डेडपूल... Profile picture
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #पांडुरंग #Volleyball #Wrestling #Tilling

Sep 25, 2020, 9 tweets

व्यक्त होण्यातील अभिजातता विसरत चाललोय आपण..सुज्ञांनी हा क्षय रोखायला हवा..विरोधी विचारांचा योग्य मान सन्मान व्हायला हवा..त्यासाठी प्रत्येक विषयाचा अभ्यास हवा..त्यानंतरच मत प्रदर्शन करायला हवं..उथळ टिंगल टवाळीयुक्त व्यक्त होण्याने आपण अंतिमतः समाजाचं नुकसान करत असतो. #म 1/n

एखाद्याचे काही विचार आपल्याला न पटल्यास त्या विचारास मोडीत काढायला हवं..पण आपण ते न करता त्या विचार मांडणाऱ्यास टिंगल कम् ट्रोल करतो.. हे जरी तो विचार योग्य असला तरी घडते आहे.. याची प्रचिती समाजमाध्यमातून वारंवार येत आहे.. 2/n

स्त्रियांचा आणि पुरुषांचा आदर राखायला हवा.. हे अतीव गरजेचं आहे.. सध्या फक्त स्त्री-आदराखाली या समस्येचा लंबक आपण एकदम दुसऱ्या टोकाला नेला आहे..समाजमाध्यमात सध्या आमच्यासारख्या युथ चे बहुमत आहे.. उसळत्या रक्ताचे वय असल्याने विवेकास तिलांजली देण्याचे पातक युथ कडून घडते आहे. 3/n

दुसरं असं की युगानुयुगे प्रत्यक्ष समाजात खुलेआम फ्लर्टिन्ग करण्यास मज्जाव होता.. ते बॅरिगेट्स आता समाजमाध्यमीय मोकळीक मिळाल्याने गळून पडले.. पुढे त्याच मोकळीकेतून सामाजिक विकृती दिसू लागली.. स्त्रियांना नाहक मनःस्ताप समाजमाध्यमात झेलावा लागणं ही त्याचीच परिणीती आहे. 4/n

मुलींचे फोटोज वापरून बेधडक फेक अकाउंट निर्माण करण्यामागे कोणती मानसिकता असू शकते हे जर तपासून पाहिलं..तर समाजमाध्यमातून स्त्रियांना मिळणारा तुलनेने जास्तीचा प्रतिसाद हे मुख्य कारण असल्याचं दिसतं.. ट्विटर हे वैचारिक माध्यम आहे याचे भान ठेवून मुलींनीही व्यक्त व्हायला हवं. 5/n

मुलींच्या विचार आणि उच्चार स्वातंत्र्याचा आदर आहेच पण त्यांच्या सध्याच्या व्यक्त होण्याने काही एक चुकीचा पायंडा पडत असेल तर त्याबद्दल स्वतः मुलींनी पुढं येऊन वैचारिक दिशा दर्शक बनायला हवं..अर्थात काही अपवाद इथेही आहेतच. 6/n

हल्ली भक्त संप्रदाय वाढत चाललाय त्यास कसं वैचारिकरित्या आवरायचं हे आव्हान त्यांना हिणवुन किंवा ट्रोल करून साध्य होईल असं वाटत नाही.. त्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर सखोल वाचन हवं मित्रांनो त्याच बरोबर व्यक्त होत असताना लोकशाही मूल्ये पाळायला हवीत आपण.. 7/n

कारण, त्याशिवाय बदल शक्य नाही.. आपल्या आचरणाने सिद्ध करा की आम्ही लोकशाही देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. ❤ n/n

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling