंक खाली देत आहे.
#कोरोना
११/n

@docmchon Thank you for all help and gathering all necessary information 🙏🙏😊😊
bmj.com/content/370/bm…

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling