डेडपूल... Profile picture
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #पांडुरंग #Volleyball #Wrestling #Tilling

Sep 26, 2020, 17 tweets

डॉ.मनमोहन सिंग.

पाकिस्तान फाळणीच्या धगीने तावूनसुलाखून निघालेलं बालपण...त्यातून आलेली जिद्द,चिकाटी,सचोटी. त्याजोरावर पुढे शिक्षण.. प्रशासकीय अधिकारी ते सर्वोच्च पदावर मांड ठोकली..तरीही जनतेने त्यांना 2014 साली नाकारले..ते का? याचा जुजबी उहापोह.. #म 1/n

पंतप्रधान म्हणून डॉक्टरांना कारकिर्दीच्या शेवटी उद्विग्नपणे 'इतिहास माझी योग्य दखल घेईल.' अस त्यांना म्हणावं लागलं..इतकं आपण त्यांना टॉर्चर केलं अस म्हणण्यास वाव आहे.तत्कालीन विरोधकांच्या 'स्वच्छ प्रतिमेस निच आणि मलिन प्रतिमेस सर्वोत्तम' दाखवण्यामुळे हे झालं हाही एक पदर आहेच. 2/n

या अगोदर काहीतरी मांडतोय मी..
2004 साली सगळ्यांना सुखद धक्का देताना काँग्रेसने MMS ना पंतप्रधान पदी आरूढ केलं..वास्तविक त्यांना पंतप्रधान करण्यासाठी जनतेनं काँग्रेसला मत दिलं न्हवतं..पण 2009 साली मात्र जनतेनं MMS साठी मतदान केलं असं म्हणता येईल. 3/n

कारण, त्यांची पहिली निवड ही अपघाती मानली तरी दुसरी निवड तशी न्हवती याबाबत दुमत असण्याचं कारण नाही.या दहा वर्षात MMS हे सोनिया गांधी यांच्या हातातील बाहुले आहेत हा आरोप काही अपवाद वगळता ते परतवून लावू शकले नाहीत.जनतेच्या मनात ही एक शंका कायम राहिली.तीच अविश्वासाची सुरवात होती. 4/n

या आरोपातील अपवाद म्हणजे अमेरिकेशी अणुकरार, किराणा गुंतवणूक, इंधन दर जागतिक बाजाराशी जोडणे, वेगवेगळी अनुदाने कमी करणे.या साऱ्या प्रकरणात MMS नि काँग्रेस आणि सोनियांची प्रतिकूलता टाळत आपले निर्णय रेटले. तरीही या सगळ्या निर्णयात अगदी सरकार धोक्यात येईल अशी हवा तयार झाली होती. 5/n

तत्पूर्वी पंतप्रधान काळाच्या फार अगोदर त्यांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा पहिला अर्थसंकल्प जुलै 1991 मध्ये मांडला..'भारत जागा होत आहे, हे जगाला आता सांगायची वेळ आली आहे.' इतक्या निःसंदिग्ध आशय त्यांच्या शब्दात उमटला. अगदी सोने गहाण परिस्थिती ते आजची परिस्थिती आपण पहात आहोत. 6/n

खरंतर अर्थव्यवस्था वाढीचे उच्चांक प्रस्थापित केलेला माणूस त्याच्या कारकिर्दीत शेवटच्या दोन-तीन वर्षात 'धोरणलकवा' आणि 'मुका' या विशेषणांनी संबोधला गेला.हे क्लेशदायक होतं. मला आकडेवारीत जायचं नाही.पण,आत्ताच्या सरकारने बेस इयर हवातसा बदलून ही तेवढी वाढ दिसत नाही.यातच सर्व कळतंय. 7/n

डॉ.मनमोहन सिंग यांची उंची आज कळत जरी असली तरी तत्कालीन परिस्थिती नक्कीच बरी म्हणावी अशी न्हवती..त्यातच विरोधकांनी पराचा कावळा केला..दुसरीकडे भारतीय समाजाचा 'हा चांगला आहे.यापेक्षा हा नालायक आहे.' यावर विश्वास बसतो..हे तत्कालीन विरोधकांनी हेरले आणि एक बदनामीचा ट्रॅप आखला गेला. 8/n

जनतेच्या मनात पहिल्यापासून काही एक शंका होत्या त्यास पुरून उरण्यास काँग्रेस त्यावेळी कमी पडली. त्यातच काँग्रेस किती नालायक आहे ही आवई विरोधकांनी उठवली..याचा सगळा भार आता मनमोहन सिंग यांच्या खांद्यावर येणार होता..कारण ते हिनतेचा चेहरा आता बनवले गेले होते.. 9/n

त्यास मनमोहन सिंग आणि खुद्द काँग्रेस यांच्या चुकाही कारणीभूत ठरल्या.

आज जी परिस्थिती आहे तीच त्यावेळीही होती..ती म्हणजे 'काँग्रेस हे कुटुंब मानलं तर गांधी घराणे हे कुलदैवत आहे.' त्यातील राजकारणातून सुरक्षित पर्याय म्हणून मनमोहन सिंग यांनी PM पदाची शपथ घेतली. 10/n

1991 ला MMS काही भरीव करू शकले कारण त्यांना त्यावेळी धाडसी निर्णय घेणारे खमके नरसिह राव लाभले.पण पुढे मनमोहन सिंग स्वतः पंतप्रधान झाल्यानंतर या राजकीय पदासाठी लागणारी आस आणि ऊर्जा कमी पडली.पंतप्रधान पद हे फक्त सज्जनपणाच्या ठेवीवर चालत नाही.त्यासाठी एक तडफ आणि करारीपणा लागतो. 11/n

तरच जनतेस तो पंतप्रधान भावतो..कसा? ते आपण सध्या पाहतोच आहे..मग भले काम काही न करो. सिंग हे उत्तम प्रशासकीय अधिकारी होते पण पुढे पंतप्रधान पदी आल्यानंतरही ते प्रशासकीय अधिकारी असल्याची ओळख जनतेतून मिटवू शकले नाहीत. त्यासाठी वर मांडलेले फक्त अपवाद होते.. 12/n

डॉ.सिंग हे नामधारी आहेत हे आरोप सतत होत राहिले तो आव्हेरने त्यांना जमले नाही परिणामी त्यांच्या प्रतिष्ठतेचा ऱ्हास होत गेला.. इतका की पुढे राहुल गांधींनी जाहीर पाणउतारा करूनही डॉ. शांत राहिले.शेवटी उद्विग्नपणे 'इतिहास माझी योग्य दखल घेईल.' असे म्हणते झाले.बरोबर ही होतं ते 13/n

व्यक्ती असो की संस्था त्याच्या यशस्वीतेचे मूल्यमापन हे वर्तमान कर्तृत्वातून केले जाते पूर्वपुण्याईने नाही..तत्कालीन जनतेने तेच केलं.. कॅग,कोलगेट, 2G प्रकरणात आणि आण्णा बाबांच्या आंदोलनात परिस्थिती बिकटच बनत गेली..शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेली .जाताना सोबत सत्ताही घेऊन गेली. 14/n

सर्वार्थाने या सरदाराची शौर्यगाथा भारताच्या इतिहासात लिहली गेली..शेवटी शेवटी ही शौर्यगाथा शोकगाथा बनली..त्यामुळेच जनतेने त्यांना नाकारले हे कटुसत्य आजच्या बेताल परिस्थितीत जास्तच कडवट लागत आहे. त्यामुळे ते पचवणं जड जातंय. 15/n

आशा या कारकिर्दीत LPG मॉडेल,मनरेगा, RTI, RTE, अन्नसुरक्षा हे विषय तडीस लावत देशाला प्रगती पथावर नेणारे सरदार आज 88 वा वाढदिवस साजरा करत आहेत..त्यांना खूप खूप शुभेच्छा.❤ #आदर n/n

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling