हाथरस घटना
या घटनेवर बऱ्याच जणांनी आपली वेग वेगळ्या प्रकारे मत व्यक्त केली आहेत. माझा सुद्धा एक छोटासा प्रयत्न आहे या गोष्टीवर जरा एक वेगळ मत मांडण्याचा.
थोडा मोठा थ्रेड आहे पण कृपया पूर्ण वाचावा. कृपया थ्रेड पूर्ण वाचल्यावर आपली प्रतिक्रिया कळवावी
1/n
१९ सप्टेंबरला हाथरस मधे अत्यंत घृणास्पद समाजाला काळिमा फासणारी घटना घडली. आणि कालच त्या पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे लोकांनी या घटनेवर आवाज उठवले आणि तिच्यासाठी न्यायाची मागणी केली. पीडितेला न्याय जरूर मिळेल म्हणजे मिळालाच पाहिजे .
2/n
त्या साठी सरकारने हैदराबाद पॅटर्न वापरला तरी लोक त्याचे स्वागतच करतील. पण आपण जरा खोलात जाऊन याच्यावर विचार केला का ? कि ह्या घटना सारख्या का घडत आहेत.माझ्या मते तरी आपण ह्या गोष्टीला पॉर्न (पोर्नोग्राफिक कन्टेन्ट) ला कमी अधिक प्रमाणात जवाबदार धरू शकतो.
3/n
मी अस नाही म्हणणार कि ह्याला १०० % पॉर्न जवाबदार आहे म्हणून पण हो कुठेतरी काहीतरी प्रमाणात पॉर्न ला जवाबदार धरले जाऊ शकते. कारण सध्या इंटरनेट मुळे अगदी कुठलीही गोष्ट एकदम सहज आपल्याला मिळू शकते मग पॉर्न तरी त्याच्यात मागे कसे राहील.
4/n
आणि जर आपण भारत पुरता ह्याचा विचार केला तर सरकारने पॉर्न वर या आधीच बंदी आणली आहे पण तरी सुद्धा सर्वात जास्त पॉर्न बघणाऱ्या देशांमध्ये भारताचा ३ रा क्रमांक लागतो. तर पॉर्न वर बंदी आणून काहीच फरक पडणार नाही आहे कारण लोक या ना त्या मार्गाने त्याचा अवलंब करू शकतात.
5/n
आणि सध्या आपल्याकडे वेब सिरीज चा जमाना आहे . पण आपण बघितला आहे का या वेब सिरीज मधून जास्त प्रकारे अश्लील कन्टेन्ट चा भडीमार कसा जास्त होत आहे. मग त्या मध्ये ALT बालाजी, ULLU , prime ,netflix अशा बऱ्याच अँप्लिकेशन्स वर कायदेशीर रित्या हे सगळे एका क्लिक च्या रूपात उपलब्ध आहे.
6/n
ह्या गोष्टीचा मुख्य शिकार हि आज कालची किशोरवयीन (teenagers) पिढी आहे. कारण काय होते बालवयातच उत्सुकतेपोटी एखादा विडिओ बघितला जातो आणि नंतर कधी एकदा ह्या गोष्टीचे व्यसन लागते कळून सुद्धा येत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यानुसार भारत हा नवयुवकांचा देश आहे
7/n
आणि जर हि तरुण पिढी या अशा व्यसनांना जर बळी पडत असेल तेर या देशाचे वाट्टोळे होयला वेळ लगाणार नाही. तर आपण हे सगळं थांबू शकतो का? तर हो पण हे अवघड आहे अशक्य नक्कीच नाही. आणि या बाबतीत आपण सरकार वर निर्भर न राहता स्वतःहून काहीतरी प्रयत्न केले पाहिजे.
8/n
ज्या प्रकारे सोशल मीडिया वर #noshavenovember सारखे सामाजिक जागरूकता वाढवणारे पावले उचलले जात आहेत त्या प्रमाणेच #nopornchallenge ह्या सारखी जागरुकता होणे गरजेचे आहे. आणि ह्यांच्यामध्ये बदल घडायला सुरवात झाली आहे
9/n
कारण युट्युब वर जे काही चांगले कन्टेन्ट बनवणारे लोक आहेत मग त्या मधे सलील जामदार, FitTuber, captain sindabad या सारखे creators आपल्या पद्धतीने छोटासा प्रयत्न करीत आहेत. सरतेशेवटी एवढेच सांगू शकतो कि हा बदल घडवणे हे आपल्याच हातात आहे
10/n
आणि जर ह्या पॉर्न विरुद्ध समाजात चांगली जागरूकता निर्माण झाली तर या सर्व लोकांचे धंदे बंद होतील. आणि या मुळे बलात्कार, अत्याचार आणि sex trafficking सारख्या घटना नक्कीच कमी होतील.
©️ सौरभ सुहास पारखी
Sources :- 1. firstpost.com/tech/news-anal…
2.researchgate.net/publication/12…
3.
4.
5.
@malhar_pandey @malhar4you @KaduAmol @TheDarkLorrd @sanghi_girl @Vedashree_19 @gajanan137 @rajrajsi @marathi_mulgi__ @thatPunekar @RakyaDadoos_ @bhasmya @SanketRPhadke @The_NitinD @mukta9003
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
