एक एकसंध समाज म्हणून असलेली ताकद आणि प्रगल्भता आपण गमावून बसलोय.. 'Divide and Rule' हा खेळ आपल्यावर खेळला गेलाय..आणि समाज त्यात हरला. मग त्यास धर्म,जात,वेश,उदरनिर्वाहाचे साधन,आर्थिक परिस्थिती,लिंग, वय असे अनेक पदर आहेत. #म 1/n
मी काल म्हणलं तसं.. नोटबंदीचा फायदा मला नाही झाला तरी चालेल पण या श्रीमंतांचा माज उतरायला हवा..अशी विचारपद्धती बळ धरू लागली त्यासाठी 'सूड' हे नाट्य वेळोवेळी रंगवलं गेलं.. गरिबांसाठी नोटबंदी हा श्रीमंतांवरील सूड आहे असं चित्र रंगवलं गेलं..पठाणकोट, उरी ही उदाहरणे.. 2/n
मॅगी अजिनोमोटो प्रकरणात परदेशी कंपन्यांवर आपल्याला सूड उगवायचा आहे ही मानसिकता रुजवली गेली.. 'आपलं घर' या विषयी ममत्व असणाऱ्या जनतेत स्वदेशी विषयी तर ममत्वाचा लोंढाच आला..त्यातून फायदा नेमका या फूट पाडणार्यांनी उठवला ही वस्तुस्थिती आहे.. 3/n
2012 पासून सुरू असलेल्या गोंधळाचा परिपाक हा 'आप' मध्ये कधी परावर्तित झाला हे जनतेला कळलं देखील नाही..काँग्रेसला नालायक ठरवण्याच्या नादात जनतेला आपण कोणाला पाठींबा देतोय याची जराही कल्पना न्हवती. कोणाचा पायपोस कोणाला न्हवता अशी ती वेळ.. तिथं आपल्या घातास सुरवात झाली. 4/n
साक्षात काँग्रेसही पूर्ण बॅकफूट वर गेलेली दिसली.त्यामुळे जनतेस अधिकच चेव आला.पुढे काँग्रेसवरील एक ही आरोप सिद्ध झाला नाही तेंव्हा वेळ टळली होती.मात्र नियतीने डाव साधला होता.जनतेत कोणीतरी आता पप्पू म्हणून हीन पात्रतेचा झाला होता.पण तो पप्पू होता की न्हवता आता कळूनही उपयोग नाही.5/n
रोहित वेमुला प्रकरण असो, तुकडे तुकडे गॅंग असो की गो हत्या वाली घटना असो आमच्यावर नेहमी हेच बिंबवलं गेलं की ही लढाई आता 'ते विरुद्ध आपण' आहे.. ते व्हीक्टीम सांगत होते आपण एक आहोत..पण न्यायाधीश बनलेल्या समाजाने वकील बनलेल्या मिडियावर विश्वास ठेवला..आणि समाजास फुटीची शिक्षा दिली.6/n
रंगावरून माणूस कोणत्या पातळीचा आहे हे ठरवणारा समाज आता कोणाच्यातरी सांगण्यावरून कपड्यावरून दंगा कोण करतंय ठरवू लागला.. तत्पूर्वी हाच समाज एका स्त्रीला 'बार गर्ल', 'जर्सी गाय' संबोधून वारे कोणत्या दिशेस वाहत आहेत हे दाखवत राहिला. 7/n
'मी शाप दिला म्हणून तो मेला..' 'आंबा खाऊन अपत्य होतं..' हे ऐकूनही समाज गप्प बसणार होता म्हणूनच की काय नियतीने खेळ खेळून आमच्या 'दाभोळकर, पानसरे,कलबुर्गी,लंकेश' यांना आमच्यातून उचलले असं वाटून गेलं. हे असं गप्प बसणं त्यांना पेलवलंच नसतं.. 8/n
ज्या महापुरुषांनी, सुधारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं रक्त हा समाज एकसंध रहावा म्हणून आटवलं.. समाजाने त्यांच्यासाहित त्यांच्या पताका झेंड्याच्या रूपाने वाटून घेतल्या.. आतातर ज्या त्या समुदायांतर्गतही गट तट पडतायत.. हे पाहून काय बोलावं हेच समजत नाही. 9/n
एखादं नवनिर्माण व्हायचं असल्यास ते नवनिर्माण बरं की वाईट हे त्याचे डोहाळे लागल्यानंतर समजतं..आपल्या समाजाचे डोहाळे हे असे आहेत..आपण पहातोय काय निर्माण केलंय आपण. झालेलं झालं आतातरी आपण ट्रॅकवर येणार की नाही हा खरा सवाल आहे. 10/n
'Tryst With Destiny' हे पंडितजींचे भाषण माहितीय ना सर्वांना? उजळणी करा त्याची.. स्वातंत्र्यानंतरचा इतिहास वाचायला हवा आपण..कारण आपल्या लोकशाही समोरील आव्हानं काय आहेत..त्या आव्हानास भिडायचं कसं त्यासाठी लोकशाही इतिहास माहिती हवा. 11/n
दुसरी गोष्ट त्यापूर्वीचा इतिहास वाचून आपण आपल्या समाजात फूट कशी पाडावी हेच शिकलो असं म्हणण्यास वाव आहे..इथून पुढे ते आपण टाळायला हवं.. आतातरी एकसंध समाज व्हावा हे प्रयत्न करूयात नाहीतर समाजकंटक कसा फायदा घेतात हे आपण 'नविन भारत' सदराखाली पाहिलंच आहे. कळावे ❤ n/n
@Omkara_Mali @Liberal_India1 @SahilVastad @arvindgj @AtulAmrutJ @Atarangi_Kp @prathameshpurud @Gaju3112 @Nilesh_P_Z @DrVidyaDeshmuk1
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
