Omkar Dabhadkar Profile picture
Brand | Business | Life

Sep 26, 2020, 6 tweets

भेट खरोखर कशामुळे/कशासाठी झाली, मुलाखत देतील की नाही, एकत्र येतील का, सरकार बनवतील का : हे सगळे चुकीचे मुद्दे आहेत.

ते जेव्हा होईल तेव्हाचं.

या लोकांना बोलता-भेटताच कसे, डील करताच कसे - हे आजचे, खरे महत्वाचे प्रश्न महत्वाचे आहेत.

१+

राजकारणात सगळं क्षम्य असतं म्हणत म्हणत आपल्या केंद्रीय नेतृत्वाला शिव्या घालणाऱ्या, आपल्या कार्यकर्त्याना त्रास देण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या ट्रोल्सना मार्गदर्शन करणाऱ्या, आपल्या संघटनेवर अश्लाघ्य घसरणाऱ्या -

२+

अश्या लेव्हलच्या लोकांशी महाराष्ट्राच्या शीर्ष नेतृत्वाने गुडीगुडी बोलणं, गोड हसत मुलाखती देणं, गळ्यात पडणं समर्थनीयच नव्हे, धूर्त राजकारण ठरवलं जात असेल तर कठीण आहे.

तुमचं पक्षीय राजकारण काही का असेना, आय डोन्ट केअर. पण हे राजकारण नकोय आम्हाला. या राजकारणाचा

३+

आमच्यावर थेट इम्पॅक्ट होणार आहे.

तुमची तुम्हालाच किंमत नाही, तुमच्या केंद्रीय नेतृत्वाचा, संघटनेचा मान तुम्हाला कस्पटासमान वाटत असेल तर आमचं काय?

या लोकांबरोबर पडद्यामागे वा पडद्यासमोर संधी झाली तर आमचं, जनतेचं नुकसान होणार आहे. व्हिजन लेस लोक पुरे आता. कंटाळा आलाय.

४+

याना बुलेट ट्रेन नको, मेट्रो नको, कार्यक्षम अधिकारी नको, मुंबई सुधारायला नको, इतर शहरं मोठी करायला नकोत, शिक्षणात सुधारणा नकोत...काहीच नकोय.

यांच्याबरोबर डील करत असाल तर सिरियसली मतदानाच्या दिवशी घरी बसू आम्ही. नोटासाठीसुद्धा वेळ आणि ऊर्जा खर्च करणार नाही.

५+

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling