थोडीशी असहिष्णुता आवश्यक असते.
मॅनेजमेंटच्या जगात "अॅबिलिटी टू से नो!" - समोरच्याला नकार देता येणं - याला खूप महत्व असतं. हे "नाही", "नको", "नॉट इंटरेस्टेड" सगळ्याच बाबतीत वापरता यायला हवं.
बिझनेसमध्ये अनेक संधी समोर येतात - त्यातल्या कोणत्या निवडायच्या, कोणत्या सोडायच्या -
१+
हे कळायला हवं. अनेक प्रॉस्पेक्ट्स फार चटकन फळास येतील असे असतात. आपल्या बिझनेस मॉडलमध्ये थोडेसे बदल केले तर मोठ्या संधी समोर उभ्या राहू शकतात.
करायचे का हे बदल? करावेत का?
याचं ठोस उत्तर अर्थातच देता येत नाही. पण अश्या संधी जन्मभर समोर येत रहातील. दर ६ महिन्यांनी फोकस
२+
बदलत रहाणार का?
म्हणूनच "नॉट इंटरेस्टेड" म्हणत सरकणं आवश्यक असतं.
एखादा क्लायन्ट मोठं बिझनेस बकेट घेऊन येतो. पण त्याचा पूर्वानुभव अ ति श य वाईट असतो. रक्त जाळणारा प्रकार असतो. आपणच नाही, टीमला पण वैताग आणणारा, प्रॉडक्टिव्हिटी कमी करणारा प्रकार. अश्यावेळी विनयाने नकार देणं -
३+
किंवा - स्पष्ट नकार नं देता, संबंध बिघडू नं देता टाळणं - जमायला हवं.
हे सगळं बिझनेस वा मॅनेजमेंट स्किल म्हणून शिकायला हवं म्हणून शिकवलं जातंच.
पण हे कौशल्य फक्त तेवढ्यापुरतं आवश्यक आहे का?
मित्र मैत्रिणी कोण असावेत, कुणाबरोबर किती वेळ घालवावा, कुणाकडून मदत स्वीकारावी -
४+
कुणाला किती मदत देऊ करावी...या छोट्या दिसणाऱ्या पण आपल्या दैनंदिन जीवनात खूप मोठे परिणाम साधणाऱ्या गोष्टी आहेत.
आपण कुणाबरोबर जोडले जातोय, कुणाबरोबर संधी करतोय, कुणाला "समजून घेतोय", किती पदरात घेतोय - याच्या काही आपल्या लक्ष्मणरेषा आपणच ओढून ठेवायला हव्यात.
५+
गाडी घेण्याची इच्छा आहे - डोक्यात सतत विचार येत आहेत - एक मस्त सेकंड हॅन्ड गाडी मिळतीये - पण पैसे नाहीत, कोव्हीडमुळे नोकरी दोलायमान आहे -
तेवढ्यात -
पर्सनल लोन देऊ करणारा कॉल आला...!
अश्यावेळी मोह टाळून -
नाही, नको, नॉट इंटरेस्टेड - म्हणता यायला हवं.
६+
फार फार पूर्वी कधीतरी एक वाक्य वाचून गेलो होतो...डोक्यात अगदी फिट बसलंय ते.
चीट मी वन्स - शेम ऑन यू...चीट मी ट्वाईस - शेम ऑन मी!
एकदा फसलो, फसवलो गेलो...ठीकाय...समोरचा माणूस वाईट होता, परिस्थिती वाईट होती...समजून घेऊ.
पण तोच वा तसाच माणूस, किंवा तशीच परिस्थिती परत उद्भवली-
७+
जे अगदी ९९% होतंच! --- आणि त्या सापळ्यात आपण अडकलो...
तर बाकी सगळं एकीकडे - आपण फसवले जाण्याचाच लायकीचे असतो. फसण्याच्याच लायकीचे असतो.
आपणच घेतलेला निर्णय असतो तो.
म्हणूनच ही स्किल कमावणं आवश्यक आहे. नकार देण्याची.
८+
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
