आदरणीय गृहमंत्री @AnilDeshmukhNCP साहेब,
उत्तर प्रदेश मध्ये, ज्या नराधमांनी पाशवी बलात्कार करून, पीडित तरुणीला जीवे मारण्यात आलं, त्याबद्दल तुम्हाला एकट्यालाच नाही सर्वांनाच दुःख आहे.
ही राजकारण करण्याची वेळ नाही.
पण, तुम्ही फिल्म सिटी न बनवता माता बहिणी सुरक्षित असल्या पाहिजेत अश्या उपाय योजना करा, असा उपदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले आहत.
साहेब दुःख व्यक्त राजकारण न करता देखील आपल्याला व्यक्त होता आलं असतं, पण नाही, आपणाला राजकीय टिपण्णी महत्वाची वाटली +
आणि तुम्ही ती केली.
असो, सर आपल्याला माहिती असेल, नसेल याबद्दल मला माहिती नाही. पण, मागील ६-७ महिन्यात आपल्या राज्यात घडलेल्या घटना तुमच्या निदर्शनास आणून देत आहे.
कोरोनाच्या संकटकाळातही महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अशा घटना घडल्या आहेत, +
ज्यांमुळे राज्यात महिलांवर वाढलेले अत्याचार ही बघायला मिळालेत.
१. १७ जुलै २०२०, पनवेल येथे क्वारंनटाईन सेंटर मध्ये ४० वर्षीय महिलेवर बलात्कार झाला. हा
२. मीरा भाईनंदर येथे गोल्डन नेस्ट कोविड सेन्टर येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेवर तिथल्या सुरक्षा रक्षकाकडून बलात्कार+
झाला आहे. देशमुख साहेब, घटना आहे जून मधील, पण घडकीस आली सप्टेंबरमध्ये. म्हणजे किती सुरक्षित आहेत महिला बघा.
३. देशमूख साहेब, कडेगाव पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. २८ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. +
४. देशमुख साहेब, राज्यात अश्या घटना घडल्या आहेत, त्यात दलित महिलांवर अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या आहेत. डोंगरगाव येथील घटना बघा, मुली सकट, महिलेचे मृत शरीर विहिरीत सापडलं. ही घटना वेळ निघून गेला, पण तपास काही झालं नाही. शिर्डीत एका दलित मुलीने आत्महत्या केली, +
रोड रोमियोच्या जाचाला कंटाळून.
५. साहेब आता हे सोडून द्या, इतर घटनां आपल्या निदर्शनास आणून देतो. अपल्याच नागपूर जिल्ह्यात नागपूरच्या नारखेड तालुक्यातील अरविंद बनसोड नावाचा दलित युवकला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा आरोपी कोण आहे ? हे आपल्याला देखील माहिती आहे. +
६. नुकतंच तीन -चार दिवसांपूर्वी आपल्या नागपूर शहरात कुऱ्हाडीने व्यक्तीला भर दिवसा, रस्त्यावर कापण्यात आलं. त्यावेळीही चक्कार शद्ब नाही निघाला आपल्या तोंडून.
मला सांगा साहेब, ही दिवसा कुऱ्हाडीने ठार मारून जीव घेणाऱ्या लोकांची गाडी पटली होऊ शकते का आपल्या राज्यात.? +
कस आहे साहेब मानवी वृत्तीच अशी आहे. आपला दोष नाही. स्वतःच्या डोळ्यातील मुसळ आपणाला दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातीक कुसळ आपण शोधण्यात वेळ घालवतो.
साहेब, ज्यांच्या हातात राज्याचे पोलीस खाते आहे, त्या व्यक्तीच्या शेतात चोर चोरी करून पळून जातात.
विचार करा गुन्हे करणारे किती घाबरतात तुम्हाला.?
प्रकाश गाडे ह्यांची फेसबुक पोस्ट..
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
