#Armenia#ArmeniaVSAzerbaijan
अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन देशांमध्ये सध्या युद्ध पेटलय, आपल्यापैकी अनेकांसाठी हे देश अपरिचित असतील परंतु सध्या जगाच्या नकाशावर कुठल्याही देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली तरी इतर देशांसाठी ती चिंतेची बाब आहे.
+
या युध्दाचं कारण ह्या दोन देशांमधला सीमा विवाद हे असून ह्याला मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांमधील तेढही कारणीभूत ठरली आहे. अझरबैजान हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे तर आर्मेनिया हे ख्रिश्चन बहुल राष्ट्र आहे.
+
Sep 25, 2020 • 7 tweets • 2 min read
#भुतांच्या_गोष्टी
रवी अन् त्याची बायको मधु हे नवीन लग्न झालेलं जोडपं नुकतंच नवीन घरात शिफ्ट झाले होते.
दोघंही जण एकमेकांना फार जपत, नवलाईचे दिवस त्यांचे छान चालले होते
अचानक एक दिवस रवीला घरी यायला उशीर होणार होता त्याने मधुला तसं कळवलही आणि कामात गढून गेला.
१/३
जरा वेळानं त्याने घडाळ्याकडे पाहिलं रात्रीचे ११ वाजले होते, त्याने घरी निघायची तयारी केली आणि पार्किंगमध्ये गाडीकडे चालत निघाला.
इकडे मधु जेवायची थांबली होती, रवीची बात बघून पार पेंगुळली होती तेवढ्यात बेल वाजली.
२/३
Sep 25, 2020 • 9 tweets • 4 min read
आज काल आपण राजकारणात उजवे डावे किंवा राइट विंग लेफ्ट विंग असे सर्रास वापरतो.
पण ह्याची सुरुवात कुठून झाली ह्याविषयी थोडीशी माहिती..
1789 सालच्या उन्हाळ्यात फ्रेंच क्रांतीचे वारे वाहत होते. ज्याला कारण त्याआधीच्या काळातले क्रूर जुलमी शासक लुई १४ वा आणि लुई १५ वा हे ठरले
१/६
त्यात जेव्हा त्यांचा वारसदार लुई १६ वा (१७७४-१७९३) ह्याने पदभार स्वीकारला त्याचाही खर्चिक कारभार जनतेला मानवला नाही त्यानंतर सामान्य फ्रेंच लोकांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला आणि त्यांनी लोकाभिमुख सत्तेचा प्रस्ताव दिला.
२/६