🐢 Profile picture
parody ! Not associated with any turtle.😜 l #मराठीबाणा🏹

Sep 24, 2020, 19 tweets

#thread
#भाग१
#सत्यशोधकसमाज

२४ सप्टेंबर १८७३ रोजी ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आज १४७ वर्षे झालीत.
सत्यशोधक समजाचा संपूर्ण भारताच्या जडणघणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया (1/19)

👇👇👇

भारतीय सुधारणा चळवळी मध्ये महात्मा फुले यांच महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांनी स्त्री, शुद्रादी, अतिशुद्रांना सन्मानाचे व समतेचे जीवन जगता यावे, यासाठी पुरूष प्रधान संस्कृती व जातीभेद यांच्यावर कठोर प्रहार केले. संपूर्ण सामाजिक संरचना क्रांतिकारक रित्या बदलल्याशिवाय स्त्रियांची(2)

बंधमुक्तता, जातीभेदाचे निमूर्लन व समता निर्माण होण्याची मुळीच शक्यता दिसत नव्हती. ही गोष्ट एकटयाने होणे शक्य नव्हते. निश्चित अशी विचारसरणी, तत्त्वज्ञान निश्चित करून संघटना निर्माण करण्याची आवश्यकता होती. (3/19)

महात्मा फुले यांचे जुना गंज, पुणे. येथे बाणेकराचे तालमीच्या जवळ जोतीबाचे मुशी विकण्याचे दुकान होते तेथे महात्मा फुले यांची मित्र मंडळी जमत असत. तेथे 'बीजक' सारख्या ग्रंथावर चर्चा, विनिमय होत असे. परंतु त्यांची मनोवृत्ती स्वस्थ राहिली नाही ते नेहमी म्हणत की, ब्राम्हणांनी (4/19)

ब्राम्हणेत्तरांचे अतिशय नुकसान केले आहे. त्यातूनच ब्राम्हणांपासून ब्राम्हणेत्तरांची सुटका कशी होईल हे विचार त्यांच्या मनात खेळू लागले. ते म्हणत की, माझ्या एकटयाने सुटका होणार नाही. मला इतर मंडळी सहाय्य होईल तर काही करता येईल. त्यावरून सोबत (5/19)

असलेल्या मंडळीने त्यास सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. नंतर मंडळ स्थापन करून त्या मंडळास एक नाव द्यावे असे सर्वानुमते ठरविले. या मंडळास कोणते नाव द्यायचे याबद्दल मंडळीत बरीच वाटाघाट झाली. (6/19)

शेवटी सत्-खरे, शोधक-तपास करणारा, मंडळ-समाज, म्हणजे सत्याचा तपास करणारा समाज असे नाव देण्याचे ठरून तारीख २४ माहे सप्टेंबर १८७३ रोजी 'सत्यशोधक समाज' स्थापन झाला
त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक पुर्नजागरण चळवळीला गती मिळाली. (7/19)

*सत्यशोधक समाजाचा उद्देश*

'ब्राम्हण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादी लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांना मुक्त करण्याकरीता व आपल्या मतलबी ग्रंथाच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत. यास्तव सदउपदेश व विद्याद्वारे त्यास त्यांचे वास्तविक (8/19)

अधिकार समजून देण्याकरीता म्हणजे धर्म व व्यवहारासंबधी बनावट व कार्यसाधक ग्रंथापासून त्यांस मुक्त करणे.

महात्मा फुले यांनी प्रथम जो हल्ला केला तो सर्व पुरोहित वर्गावर केला. कारण यावेळी ब्राम्हणांच्या सर्व किल्ल्या पुरोहित वर्गाच्या हातात होत्या. पुरोहित (9/19)

वर्गाच्या हातून हया किल्ल्या हिसकावून घेतल्याखेरीज आपल्या चळवळीला जोर नाही. हे लक्षात आणून पुरोहित वर्गच नको देव आणि भक्त यांच्यामध्ये हा दलाल हवाच कशाला. असा आपला विचार समाजापुढे मांडून महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचा उद्देश स्पष्ट केला. (10/19)

*सत्यशोधक समाजाचे नियम*

परिवर्तनीय, सर्वसमावेशक व लोकशाहीस पोषक नियम सत्यशोधक समाजाचे होते. यातील बहुतांश नियम आजही आपल्याला सामाजिक संस्थांमध्ये पाहायला मिळतात. (11/19)

सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान*

सत्यशोधक चळवळ ही काही शाश्वत मूल्यावर आधारलेली होती. मानवतावाद,बुध्दीप्रमाण्यवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य या थोर मानवी मूल्याची जोपासना या चळवळीने केली. मानव तेवढा एक त्यांच्यातील जातिभेद, धर्मभेद, राष्ट्रभेद किंवा खंडभेद हे खोटे आहेत. यावर (12/19)

महात्मा फुले यांचा अखंड विश्वास होता.

याबाबत ते आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म' पुस्तकामध्ये म्हणतात,

"आपल्या सर्वाच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व स्त्रियांस अगर पुरुषास एकंदर सर्व मानवी हक्कासंबंधी आपले पाहिजेत तसे विचार, आपली पाहिजेत तशी मते बोलून दाखविण्यास, लिहण्यास (13/19)

आणि प्रसिध्द करण्यास स्वतंत्रता दिली आहे. स्त्री अथवा पुरुष जे एकंदर सर्व गावच्या, प्रांताच्या, देशाच्या व खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याही धर्मातील मतांच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची आवडनिवड न करता या सर्व स्त्री पुरूषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने, एकजुटीने(14)

व एकमेकांशी सत्यवर्तन करुन वागावे. इतकेच काय, एकाच घरात बौध्दधर्मी बायको, ख्रिस्त धर्मी नवरा, इस्लाम धर्मी कन्या व सार्वजनिक सत्यधर्मी पुत्र यांना प्रेमाने नांदायला लावील तोच खरा धर्म."

*सत्यशोधकी जलसे*

सत्यशोधक चळवळीच्या प्रचार व प्रसारासाठी वेगवेगळी माध्यमे वापरली गेली. (15)

त्यामध्ये 'जलसा' हे महत्त्वपूर्ण साधन बनले. संपूर्ण महाराष्ट्रात लहानमोठया गावात सत्यशोधक जलसाकार जात असत. रात्रभर लोकांचे प्रबोधन करून सत्यशोधक ब्राम्हणेत्तर मतांचा प्रसार आणि प्रबोधन असा कार्यक्रम असायचा. अस्पृश्यतेला विरोध, शिक्षण महत्त्व, जातीविरोध व (16/19)

अंधश्रध्दा इत्यादी विषयांना हात घातला जात असे.
सत्यशोधकी विचार आत्मसात करण्याची मानसिक तयारी बहुजन समाजाची झाली नव्हती. मात्र महात्मा फुले यांचे विचार खेडयापाडयापर्यंत पोहचविण्याचे कार्य जलस्यांनी केले. सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचे खऱ्या अर्थाने स्मरण झाले 17

ते जलस्यामुळे! सर्वत्र अडाणी समाज असल्यामुळे लिहीता वाचता येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे महात्मा फुले यांनी लिहिलेल्या 'गुलामगिरी', 'बाम्हणांचे कसब', 'सार्वजनिक सत्यधर्म', 'अखंड काव्यरचना', 'तृतीयरत्न नाटक' आदी ग्रंथात काय लिहिले हे त्यांना कसे कळणार? म्हणून हे विचार (18)

जलश्यातून सांगितल्या गेल्याने त्यांचा प्रभाव अधिक पडत गेला. जलस्यातील गाणी अत्यंत साधीसुधी अडाणी लोकांना कळेल अशीच होती. ढोलकी तुणतुणेच्या तालावर ती गायली गेल्याने मराठमोळया जनतेला ती समजत होती. त्यामुळे महात्मा फुले यांचा संदेश लोकांपर्यंत पोहचविणे त्यामुळे सोपे झाले. (19/19)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling