सनातनी राजेश 🚩सनातन धर्म हाच राष्ट्रधर्म 🚩 Profile picture
आसिंधु सिंधु पर्यन्ता यस्य भारतभूमिका ।  पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥  Rts are not endorsements

Sep 28, 2020, 5 tweets

भारतरत्न,गान कोकिळा लता मंगेशकर यांचा आज 91 वा वाढदिवस
(मृदुला ताई दाढे यांनी लिहिलेल्या सुंदर लेखाचा निवडक अंश आपल्यासाठी)
लता मंगेशकर विश्वाच्या निर्मात्याने हे विश्व निर्माण केल्याबद्दल स्वतः ला दिलेले बक्षीस, लता मंगेशकर या सात शब्दांमध्ये 12ही अलंकार आहेत,
@gajanan137

या गळ्यातील स्वरवेल जेव्हा थरथरली तेव्हा अनामिक दैवी सुगंध फुले ओठांवर उमलली,गायन विषयातील सर्व सौन्दर्य कल्पना एकत्र येऊन घडवलेले प्रमाणबद्ध शिल्प लता मंगेशकर, संगीत हे परमेश्वरापर्यंत पोचण्याचे साधन असेल तर त्या प्रवासाला स्वतःचा मखमली रस्ता दिला या आवाजाने
@Amruta39117837

या आवाजाला आपण दैवी विशेषण लावतो,देवाचा आवाज आपण ऐकलंय का?मग लताबाईंचा आवाज दैवी कसा?तर देवाला ही आपला आवाज असा असावा असं वाटायला लावणारा हा आवाज,प्रणय, मिलन,रुसवा फुगवा विरह वंचना,वात्सल्य, फसवणूक या सगळ्यांना अंतर्गत अनंत छटा आहेत हे या आवाजातून व्यक्त झाल्यामुळे समजलं

लताबाईंच्या आवाजात जन्मजात घरंदाज पणा आहे,या आवाजातून कामुकता जेव्हा व्यक्त झाली तेव्हा ती कधी उथळ सवंग वाटली नाही कारण त्यातील ग्रेस व सूचक शृंगार
मौनाच्या संध्याकाळी आकाश स्वरांचं झाले
वितळले क्षितिज गंधात रंगातून रूप निथळले
@Vishakh50862352

हा सूर अनाहत कोठून आला येथे,हा जिथे तरंगे तेथे गाणे उमटे, हा अखंड अविरत अथक वाहता राहे हा सूर जणू शब्दांचे ह्रदगत आहे
ह्या आवाजाला,त्या श्रुतीना त्या अलौकिक अस्तित्वाला प्राणांतून कृतज्ञ नमस्कार
कविता सुधीर मोघे

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling