डेडपूल... Profile picture
उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #पांडुरंग #Volleyball #Wrestling #Tilling

Oct 1, 2020, 11 tweets

'काँग्रेसला 60 वर्षे दिलीत,मला 60 महिने द्या.' मनमोहन सिंग सरकारचे धोरण 'मर जवान मर किसान आहे' मला सत्ता द्या 'जय जवान,जय किसान' करतो मी.नरेंद्र मोदी नामक व्यक्ती 2014 च्या अगोदर बोलत होते. आज 72 महिने झाले या मोदी नामक सरकारला. परिस्थिती काय आहे पाहतोय आपण. #म 1/n

गुजरात मॉडेल चा डंका बडवला गेला.शेतकऱ्यांना 24 तास वीज आहे तिथं असा.वस्तुतः 8 तास ही वीज तिथं मिळत न्हवती. या असल्या खोट्या हॅमरिंगमध्ये तर्क विसरतो माणूस. जनतेचे तेच झाले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा इतका दर देतो म्हणाले होते ही लोकं.खरतर 2014-15 च्या हमीभावात 2/n

कुठेही ही बाब दिसली नाही.वरून न्यायालयात असं काही करता येत नाही याचं शपथपत्र दिलं. काही राज्ये या कमी हमीभावावर बोनस देऊन शेतमाल खरेदी करत होती.त्यातून शेतकऱ्यांना चार पै मिळत होते.तर मोदींनी ही बोनस सिस्टीम बंद करा असे पत्र लिहले.भाजपशासित राज्यांनी ते पत्र आमलात ही आणले. 3/n

यातून शेतकर्यांच्यात निराशा दाटत असताना 'आम्ही तुमचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करू.' ही टूम काढली..वास्तविक याच सरकारने ते कसे करू? हे आजिबात योजनेद्वारे मांडले नाही..कारण ती एक फसवी घोषणा होती त्यासाठी कृषी वाढ दर 12 ते 15 टक्के एवढा हवा..आणि हमीभावात मार्केट बेस वाढ हवी. 4/n

आत्ता गेल्यावर्षी डॉ.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव 'सर्व खर्च (comprehensive cost अर्थात C2)+50 टक्के नफा देतो असे म्हणत होते पण वास्तविक हमीभाव हा सर्व खर्च न धरता 'निविष्ठा+मजुरी' एवढाच खर्च धरून त्यावर 50 टक्के नफा हा दर देऊन खोटा डांगोरा पिटला गेला. 5/n

मागच्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर किसान सन्मान निधी म्हणून वर्षाला 6 हजार ₹ शेतकऱ्यांना(5 एकरच्या आत क्षेत्र) देऊ केले ते मिळालेही शेतकऱ्यांना पण तामिळनाडू,महाराष्ट्र या राज्यात घोटाळे झाल्याची बातमी आलीय.गेल्यावर्षी याच काळात पुलवामा घडल्याने कोण कोणाला कशासाठी मतदान 6/n

करत होता कळलंच नाही. खरतर पहिल्या पाच वर्षात जुन्याच योजना नाव बदलून आणल्या गेल्या..त्यातूनही किती रोजगारनिर्मिती झाली? किती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले? हा विचार न करता भारतीयांना 5 ट्रीलीयन इकॉनॉमी चे स्वप्न दाखवले गेले. सध्यातर असंघटित क्षेत्र मरणासन्न अवस्थेत आहे त्यावर 7/n

उपाय काय? हे कोणाला माहीत नाहीत .कारण या सरकारने तज्ञांना स्पष्ट नाकारून खूषमस्कर्यांना जवळ केलं आहे.
ही मंडळी विरोधी बाकावर बसायची तेंव्हा 'ये कैसा डॉक्टर है,रुपया सलाईन पर है' म्हणायची. पण आज ₹ ची अवस्था किती वर्षे झाली अत्यवस्थ आहे मंडळी? आपण काही बोलत नाही कारण आपलं 8/n

तिकडं लक्ष नाही.आपलं तिकडं लक्ष नाही कारण त्याची सवय झालीय आपल्याला. आज इंधन दर जागतिक बाजारात 30 ते 50 डॉलर असतील..तरी आपण त्यासाठी तेवढेच पैसे मोजतो जेंव्हा जागतिक पातळीवर दर 130 डॉलर होते. हे कसं? यांना आपण आतातरी विचारणार आहोत की नाही? 9/n

एक समाज म्हणून आपली स्मरणशक्ती विसरभोळ्या गोकुळ सारखी आहे..काही गोष्टी लक्षात ठेवतो आपण पण त्या का लक्षात ठेवल्यात हे कालपरत्वे विसरतो.यावर उपाय आहे वास्तववादी आणि तर्कशुद्ध विचारासोबत सदृढ वाचन. ते न केल्यास कालांतराने आपण माणूस आहोत हेच विसरून जाण्याचा धोका आहे. n/n

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling