iPragati Profile picture
Dancelover•Fun•Family•Live•Love•Laugh• Media.Proud Indian(Me Marathi)-PNQ-LHR

Sep 28, 2020, 9 tweets

#आजचा थ्रेड 28-09-20
आपले किती Account Closed झाले

कसे आहात..??"
एवढा एकच प्रश्न तिने विचारला..
आणि रोज दिसणाऱ्या पण परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो..
ती म्हणाली.."भरपूर रडून घ्या..मला वेळ आहे.आजच रडायचं आणि नंतर डोळ्यांतून पाणी काढायचं नाही.."

त्या नंतर तिने जे काही सांगितलं..त्यानंतर कायापालट.
"तिनं काय सांगितलं..??" म्हणाली.."की आपण हा जो जन्म घेतलाय तो अपेक्षापूर्तींकरिता नाही.आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही तर आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात.त्या पूर्ण होत नाहीत.उरतात त्या फक्त जाळणाऱ्या व्यथा..!"

"माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तींकरिता नाहीच आहे हा आहे परतफेडीसाठी आहे.."
तुमच्या सौभाग्यवती गेल्या तुम्ही त्यांचा संसार पूर्ण केलात.तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरिता हा जन्म घेतला.ह्याचा अर्थ कोणत्यातरी एका जन्माची परतफेड झाली..तो अकाउंट संपला..!

आता ह्याच दृष्टिकोनातून सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा.
मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत..
ही सुध्दा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात..परतफेडीचा हा हिशोब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हांला मरण नाही..

बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर..Account Closed..
असा शिक्का मारतात ना त्याप्रमाणे जेंव्हा एकांत मिळेल तेंव्हा..
"अरे हो..चुकलंच..!"
तुम्ही एकांतातच असता..हे विसरले..
हा..तर आपले किती Account Closed झाले ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका..परतफेडीचा एक ही क्षण टाळू नका..

तुम्हांला जड जाईल पहिल्यांदा..
पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना..तेवढंच ते लवचिक पण असतं..
तेंव्हा मनाला सांगा.."बाबा रे..आयुष्यभर तुझं ऐकलं..तुझ्या हुकमात राहिलो..आता तुझी गुलामी मी सोडून देत आहे..आजपासून तुला मी मुक्त केलं..!"

हा प्रयोग करा आणि किती खाती पटापट बंद होतायेत ह्याची प्रचिती घ्या..
मी सुद्धा उद्या तुम्हांला ओळख दाखवली नाही..तर तुमच्या पासबुकात माझी एकच entry होती समजा..

परमेश्वराचं नाव घेताना "परतफेड.. परतफेड" हा मंत्र ध्यानात ठेवा..
मी येते...असं म्हणत ती निघून गेली..

इतकं सगळं बोलून गजा उठला आणि म्हणाला..
"ही मुक्ती मिळून पाच वर्षं झाली..मी मस्त आहे..तृप्त आहे.."
"आम्ही सहन करतो सहन करतो हे इतका वेळ तुम्ही सांगितलंत.ह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाहीत..तुम्ही दुःख वाटत सुटलात.."

"जो सहन करतो ना..तो कधी बोलत नाही..!"

वपु

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling