मोटाभाई सह्याद्रीवाले ❤️👣💯🚩 Profile picture
The_Young_Guns_Of_INDIA🇮🇳

Sep 26, 2020, 15 tweets

#अपरिचित_मावळे
#मुस्लिम_मावळा
#मदारी_मेहत्तर
१)परिचय..
फारसा काही इतिहास नाहीय यांचा,
मदारी मेहत्तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम सेवक १७ ते १८ वर्षाचे पोर हे, पण महाराजांना लई घोर याचा, हरघडी महाराजांन सोबत असे जिथे जिथे महाराज, तिथे तिथे मदारी आहेच. 1/15

इतिहासकार असे सांगतात की मेहत्तर म्हणूजे "म्होरक्या"मेहत्तर खरे हिंदू रजपूत होते मोघलांनी त्यांच्या वर अत्याचार करून धर्म परिवर्तन केले त्यापैकी मेहत्तर ही एक जमात होती, त्यांच्यावर अगणित अत्याचार केले गेले, संडास साफ करून घेणे, गटारी साफ करणे, मैला डोक्यावरून वाहून नेणे, 2/15

इत्यादी घृणास्पद काम करून घेतले.मेहत्तर या जमाती मध्ये चव्हाण, गुद्रिएत, तोमर, सोलंकी वैगेरे नावे आढळून आली. यांच्या विवाह पध्दती, पूजा वैगेरे शुद्ध हिंदू च्या प्रमाणे आहेत. मुळात जातकुळाची पंचाईत हवी कशाला? मुस्लिम की हिंदू ?हा वाद इतिहासकारांनी 3/15

शोधावा आपण त्यातला शिवभक्त (शिलेदार)निवडणे एवढेच आपले काम.२) पराक्रम..
१६६५ ला मोघली सरदार मिर्झा राजे जयसिंह यांनी स्वराज्य वर जोरदार आक्रमण केले त्यात शिवाजी महाराजांना तह केल्या शिवाय पर्याय नव्हता, त्यात मिर्झा राजें नी एक आग्र्या भेटी चा प्रस्ताव ठेवला ती आलमगीर 4/15

सोबत होती.महाराजांनी तो प्रस्ताव स्वीकारुन फक्त ३५० विश्वासू मावळ्यांसोबत आग्र्या कडे कूच केली, त्या ३५० पैकी एक अतिसाधारण मावळा होता त्याचे नाव होते मदारी मेहत्तर , महाराजांची निवड म्हणजे साधी सूधी आणि सोप्पी तर मुळीच नसते तो एक चाणाक्ष आणि त्याची आकलन शक्ती तलवारीच्या धारी 5/15

सारखी धारीधार होती. महाराज त म्हणले की तो ताक् च ओळखायचा आणि ते बरोबर ही असायचे, खरे तर तो एक सेवक म्हणून काम करत होता.महाराजांचे आग्र्या मध्ये म्हणावे तसे स्वागत व राहण्याच्या व्यवस्था खूप साधारण केली गेली, त्यात आलमगीर ने त्यांना १००० च्या मनसबदारी च्या रांगे मध्ये 6/15

उभे करून,दख्खन च्या राज्याचा अपमान केला, तो अपमान महाराजांना सहन झाला नाही आणि त्याच दरबारात सह्याद्रीचा सिंह असा गरजला की, आलमगीर स्वतः हादरून गेला आणि त्याला हा त्याचा झालेला अपमान सहन झाला नाही,त्या नंतर महाराजांना नजर कैदेत ठेवले गेले, केव्हा ही घात होऊ शकते हे महाराज7/15

ओळखून होते, महाराजांनी सांगितल्या प्रमाणे हा मदारी त्या डेर्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पहारेकरांचा विश्वास संपादन करून घेत होता आणि त्याचे हाव भाव अतिशय चोख होते, त्यामुळे त्याच्यावर संशय येणे कठीणच, महाराजांनी ठरल्याप्रमाणे आजारी असल्याचे नाटक करत, गोरगरीबांना अन्नधान्य,8/15

मिठाई वाटप केल्यास आजर पण दूर होईल अश्या आशयाचे संदर्भ मदारी आजूबाजूला सांगत वातावरण करू लागला,अखेर तो दिवस उजाडला,महाराजांनी युवराज संभाजीराजेंन सोबत मिठाई च्या पेठर्यातून स्वतःची सुटका करून घेतली,नंतर जाताना महाराजांनी स्वतः च्या हातातील सोन्याचे कडे हिरोजी फर्जंद यांच्या 9/15

कडे दिले आणि ते कडे हिरोजी फर्जंदांनी स्वतः च्या उजव्या हातात चढविले अंगावर पांघरूण घेऊन पडून राहिले व मदारी त्यांचे नेहमी प्रमाणे पाय चेपीत राहिला आणि जशी सायंकाळ झाली तशी दोघांनी महाराज झोपलेत आहे आम्ही जरा जाऊन येते असे कारण दिले, त्यांच्या वागण्याचा जरा देखील संशय कोणाला10/15

आली नाही,विचार करा काय असेल ती परिस्थिती? काय विचार असतील मदारी च्या आणि हिरोजी च्या मनात ?नंतर तब्बल ८वर्षांनी ,मदारीचा उल्लेख आढळतो.ज्या वेळी राज्यभिषेक होता त्यावेळी महाराजांनी प्रत्येकाला भेट दिली,पण एका कोपऱ्यात मदारी उभा होता त्यावेळी महाराजांचीं त्याच्या वर नजर पडली 11/15

आणि म्हणाले काय हवंय तुला, तो म्हणाला मला आणि माझ्या येणाऱ्या पिढीला आपल्या सिंहासनाच्या देखभालीची जबाबदारी द्यावी एवढीच मागणी करतो,महाराज म्हणाले मंजूर त्यानंतर त्याच्या मुलाने सादुल्ला खानाने ती जबाबदारी पार पाडली.
३)सप्रेम भेट...
चरण स्पर्श करत मदारी म्हणाला,
आपल्या 12/15

नित्यपूजेतील शिवलिंग घाईगडबडीत आपण आग्र्याला च सोडून आलात, चांगल्या मुहूर्तावर देऊ या असा विचार केला होता आणि आजचा पेक्षा चांगला मुहूर्त नाही मिळणार परत... स्वतः च्या झोळीतले शिवलिंग महाराजां कडे सुपूर्द केले.असा होता एक मावळा त्याला वाटले असेल..
माझ्या सारखे लाखो/हजारो 13/15

मरतील, पण माझ्या स्वराज्याचे शिवतेज,शिवसूर्य जिंवत राहिले पाहिजे.
महत्त्वाचे-
१) नित्यपूजेतील ते शिवलिंग काही वर्षे सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीत ठेवले होते, सध्या ते सातारा येथील जलमंदिरात आहे , कोणालाही पहावयास मिळेल.
२) किल्ले रायगडावर महादरवाजा च्या 14/15

अगोदर पाऊण मैलाची वाटचाल झाली की तिथे मदारी मेहत्तर ची कबर आहे. त्याला मसीद मोर्चा पण म्हणतात.
#जय_शिवाजी
#शिवबाचे_शिलेदार
15/15
@Ok_Bharatiya @iAtulB @swarraj5 @TUSHARKHARE14 @TusharRaut34 @Vedashree_19 @gajanan137 @GaneshGaitondeG @RajeGhatge_M @malhar4you @malhar_pandey

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling