रश्मी सराफ 🇮🇳( मोदीजी का परिवार) Profile picture
Photography| Yoga teacher| Sanghi| Bhakt|#Hindu #मराठी #सुगृहिणी #BTS 💓 #Taekook 💞 ||जय जय रघुवीर समर्थ ||

Sep 30, 2020, 8 tweets

*सुदर्शनजी आणि मी*
नुकतीच (१५ सप्टेंबर) रा.स्व.संघाचे ५वे सरसंघचालक यांची ८ वी पुण्यतिथी झाली. त्यानिमित्ताने एक आठवण ..
९२-९३ सालची गोष्ट.आम्ही अमरावतीला होतो.श्रीकृष्ण पेठ या भागात वरच्या मजल्यावरचं एक मोठ्ठं घर आम्हाला क्वार्टर म्हणून मिळालं होतं.तो भाग खास काँग्रेसचा गड!

तिथे माझा दादा जो त्यावेळी ११-१२वित होता त्याने बाल संघ शाखा सुरू केली आणि भरपूर संख्येत मुलं जामवण्यात त्याला यश आले होते. त्या गोष्टीचं संघातील सगळ्यांनाच कौतुक होतं. त्यावर्षी अमरावतीत संघाचा काही कार्यक्रम होता.त्यासाठी सुदर्शनजी जे तेव्हा अखिल भारतीय शारीरिक शिक्षा प्रमुख

होते( बहुतेक)ते येणार होते.त्यांची राहण्याची व्यवस्था आमच्या घरी करण्यात आली.घरात नुसती गडबड उडाली होती.मी मात्र तो ३१डिसेंबरचा दिवस असल्यामुळे मला रात्रीचा दूरदर्शनवरील मनोरंजनाचा कार्यक्रम पाहता येणार नाही या दुःखात होते!
ते ३१ला दुपारी आले.आईने औक्षण वगैरे करून त्यांचे स्वागत

केले.त्यांना घरातल्यांची ओळख करून देण्यात आली.घरात त्यांना भेटायला येणाऱ्यांची नुसती झुंबड उडाली होती.समोरच्या खोलीत खूप चर्चा वगैरे चालू होत्या.मी मात्र आतमध्ये आईला मदत करण्यात गुंग होते.त्यांनी आल्यावर स्नान करून संध्या केली( ते त्रिकाल संध्या करत असत).उशीर झाला होता त्यामुळे

त्यांनी नुसते दूध घेतले. दुसऱ्या दिवशी ते त्यांचं आन्हिक आटोपून आईने त्यांच्यासाठी केलेली पुरणपोळी खाऊन कार्यक्रमासाठी निघून गेले. दुपारी परतले तेव्हा मी झोपले होते😅 ते लवकरच जायला निघाले. सगळ्यांचा निरोप घेऊन ते निघाले आणि अर्ध्या जिन्यात एकदम " अरे, रश्मी कुठे आहे? मला तर

भेटलीच नाही!" असं म्हणत परत फिरले आणि भराभर जिना चढून वर येऊ लागले.इकडे आई धावत घरात आली आणि " रश्मी, उठ, सुदर्शनजी आलेत" म्हणून मला उठवले. मी धडपडत डोळे चोळत बाहेर येईपर्यंत ते घरात आले सुद्धा होते. मला पाहिल्यावर " काय रश्मी, मी चाललो आणि तू झोपली आहेस!" असं म्हणत मी त्यांना

नमस्कार करायला वाकत असताना जवळ घेतले. आशीर्वाद दिला. काहीतरी बोलले(आठवत नाही आता) आणि भराभर निघूनही गेले.
जमलेले सगळे जण "किती लकी आहेस,रश्मी,तू! एव्हढ्या गडबडीत, माणसांनी घेरले असतानाही ते तुला विसरले नाहीत" वगैरे माझं कौतुक करत होते. मी मात्र मनातल्या मनात "what a man!!" असं

म्हणून त्यांच्या साधेपणाने अगदी भारावून गेले होते. आदल्या रात्रीचा ३१ डिसेंबरचा कार्यक्रम न पाहायला मिळण्याची खंत पार कुठल्याकुठे पळून गेली होती.

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling