रिंकू ✨✨ Profile picture
Tension Lene Ka Nahi, Dene ka!!

Sep 25, 2020, 7 tweets

#भुतांच्या_गोष्टी
रवी अन् त्याची बायको मधु हे नवीन लग्न झालेलं जोडपं नुकतंच नवीन घरात शिफ्ट झाले होते.
दोघंही जण एकमेकांना फार जपत, नवलाईचे दिवस त्यांचे छान चालले होते
अचानक एक दिवस रवीला घरी यायला उशीर होणार होता त्याने मधुला तसं कळवलही आणि कामात गढून गेला.
१/३

जरा वेळानं त्याने घडाळ्याकडे पाहिलं रात्रीचे ११ वाजले होते, त्याने घरी निघायची तयारी केली आणि पार्किंगमध्ये गाडीकडे चालत निघाला.
इकडे मधु जेवायची थांबली होती, रवीची बात बघून पार पेंगुळली होती तेवढ्यात बेल वाजली.
२/३

दरवाजा उघडला आणि रवीला बघून खुश झाली.
म्हणाली चल रवी फ्रेश हो आज किती उशीर केलास, तुझ्या आवडीची भरली वांगी आणि ठेचा केला आहे आज.
आलोच म्हणून रवी जे घरात गेला ते अर्धा तास झाला तरी जेवण्याच्या टेबलावर येईना.
मधुनी दोनदा आवाजही दिला.
तेवढ्यात फोनची रिंग वाजली.
३/४

मधुने फोन उचलला तर उन्मेष रवीचा मित्र बोलत होता वहिनी रवीच्या गाडीला अपघात झाला आहे तुम्ही लवकर सिटी हॉस्पिटलला या.
४/५

मधु किंचाळत घरात गेली तर रवी शांतपणे म्हणाला शांत हो मधु आज आपल्याला खूप लांबच्या प्रवासाला जायचं आहे जिथं आपल्याला कुणीही विलग करू शकणार नाही. अगदी काळ सुध्दा!

मधु जी तिथं थिजली ती कायमची!!

तेव्हापासून रवी आणि मधु तिथेच असतात नीरव भीषण शांततेत आणि सदैव सावजाच्या शोधात 💀💀
५/५

@RakyaDadoos_
@ss_kishor @3_suhani
माझी पहिली भयकथा 👆✍️😐

Numbering चुकलं आहे चुकून !! 😬

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling