*अब्बक्का महादेवी*
मंगलोरपासून सुमारे १२-१४ किमी अंतरावर असलेलं एक छोटंसं संस्थान"उल्लाळ". तिथली राणी होती अत्यंत शूर व धाडसी *हिरिया (थोरली) अबक्का चौटा*!
सोळाव्या शतकात भारतात पोर्तुगीजांच्या वसाहतवादी शक्ती बळावल्या होत्या. त्यांनी कालिकत, दिव-दमण बेटे,मुंबई व गोवा काबीज १/७
केले .पुढे त्यांनी मोर्चा वळविला मंगलोर कडे. त्यांना ते फार सहज हस्तगत होईल असे वाटले होते पण राणी अब्बकाने त्यांना प्रखर लढा दिला. जवळपास पुढील ४० वर्षे ती त्यांचे हल्ले यशस्वीपणे परतवून लावत राहिली.पण अखेर ती पराजित झाली आणि तिला खंडणी आणि जाचक अटी मान्य कराव्या लागल्या. पण २/७
आपले स्वातंत्र्य गमावल्याची खंत तिला अखेरपर्यंत राहिली.
तिची मुलगी *अब्बक्का महादेवी* हिने आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला. तिने सिंहासनावर बसताच पोर्तुगिजांना खंडणी देणे बंद करून टाकले. तिच्या या धाडसाचे आजूबाजूच्या संस्थानिकांनीच काय परंतु खुद्द तिच्या ३/७
पतीनेही समर्थन केले नाही. तिने एकटीनेच झुंजायचे ठरवले. प्रथम तिने उल्लाळच्या किल्ल्याची डागडुजी करून तो भक्कम केला. लांबच्या समुद्री प्रवासासाठी उपयुक्त अशी व्यापारी जहाजे बांधून घेतली व पोर्तुगिजांशी व्यापार संबंध तोडून टाकून कालिकतच्या झामोरिनच्या साथीने अरब व इतर पश्चिम ४/७
देशांशी व्यापार सुरू केला. अपेक्षेप्रमाणे पोर्तुगिज चिडले. त्यांनी मंगलोरच्या किल्ल्यावरून उल्लाळच्या रोखाने तोफांचा भडीमार सुरू केला.
तिने काय करावे?
ती ससैन्य त्यांच्यावर चालून गेली. जबर लढाई झाली. पोर्तुगिज कमांडरला किल्ला सोडून जीव वाचवून पळून जावे लागले.तिने किल्ल्याचा ५/७
खजिना लुटून नेला.पळून गेलेला पोर्तुगिज कमांडर गोव्याहून अधिक कुमक घेऊन परतला. त्याने उल्लाळला वेढा घातला. राणी तयारच होती. तुंबळ युद्ध झाले. पोर्तुगिजांना पुन्हा हार पत्करून पळून जावे लागले. ते पुन्हा कधीही तिच्या वाटेला गेले नाहीत.
अश्या या शूर राणीच्या महत् कार्याची आठवण ६/७
म्हणून भारतीय नौदलातील एका तटरक्षक युद्धनौकेला तिचे नांव देण्यात आले. कर्नाटकात आजही लोककथांमधून तिच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या रसभरीत कथा सांगितल्या जातात. "वसाहतवादी शक्तींविरूद्ध लढलेल्या भारतीय इतिहासातील या दोन असामान्य स्त्रिया"!!
🙏🙏🙏
#अमरचित्रकथा व आंतरजालावरून साभार
मराठीत हा धागा लिहिण्याचा उद्देश हा की महाराष्ट्रात या वीरांगना तेव्हढ्या सुपरिचित नाहीत म्हणून.
आवडल्यास शेअर करा, मुलांना सांगा.
#अपरिचित_इतिहास
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
